May 01, 2011
बी. एफ. स्किनर या नवबिहेवियरिस्टनं मानसशास्त्रात वैयक्तिक पातळीवर केलेले प्रयोग आणि संशोधन यांना महत्त्व दिलं. 20 मार्च 1904 रोजी पेन्सिल्व्हानियामधल्या एका छोट्या गावात जन्मलेल्या स्किनरचं लहानपण शिस्तीच्या वातावरणात गेलं. लहान असताना एकदा स्किनरनं शिवी दिलीय हे कळताच त्याच्या आईनं चक्क साबणाने त्याची जीभ आणि तोंड घासून काढलं होतं! एकदा तर त्याच्या वडिलांनी त्याला गुन्हेगाराला शिक्षेला तोंड कसं द्यावं लागतं हे कळावं म्हणून तुरुंगातून फिरवून आणलं होतं. लहानपणी स्किनरला वेगवेगळ्या खेळण्यांची मॉडेल्स बनवण्याचा प्रचंड नाद होता. त्यामुळेच पुढे प्राण्यांवर प्रयोग करताना लागणारी उपकरणं त्यानं स्वत:च बनवली. शाळेत असल्यापासूनच त्यानं "कमवा आणि शिका' हा मंत्र आचरणात आणला. 1926 मध्ये कला शाखेतली पदवी मिळाल्यावर स्किनरनं लेखक व्हायचं ठरवलं. अधूनमधून तो लघुकथाही लिहीत असे. मानवी वागणुकीचं निरीक्षण केल्यामुळे लिहायला स्फूर्ती मिळेल असं त्याला वाटे. याच काळात त्यानं बिहेवियरिझमची तत्त्वं पटल्यामुळे पाव्हलॉव्ह आणि वॉटसन यांच्या पुस्तकानं प्रभावित होऊन हार्वर्ड विद्यापीठात मानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला. त्यानं मानसशास्त्रात "प्राणिवर्तन' या विषयात डॉक्टरेट, तर "प्राण्यांची नससंस्था' या विषयावर पोस्ट डॉक्टरेट केली.
मानसशास्त्रीय तत्त्वं आणि विचारप्रणाली प्रयोगांच्या आधारेच मांडायला हवी, असं स्किनरचं ठाम मत होतं. "माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर आणि वागण्यावर आजूबाजूच्या वातावरणाचा आणि परिस्थितीचा परिणाम कसा होतो, याचा अभ्यास करणंही महत्त्वाचं आहे. मन, विचार, स्मृती वगैरे गोष्टी अस्तित्वातच नसतात; त्या आपण फक्त भाषेच्या सोयीसाठी वापरतो. आपल्याला फक्त बाहेरून काय केलं (स्टिम्युलस) म्हणजे त्याची काय प्रतिक्रिया (रिस्पॉन्स) मिळेल, याचाच अभ्यास करता येतो. (यालाच स्टिम्युलस-सिस्पॉन्स किंवा ड-ठ किंवा एस-आर असं म्हणतात). थोडक्यात, आपल्या मनाप्रमाणे निर्णय घेणारा स्वच्छंदी माणूस नसतोच, असं स्किनर म्हणायचा.
"ऑपरॅंट कंडिशनिंग' या कल्पनेमुळे स्किनरचं स्थान मानसशास्त्रात खूप मोठं मानलं जातं. आपल्याला एखाद्या प्राण्यानं जी कृती करायला हवी असेल, (उदाहरणार्थ, कबूतरानं चोचीनं टेबल टेनिस खेळणं) त्या कृतीचे लहान लहान भाग करायचे आणि या प्रत्येकाला "ऑपरॅंट' म्हणायचं. आता त्या प्राण्यानं केलेली हालचाल आपल्या ध्येयाकडे नेणारी असेल, तर त्या प्राण्याला बक्षीस देणं, नाही तर बक्षीस न देणं, असं सतत दर ऑपरॅंटला करत राहायचं. या "रिवॉर्ड आणि पनिशमेंट'च्या कंडिशनिंगमुळे तो प्राणी मग अपेक्षित कृती चटकन करायला लागतो. असं करत करत त्याला पाहिजे ते शिकावायचं. उदाहरणार्थ, जर कबूतरानं पिंजऱ्याच्या एका टोकापासून दुसऱ्यापर्यंत येऊन तिथे ठेवलेल्या पियानोच्या ठराविक "की'वर चोच दाबावी असं आपल्याला वाटत असेल तर ते कबूतर एक पाऊल जरी पियानोच्या दिशेनं पुढे आलं असेल तरी त्याला थोडंसं अन्न बक्षीस म्हणून द्यायचं, नाहीतर नाही द्यायचं. कबूतरानं योग्य दिशेनं स्टेप घेतली की पुन्हा त्याला बक्षीस द्यायचं. असं करत करत शेवटी कबूतर पियानोजवळ जाऊन आपली चोच पाहिजे त्या "की'वर आदळेपर्यंत हे सगळं चालू ठेवायचं. यालाच "ऑपरॅंट कंडिशनिंग' म्हणतात. याच पद्धतीनं लहान मुलंही बोलायला, गायला, नाचायला आणि खेळायला शिकतात, असं स्किनरला वाटे.
गर्विष्ठ असूनही स्किनरच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाची आणि ओघवत्या वाणीची लोकांवर चटकन छाप पडे. "आपल्या प्रत्येक कृतीमागे बक्षीस आणि शिक्षा (रिवॉर्ड अँड पनिशमेंट) यांचीच गणितं असतात,' असंच तो म्हणे. कंडिशनिंगमधलं हे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी त्यानं एका कबूतराला पियानोमधून एक विशिष्ट ट्यूनही वाजवायला शिकवली होती, तर दोन कबूतरं आपल्या चोचींनीच चक्क टेबल-टेनिस खेळत! स्किनरची ही प्रात्यक्षिकं बघून लोक थक्क होऊन जात. कित्येकदा त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे गदारोळ होई; पण यामुळे त्याला टेलिव्हिजनवर भाषण आणि मुलाखती देण्यासाठी अनेक बोलावणीही यायला लागली आणि तो जास्तच प्रसिद्ध होत गेला.
स्किनरचं "बिहेविरल मॉडिफिकेशन'चं तत्त्व मनोरुग्णांसाठी आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल मुलांना शिकवण्यासाठी आजही वापरलं जातं. 1940 च्या दशकात स्किनरनं याबाबत बॉस्टनजवळच्या मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये प्रयोग केले. योग्य वर्तणूक दाखवली तर रुग्णाला बक्षीस/शाबासकी द्यायची, असे ते प्रयोग होते. तिथल्या एका बाईनं नैराश्याच्या गर्तेत जाऊन खाणं-पिणंच सोडलं होतं. तिला फुलं, पुस्तकं, टीव्ही वगैरे गोष्टी आवडायच्या. मग मानसोपचारतज्ज्ञांनी तिला यातल्या कुठल्याच गोष्टी नसलेल्या एका खोलीत ठेवलं. तिथे तिला जेवण दिलं, पण तिनं काहीच खाल्लं नाही. नंतर त्यांनी खोलीत एक फुलांचा गुच्छ आणून ठेवला. तो बघितल्यावर दुसऱ्या दिवशी तिनं थोडं खाल्लं. त्यानंतर तिला आवडणारी आणखी एक गोष्ट खोलीत आणून ठेवल्यावर तिने आणखी थोडं खाल्लं. असं करत करत ती व्यवस्थित जेवायला लागली, तेव्हा पुस्तकं, टीव्ही अशा तिला आवडणाऱ्या अनेक गोष्टी तिला मिळाल्या. 18 महिन्यांनंतर ती पूर्णपणे बरी होऊन व्यवस्थितपणे राहत असल्याचं आढळून आलं होतं.
ही पद्धत सगळ्यांनाच लागू पडेल असं नाही, पण मतिमंद किंवा आत्ममग्न (ऑटिस्टिक) मुलांची आक्रमक वागणूक नियंत्रित करणं, त्यांना दैनंदिन आयुष्यातल्या आणि इतर गोष्टी शिकवणं यासाठी स्किनरची "बिहेवियरल मॉडिफिकेशन'चीच पद्धती वापरली जाते. व्यसनमुक्तीच्या उपचारांमध्येही "बिहेवियरल मॉडिफिकेशन'चे उपाय योजले जातात.
"ऑपरॅंट कंडिशनिंग' तंत्राचा वापर करून मुलांचं शिक्षणही सोपं करता येईल, असं स्किनरला वाटायला लागलं. कठीण, गुंतागुंतीच्या विषयांची फोड करून त्याचे सोपे, सुटसुटीत भाग पाडायचे आणि प्रत्येक भाग शिकवून झाल्यावर प्रश्न विचारायचे आणि उत्तर बरोबर आलं तर शाबासकी (रिवॉर्ड) द्यायची, या पद्धतीला मग "प्रोग्रॅंड इन्स्ट्रक्शन' असं म्हणायला लागले. या तंत्राचा उपयोग करून नवीन पाठ्यपुस्तकंही लिहिणं सुरू झालं. एखाद्या विषयाचे बारीक बारीक भाग करून तो समजावून सांगायचा आणि त्यावर प्रश्न विचारायचे. त्यांची उत्तरं बरोबर आली तर विद्यार्थ्यानं उत्साहानं पुढचं वाचायला सुरवात करायची. नाहीतर तो भाग नीट कळण्यासाठी पुन्हा वाचायचा. शिकण्याच्या या पद्धतीसाठी स्किनरनं काही यंत्रंही तयार केली होती. अमेरिकेत मग कुठलीही गोष्ट शिकताना "प्रोग्रॅम्ड इन्स्ट्रक्शन'ची लाटच आली. विज्ञान, गणित याबरोबरच टीव्ही कसा दुरुस्त करायचा, वगैरेही गोष्टींचं शिक्षण याच पद्धतीनं व्हायला लागलं. अनेक दशकं शिक्षण पद्धतीवर याचा प्रचंड प्रभाव पडला. आजही "कम्प्युटर बेस्ड ट्रेनिंग (सीबीटी)'च्या पद्धतीत स्किनरच्या "ऑपरॅंट कंडिशनिंग'चा उपयोग केला जातो.
पण नंतर त्यातल्या त्रुटीही शिक्षणतज्ज्ञांच्या लक्षात यायला लागल्या. या पद्धतीमुळे लहान लहान तुकडे समजत होते, पण विषयाचं संपूर्ण सार कळत नव्हतं. थोडक्यात, ही पद्धत "ऍटॉमिस्टिक' होती. मुख्य विषयाच्या संपूर्ण अवलोकनापासून सुरू करून मग त्यांच्या शाखांकडे किंवा विभागांकडे येणं, अशा उतरंडीचे किंवा हायरार्किकल पद्धतीचे जास्त फायदे आहेत, हे शिक्षणतज्ज्ञांच्या लक्षात आलं, तसेच उत्तर बरोबर आल्यावर त्याचं बक्षीस किंवा शाबासकी लगेच देण्याऐवजी काही काळानं दिलं तर त्याचा परिणाम जास्त चांगला होतो, हेही लक्षात आलं. पण तरीही स्किनरचं लगेच बक्षीस देण्याचं तत्त्व आजही सर्वत्र शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात वापरलं जातं.
स्किनरनं त्याच्या प्रयोगांसाठी खूप वेगवेगळी यंत्रं, उपकरणं तयार केली. आज जगभरात स्किनरनं आपल्या यांत्रिकी कौशल्याचा उपयोग करून तयार केलेले चक्रव्यूह (पझल बॉक्स) अजूनही वापरले जातात. यांना "स्किनर बॉक्स' किंवा "बेबी बॉक्स' असं म्हणतात. स्किनरने 1930 मध्ये हे उपकरण बनवलं. त्यात त्याच्या बायकोनंही त्याला मदत केली. त्याच्या बायकोनं प्रयोग करताना तर चक्क आपल्या मुलीचाच "सब्जेक्ट' म्हणून वापर केला होता.
1938 मध्ये स्किनरचे मानवी जीवनाचा अभ्यास वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून कसा करावा, याविषयी "दी बिहेवियर ऑफ ऑरगॅनिझम' आणि "सायन्स अँड ह्यूमन बिहेवियर' हे ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांची 1948 मध्ये "वॉल्डन टू' नावाची एक कादंबरीही खूपच गाजली. "बिहेवियरल इंजिनिअरिंग' वापरून निर्माण झालेल्या आदर्श समाजाचं चित्र त्यानं या कादंबरीत उभं केलं होतं. अमेरिकेतल्या लाखो लोकांच्या विचारसरणीवर तिचा प्रचंड परिणाम झाला.
आपल्यातला लेखक स्किनरनं सतत जिवंत ठेवला. त्यानं एक संक्षिप्त आणि दुसरं तीन खंडांतलं दीर्घ असं "दी पर्टिक्युलर्स ऑफ माय लाइफ' या नावानं दोन आत्मचरित्रं लिहिली. त्याच्या "दी टेक्नॉलॉजी ऑफ टीचिंग' आणि "अबाऊट बिहेवियरिझम' या पुस्तकात त्यानं आयुष्यभर केलेल्या संशोधनाची आणि विकसित केलेल्या संकल्पनांची माहिती दिलीय. "साहित्यिकांना फारसं काहीच कळत नाही. यामुळेच मी साहित्याकडून मानसशास्त्रकडे वळलो,' असं स्किनरनं एका मुलाखतीत गमतीनं म्हटलं. "प्रयोग केलेल्यापैकी इतर लोकांपेक्षा उंदीर आणि कबूतरं अशा प्राण्यांवर माझ्या विचारांचा जास्त परिणाम झाला,' असं तो उपरोधानं म्हणत असे.
हे सगळं असलं तरी माणसांच्या वागणुकीच्या बाबतीत बिहेवियरिझम संपूर्णपणे स्पष्टीकरण देऊच शकत नव्हतं. व्यक्तिमत्त्व, प्रेरणा (मोटिव्हेशन), तर्कविवेकबुद्धी, वेगवेगळ्या भावना आणि सर्जनशीलता या खूप गुंतागुंतीच्या असतात. फक्त बिहेवियरिस्ट थिअरी या सगळ्याचं स्पष्टीकरण करू शकत नाही, हेही आता समजायला लागलं होतं. याच सुमारास "आर्टिफिशियल इंटेलिजन्स' आणि "इन्फर्मेशन प्रोसेसिंग' यांच्यावर संशोधन चालू झालं. त्यातूनच "कॉग्निटिव्ह सायन्स' या ज्ञानशाखेमध्ये खूपच भर पडली. यानंतर बिहेवियरल सायकॉलॉजीचा ऱ्हास झाला आणि कॉग्निटिव्ह सायन्सचा विकास झाला. पुढची अनेक दशकं कॉग्निटिव्हिस्ट विचारसरणी अमेरिकन मानसशास्त्रावर राज्य करणार होती. पण तरी अनेक मनोविकारांवर बिहेवियर मॉडिफिकेशनची उपचार पद्धती मात्र अनेक दशकं चालूच राहिली आणि अजूनही चालूच आहे! स्किनरला त्याच्या कारकिर्दीत खूपच सन्मान मिळाले. त्याची तुलना सिग्मंड फ्रॉईडसारख्या विख्यात मानसोपचार तज्ज्ञासोबत केली गेली. 18 ऑगस्ट 1990 रोजी कॅन्सरनं स्किनरचा मृत्यू झाला.
सकाळ सप्तरंग मध्ये श्री.अच्युत गोडबोले यांचे ’रंग मनाचे’ हे नवीन सदर सुरु झाले आहे. ते इथे संकलित करत आहे.
Saturday, October 15, 2011
बिहेवियरिस्ट्स थॉर्नडाईक-वॉटसन
April 24, 2011
एखाद्या अळीजवळ काडीसारखा पदार्थ नेला (स्टिम्युलस) तर अळी संपूर्ण शरीर आखडून घेते (रिस्पॉन्स), त्याप्रमाणे प्राण्यांच्या इतर हालचालीही या "रिफ्लेक्स ऍक्शन्स'सारख्याच असतात. कुठल्या स्टिम्युलसला कुठला प्राणी कसा रिस्पॉन्स देतो, त्यावरून त्याची वागणूक ठरते. या थिअरीतूनच "बिहेवियरिझम'चा जन्म झाला. या "बिहेवियरिझम'चे नियम शोधण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं थॉर्नडाईक (1874 - 1947) या मानसशास्त्रज्ञानं केला.
थॉर्नडाईकनं "कोंबड्याची बुद्धिमत्ता आणि त्यांच्या इंस्टिक्ट्स' यावर संशोधन केलं. कोंबड्यांच्या पिल्लांसाठी थॉर्नडाईकनं एक चक्रव्यूह तयार करून त्याच्या एका कोपऱ्यात अन्न ठेवलं. त्या पिल्लांनी चक्रव्यूह पार केल्यावरच त्यांना ते अन्न मिळणार होतं. पण चक्रव्यूहाच्या फसव्या रचनेमुळे पिल्लं बऱ्याचदा गरगर फिरून मूळ ठिकाणीच परत येत. बऱ्याच प्रयत्नांनंतर जेव्हा एखादं पिल्लू त्या अन्नापर्यंत पोचे, तेव्हा थॉर्नडाईक त्याला पुन्हा चक्रव्यूहाच्या मूळ ठिकाणी आणे. आता ते दुसऱ्या वेळी काही "शिकून' अन्नापर्यंत पोचायला कमी वेळ घेतं का, हे त्याला बघायचं होतं. जसजसा एखादा प्राणी जास्त वेळा प्रयत्न करे तसतसा या शिकण्यामुळे तीच गोष्ट पुन्हा करण्याचा त्याचा वेळ कमी कमी होत जाई. मग त्यानं कोंबड्या, मांजरं, कुत्री, माकडं अशा अनेक प्राण्यांवरही अनेक वेळा असेच वेगवेगळे प्रयोग केले. ते प्राणी कसे "शिकतात' यावर संशोधन करून त्यांची शिकण्याची वेळ एका आलेखात मांडली. त्यालाच मग "लर्निंग कर्व्ह' म्हणायला लागले.
""मला कुठल्याही वंशाची किंवा क्षमतेची एक डझनभर निरोगी मुलं द्या; त्याचं संगोपन करून मी मनात आणेन तसं या मुलांना घडवू शकेन. त्यांना डॉक्टर, वकील, कलाकार, व्यापारी, एवढंच कशाला, पण भिकारी किंवा चोरसुद्धा बनवून दाखवेन.'' जॉन बी. वॉटसनचे (1878-1958) हे उद्गार मानसशास्त्राच्या इतिहासात खूपच गाजले. माणसाची जडणघडण आनुवंशिकतेने आलेल्या गुणांमुळे (नेचर) होते, का त्याच्यावरच्या संस्कारांमुळे आणि बाह्य परिस्थितीमुळे (नर्चर) होते, याविषयी मानसशास्त्रात वाद होता. वॉटसननं "नेचर'ऐवजी "नर्चर'ला, म्हणजेच बाह्य वातावरणाला जास्त महत्त्व दिलं आणि हे सिद्ध करण्याकरता त्यानं "सी-बर्डस्'सारख्या अनेक प्राण्यांवर अनेक प्रयोग केले. हॉपकिन्स विद्यापीठात प्राध्यापक असलेला वॉटसन स्वतःच्या कल्पना इतरांना पटवून देणारा निष्णात सेल्समन होता. यामुळेच तो बिहेवियरिस्ट चळवळीचा नेता बनला.
आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा वॉटसन अत्यंत ठामपणानं आणि आत्मविश्वासानं बोले. कुठल्याही समारंभात तो एक आकर्षणाचा भाग असे. तो देखणा असल्यामुळे आयुष्यभर त्याची अनेक मुलींशी लफडी झाली; पण त्याच्या या बाह्य रूपामागे एक अत्यंत असुरक्षित व्यक्तिमत्त्व दडलेलं होतं. कुठल्याही गंभीर भावनांविषयी चर्चा सुरू झाली की तो तिथून चक्क पळ काढे. त्याच्या स्वतःच्या मुलांचेही त्यांच्या लहानपणी त्याने कधी लाड केले नव्हते. त्याला त्याची दुसरी बायको आवडत असे, पण तिचा मृत्यू झाल्यावर तिच्याविषयी संपूर्ण आयुष्यात तो एकही अक्षर बोलला नाही. अशा या त्याच्या स्वभावामुळे रुग्णानं स्वतःच्या भावनांविषयी डॉक्टरांपाशी उघडपणे बोलण्यावर विश्वास ठेवणाऱ्या फ्रॉईडच्या थिअरीजमध्ये त्याला रस न वाटणं आणि माणसांपेक्षा उंदरांवर त्यानं प्रयोग करणं, हेही साहजिकच होतं!
1878 मध्ये साऊथ कॅरोलिनामधल्या ग्रीनव्हील शहरात वॉटसन जन्मला. त्याचे वडील खूपच आक्रमक होते, तर आई मात्र अत्यंत धार्मिक आणि शांत होती. त्यामुळे वॉटसनच्या समोर दोन परस्परविरोधी आदर्श लहानपणापासूनच ठेवले गेले. वॉटसनच्या गावंढळ वागणुकीमुळे त्याला वर्गातली मुलं सतत चिडवायची. वॉटसन मग खूपच वैतागायचा. वॉटसन 13 वर्षांचा असताना त्याचे वडील एका बाईबरोबर पळून गेले. या गोष्टीचा त्याच्यावर बराच परिणाम झाला होता. यामुळे शाळेत तो जेमतेम पास होऊन पुढच्या इयत्तेत ढकलला जायचा. त्याचं त्याच्या मित्रांशी कधीच पटायचं नाही. मित्रांबरोबर बॉक्सिंग करत असताना दोघंही रक्तबंबाळ होईपर्यंत तो ठोसे लगावतच राही. तो वंशद्वेष्टाही होता. तिथल्या काळ्या लोकांना पकडून तो बदडत असे. त्याला एकदा वंशद्वेषाबद्दल, तर एकदा बंदूक बाळगल्याबद्दल अटकही झाली होती.
शिकागो विद्यापीठात प्रथम तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून वॉटसन मानसशास्त्राकडे वळला. अभ्यास करतानाच पैसे मिळवण्यासाठी काही काळ वेटर, तर काही काळ मानसशास्त्राच्या प्रयोगशाळेतल्या उंदरांची काळजी घेणारा सेवक किंवा सफाई कामगार, असे अनेक उद्योग त्यानं केले. या सगळ्याचा खूपच ताण पडल्यानं त्याचा नर्व्हस ब्रेकडाऊन झाला. त्यातून बाहेर आल्यावर 1901-02 मध्ये त्याने डॉक्टरेट पूर्ण केली. लहान उंदीर कशा तऱ्हेनं शिकतात आणि माणूस कसा शिकतो, यांचा काय संबंध आहे, याविषयीचा त्यानं प्रबंधही लिहिला होता.
"प्राण्यांच्या वागणुकीवरून (बिहेवियर) त्यांच्या मनोवस्थेविषयी अंदाज बांधता येतात,' असं वॉटसन म्हणे. त्यानं आणि जेम्स ऍग्नेला यांनी स्वतंत्रपणे "बिहेवियरिझम' हा शब्द निर्माण केला. 1913 मध्ये त्यानं "सायकॉलॉजिकल रिव्ह्यू'मध्ये याविषयी एक लेख लिहिला. त्याला "बिहेवियरिस्ट मॅनिफेस्टो' असं म्हटलं जातं. तेव्हापासूनच औपचारिकरीत्या बिहेवियरिस्ट विचारसरणी सुरू झाली. "जाणीव', "मनोवस्था', एवढंच काय, पण "मन' असे शब्दही वापरणं वॉटसननं सोडून दिलं. "आपली वागणूक (कुठल्या स्टिम्युलसला कसा रिस्पॉन्स) हाच मानसशास्त्राचा पाया आहे,' असं वॉटसन म्हणे. आणि एकदा जाणीव ही आपल्या अभ्यासक्षेत्रातून काढून टाकली की मग प्राणी आणि माणूस या दोघांवरही प्रयोग केले तरी ते सारखेच, असं त्याचं मत होतं. वॉटसननं "कंडिशन्ड रिफ्लेक्स'ची पद्धत सुचवली.
1920 मध्ये वॉटसन आणि रोझली रेनर यांनी केलेला "अल्बर्ट बी'चा प्रयोग मानसशास्त्राच्या इतिहासात खूपच गाजला. अल्बर्ट हा 11 महिन्यांचा, कधीही न रडणारा शांत मुलगा होता. अल्बर्टच्या मनात कुठल्याही केसाळ प्राण्यांबद्दल आणि वस्तूंबद्दल भीती निर्माण करायचं वॉटसननं ठरवलं. हा प्रयोग सुरू करण्यापूर्वी अनेक दिवस अल्बर्ट एका पांढऱ्या उंदराबरोबर बराच वेळ खेळत बसे. पण अल्बर्ट 11 महिन्यांचा झाल्यावर जेव्हा त्या उंदराला पकडायला गेला तेव्हा वॉटसननं त्याच वेळी त्याच्या डोक्यामागे एका हातोड्यानं मोठा आवाज केला. अल्बर्ट ते ऐकून एकदम दचकला आणि घाबरला. त्याच्या चेहऱ्यावर प्रथमच भीती दिसली. काही दिवसांनी अल्बर्ट पूर्वीचा अनुभव विसरून गेला असेल असं त्यांना वाटलं. त्यांनी पुन्हा त्याच्यासमोर एक पांढरा उंदीर ठेवला. अल्बर्टनं डावा हात पुढे करून त्या उंदराला स्पर्श करताच त्याच क्षणी त्यांनी त्या हातोड्यानं तोच मोठा आवाज काढला. त्याबरोबर अल्बर्ट भीतीनं दचकलाच! उंदीर पकडणं आणि आवाजामुळे वाटणारी भीती यांच्या संबंधाचं समीकरण अल्बर्टच्या डोक्यात पक्कं व्हायला लागलं होतं. पुन्हा प्रयोग सुरू झाले. पुन्हा तो पांढरा उंदीर ठेवण्यात आला. या वेळी अल्बर्टनं आपल्या उजव्या हातात उंदीर पकडण्याचा प्रयत्न केला. पण याही वेळी वॉटसन आणि कंपनीनं त्या हातोड्याचा मोठा आवाज केला. अल्बर्ट पुन्हा रडायला लागला. यानंतर सहाएक वेळा हाच प्रयोग झाला. आता उंदराचं दृश्य आणि भीती याचं नातं अल्बर्टच्या डोक्यात पूर्णपणेच पक्कं झालं होतं. शेवटी पांढरा उंदीर समोर दिसल्याबरोबर अल्बर्ट त्याला बघून कुठलाच आवाज न करतासुद्धा घाबरायला लागला. त्याच्यामध्ये "कंडिशन्ड फिअर रिस्पॉन्स' निर्माण करम्यात वॉटसन आणि रेनर यशस्वी झाले होते. अल्बर्टनं आता त्या भीतीचं "जनरलायझेशन' केलं होतं. आता त्याला अंगावर केस असणाऱ्या कुठल्याही प्राण्याची भीती वाटायला लागली होती.
अल्बर्टला डी-कंडिशनिंग करून याच्या उलट्या पद्धतीनं हळूहळू त्याची भीती कमी करायला पाहिजे होती. पण तसं न केल्यानं त्याचं मोठेपणी काय होणार, याविषयी बरेच वाद झाले. अल्बर्टची आई या प्रयोगानंतर त्याच्याबरोबर दूर कुठेतरी राहायला गेल्यामुळे अल्बर्टविषयी देशभर बराच काळ गूढ होतं. शेवटी हॉल पी. बेक या मानसशास्त्रज्ञानं त्याचा शोध घेतला. अल्बर्ट बीचं खरं नाव डग्लस मेरिट होतं. वयाच्या सहाव्या वर्षी तो मेंदूत पाणी झाल्यामुळे मृत्युमुखी पडला होता, पण वॉटसननं बिहेवियरिझमचा पाया घातला होता. आपण ठराविक तऱ्हेचं वातावरण निर्माण करून कुठल्याही माणसाची वागणूक बदलू शकतो, हेच बिहेवियरिझमचं म्हणणं होतं.
हे प्रयोग करत असतानाच वॉटसन रेनरमध्ये पूर्णपणेच गुंतला. त्यामुळे त्यानं त्याची बायको मेरी हिच्याशी घटस्फोट घेऊन रेनरशी लग्न केलं. त्या काळी कुठल्याही प्राध्यापकाची अशी वागणूक गुडनाऊ विद्यापीठात भयानक वाईट मानली जायची. त्यामुळे वॉटसननं राजीनामा दिला आणि तो तडक न्यूयॉर्कला निघून गेला. क्षणार्धात त्याची देदीप्यमान कारकीर्द संपुष्टात आली होती. त्यानंतर जे. वॉल्टर थॉम्प्सन या नावाजलेल्या जाहिरात कंपनीत तो मानसशास्त्राचा सल्लागार झाला. पॉंड्सच्या कोल्ड क्रीमचया एका लोकप्रिय जाहिरातीत वापरण्यासाठी तर त्यानं स्पेन आणि रोमानिया या देशांतल्या राण्यांनी या क्रीमविषयी काढलेले गौरवोद्गार मिळवले होते! मॅक्स्वेल कंपनीची कॉफी खपावी म्हणून वॉटसननं शोधून काढलेली "कॉफी ब्रेक' ही कल्पना इतकी सर्वमान्य झाली, की मोठमोठ्या मीटिंग्जचे वारंवार असे "कॉफी ब्रेक्स' व्हायला लागले.
बरीच वर्षं वॉटसन पुस्तकं, लेख आणि प्रबंध लिहीतच राहिला. बिहेवियरिझमचा तो कट्टर पुरस्कर्ता होता, पण वॉटसननं आता प्रयोग करणं मात्र पूर्णपणे बंदच केलं होतं. 1930 च्या नंतर त्यानं लिखाणही बंद केलं. आपल्या कनेटिकटमधल्या मोठ्या इस्टेटीवर तो आणि रेनर राहायला गेले. त्यांचं आयुष्य शांततेत, सुखात चाललेलं असतानाच अतिसाराचं निमित्त होऊन रेनर तिशीत असतानाच मरण पावली. 58 वर्षांच्या वॉटसनला याचा धक्काच बसला. यानंतर त्यानं चक्क शेती केली. दिवसेंदिवस तो स्वतःविषयी जास्तच निष्काळजी होत गेला. तो बराच लठ्ठही झाला होता. तो एकाकी बनत चालला होता. 1958 मध्ये वॉटसन मरण पावला!
आज वॉटसनची बिहेवियरिझमची तत्त्वं तंतोतंत कोणीच मानत नाहीत, पण तरीही वॉटसनच्या क्रांतिकारी विचारांनी जवळपास अर्धशतक एवढा काळ अमेरिकन मानसशास्त्रावर राज्य केलं.

इव्हान पाव्हलॉव्ह
April 17, 2011
इव्हान पाव्हलॉव्ह (1849-1936) हा एक शरीरशास्त्राचा (फिजिऑलॉजिस्ट) संशोधक होता. त्यानं आयुष्यातली निम्मी वर्षं पचनसंस्थेविषयी संशोधन केलं. कुत्र्यांच्या लाळ गळण्याच्या प्रक्रियेत त्याला खूपच कुतूहल वाटायला लागलं. यातूनच "कंडिशन्ड रिफ्लेक्सेस' या कल्पनेचा जन्म झाला. कोण होता हा इव्हान पाव्हलॉव्ह?
कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या इव्हान पाव्हलॉव्हचा जन्म 14 सप्टेंबर 1849 रोजी रशियातल्या ऱ्याझान या गावी झाला. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. इव्हानची भावंडं कुपोषणाला बळी पडली होती. इव्हान नशिबानं जेमतेम जिवंत राहिला. इव्हानचे वडील धर्मोपदेशक होते. रीतिरिवाजाप्रमाणे इव्हान धर्मगुरूच व्हायचा, पण इव्हानला शिक्षणाच्या बाबतीत त्याच्या वडिलांनी खूपच स्वातंत्र्य दिलं होतं.
शाळेतल्या एका शिक्षकानं इव्हानमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण केलं. पुढे पीटर्सबर्ग विद्यापीठात मूलद्रव्यांविषयी दस्तुरखुद्द मेंडेलिव्ह याच्याकडून पाव्हलॉव्ह शिकला. तिथे एका पुस्तकात त्यानं माणसाचं शरीर आणि मन यांच्यातल्या संबंधांविषयी वाचलं. त्यात रस निर्माण झाल्यामुळे पाव्हलॉव्हनं वैद्यकीय शिक्षण घ्यायचं ठरवलं. 1879 मध्ये "ऍकॅडमी ऑफ मेडिकल सर्जरी'मध्ये पाव्हलॉव्हला सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आलं. त्याच वर्षी पाव्हलॉव्हनं पीटर्सबर्गमध्येच एक मोडकीतोडकी प्रयोगशाळा आपल्याच बचतीतून काढली.
1881 मध्ये पाव्हलॉव्हनं सेराफिमा (सारा) या शिक्षिकेशी लग्न केलं, पण पाव्हलॉव्हचा गरिबीबरोबरचा झगडा चालूच होता. तरीही कित्येकदा पाव्हलॉव्ह महिन्याचा पगारच घरी आणायला विसरे. शेवटी प्रचंड खडखडाट झाला की मग पाव्हलॉव्ह स्वतःच्या पगाराची चौकशी करे. एकदा त्यानं प्रयोगासाठी काही फुलपाखरं एका हिवाळ्यात आणून ठेवली होती. उष्णता निर्माण करण्यासाठी इंधनासाठी पाव्हलॉव्हकडे पैसे नव्हते. प्रचंड थंडीमुळे ती मरून गेली.
आपल्या शरीराच्या बाबतीत कित्येक गोष्टी आपल्या नकळतच घडत असतात. डोळ्याकडे कचरा येतोय हे बघून डोळे आपोआपच उघडझाप करतात किंवा आपल्याजवळ कुठलासा मोठा आवाज झाला तर आपण एकदम दचकतो. आपल्या श्वासनलिकेत काही अडकलं तर आपल्याला आपोआप ठसका लागतो. या सगळ्या गोष्टींना "अहेतुक प्रतिक्रिया (रिफ्लेक्स ऍक्शन)' असं म्हणतात. पाव्हलॉव्हनं यात संशोधन करायचं ठरवलं.
1890 मध्ये पाव्हलॉव्हला मानसशास्त्र विभाग (डिपार्टमेंट ऑफ सायकॉलॉजी) सुरू करण्यासाठी "इन्स्टिट्यूट ऑफ एक्स्परिमेंटल मेडिसिन'मध्ये आमंत्रित केलं गेलं. पाव्हलॉव्ह आपल्या कामात खूपच दक्ष असे.
पाव्हलॉव्हला पचनसंस्था आणि एकूणच शरीरशास्त्र यांच्यामध्ये खूप रस होता. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा तोंडातून जी लाळ सुटते आणि पोटात जे जाठररस निर्माण होतात, त्यामुळे अन्न पचायला मदत होते, पण ही लाळ आणि हे जाठररस निर्माण व्हावेत यासाठी मेंदूतून मज्जातंतूंद्वारा त्या त्या अवयवांना सूचना मिळाव्या लागतात. अन्न खाण्याचा, तो पचण्याचा आणि त्यासाठी मेंदूतून मज्जातंतूंद्वारा मिळणाऱ्या सूचनांचा पाव्हलॉव्हला अभ्यास करायचा होता. पाव्हलॉव्हनं या पचनसंस्थेवरच्या संशोधनात कुत्र्यांचा वापर केला. त्यानं एका कुत्र्याच्या पोटात काय प्रक्रिया चालल्या आहेत ते समजून घेण्यासाठी कुत्र्याच्या पोटाला भोक पाडून जठरातलं सगळं बघता येईल अशी व्यवस्था केली. पण हे करताना मेंदूपासून पोटाकडे जाणाऱ्या मज्जातंतूंना कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली. सर्वप्रथम जेव्हा त्या कुत्र्यानं अन्न खाल्लं तेव्हा ते अन्ननलिकेमार्फत कुत्र्याच्या पोटात नेलं आणि त्याच्या पोटात जाठररस निर्माण झाले, हे पाव्हलॉव्हनं पाहिलं. पण आता पाव्हलॉव्हनं आणखी एक गोष्ट केली. त्यानं त्या कुत्र्याच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करून कुत्र्याची अन्ननलिका बांधून ठेवली आणि त्याच्या गळ्याशी एक भोक पाडून कुत्र्यानं तोंडावाटे खाल्लेलं अन्न पोटात न जाता त्या भोकावाटे शरीराबाहेर जाईल अशी व्यवस्था केली. आता पाव्हलॉव्हनं कुत्र्यासमोर अन्न ठेवलं. त्याबरोबर कुत्र्यानं ते खाऊन टाकलं. पण ते पोटात न जाता शरीराच्या बाहेरच गेलं. पण या वेळी पाव्हलॉव्हला एक आश्चर्यकारक गोष्ट लक्षात आली. जरी प्रत्यक्ष अन्न पोटात गेलं नसलं तरीही पोटात जाठररसाचा मोठ्या प्रमाणावर स्राव सुरू झाला. यामुळे या स्रावाचा पोटात प्रत्यक्ष अन्न जाण्याशी संबंध नसून, तो शरीरातल्या मज्जासंस्थांतून येणाऱ्या संदेशांश
ी संबंध आहे आणि समोर अन्न कुत्र्यानं बघितल्यामुळे त्या दृश्याचे संदेश कुत्र्याच्या मेंदूपर्यंत गेले असले पाहिजेत आणि त्यामुळेच मेंदूनं मज्जातंतूंच्याद्वारा पोटात जाठररस तयार करण्याच्या सूचना दिल्या असाव्यात, हेही पाव्हलॉव्हनं ताडलं. थोडक्यात, अन्न पचवण्यासाठी मेंदूकडून जठराला ज्या सूचना मिळतात त्यामुळे तो जाठररस तयार होत होता; प्रत्यक्ष अन्न जठरात गेल्यामुळे नाही, असा त्यानं निष्कर्ष काढला. हे प्रयोग करण्यासाठी पाव्हलॉव्हला खूपच धीर धरावा लागला. त्याचे पहिले 30 प्रयोग अयशस्वी ठरले, पण हार न मानता त्यानं चिकाटीनं प्रयोग तसेच चालू ठेवले. शेवटी त्याला यश मिळालं तेव्हा मात्र त्याच्या आनंदाला सीमाच राहिली नव्हती!
कुत्र्यांवर प्रयोग करताना पाव्हलॉव्हला एक गंमतशीरच गोष्ट आढळली. लाळ गळण्याच्या प्रक्रियेतसुद्धा प्रत्यक्ष पचनापेक्षा ही मानसिकताच डोकावत होती. म्हणजे प्रत्यक्ष अन्न तोंडात जाण्यामुळेच नव्हे, तर अन्नाच्या फक्त विचारांनीसुद्धा मेंदूकडून संदेश गेल्यामुळे लाळ गळायला सुरवात होत होती. पाव्हलॉव्हनं यावर खोलवर जाऊन प्रयोग करायचं ठरवलं. कुत्र्यांवर बाह्य आवाजाचा किंवा गोष्टींचा परिणाम होऊ नये म्हणून पाव्हलॉव्हनं हे प्रयोग चक्क साउंडप्रूफ इमारतीत केले.
हा प्रयोग करण्यासाठी पाव्हलॉव्हनं कुत्र्यांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया करून तोंडातली लाळ पोटात जाण्याऐवजी एका पिशवीत गोळा करण्याची व्यवस्था केली. आता त्याला वेगवेगळ्या परिस्थितीत किती लाळ जमा होतेय आणि तिचे रासायनिक घटक कुठले आहेत, याविषयी प्रयोग करणं शक्य होणार होतं.
आता पाव्हलॉव्हनं कुत्र्यांना अन्न देण्याअगोदर काही काळ वेगवेगळ्या चेतना दिल्या. उदाहरणार्थ, घंटा वाजवल्यानंतर लगेच अन्न देणं. असं बऱ्याचदा केल्यानं कुत्र्याच्या मेंदूत त्या घंटेचा आवाज आणि अन्न यांचे संबंध पक्के झाले. यामुळे कालांतरानं फक्त घंटा वाजवली आणि प्रत्यक्ष अन्न आणलंच नाही, तरी कुत्र्याला अन्नाची आठवण आल्यामुळे तोंडाला लाळ सुटत होती आणि ती त्या भांड्यात जमा होत होती. मग पाव्हलॉव्हनं त्यांची मोजमापं केली. या घंटेचा जसा स्टिम्युलस होता, तसेच अनेक वेगवेगळ्या चेतना देऊन दर वेळी त्यानंतर अन्न कुत्र्याच्या पुढे ठेवून त्यानं त्याचा कुत्र्याच्या लाळेवर परिणाम बघितला. त्याच्या चेतनाही गंमतशीरच होत्या. कुठल्याशा वाद्यांचे किंवा फटाक्यांचे आवाज काढून लगेच खायला देणं किंवा त्यांना काळ्या रंगाचे पॅटिस दाखव, गर्मीत ठेव, त्यांच्या शरीराला वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श कर, दिवे लाव वगैरे गोष्टी अन्न देण्यापूर्वी करणं, असले अनेक प्रकार त्यानं केलं. या सगळ्या प्रयोगांत कुत्र्यांना चेतनांमुळे "कंडिशन' करून नंतर प्रत्यक्ष अन्न न देता फक्त चेतनाच दिली, तरीही कुत्र्यांना लाळ सुटत होती, असं पाव्हलॉव्हच्या लक्षात आलं.
यामुळे पाव्हलॉव्हला दोन तऱ्हेचे रिफ्लेक्सेस असतात हे लक्षात आलं. एक म्हणजे "अनकंडिशन्ड रिफ्लेक्स'. उदाहरणार्थ, प्रत्यक्ष अन्न खायला लागल्यावर जेव्हा तोंडात लाळ सुटते तेव्हा हा "अनकंडिशन्ड रिफ्लेक्स' काम करत असतो. दुसरा प्रकार म्हणजे "कंडिशन्ड रिफ्लेक्स'चा. जेव्हा आपल्याला मिळणार आहे असं फक्त वाटल्यामुळे कुत्र्याच्या तोंडाला लाळ सुटत होती तेव्हा हा "कंडिशन्ड रिफ्लेक्स' काम करत असतो.
कुत्र्याला अन्न देताना बऱ्याच वेळा घंटानाद केला तर त्यामुळे केवळ सराव आणि सवय यातून आपण नवे वागणुकीचे प्रकार शिकतो, हे त्यानं दाखवून दिलं. यालाच "कंडिशन्ड लर्निंग' म्हणतात. लोक मग पाव्हलॉव्हच्या या प्रयोगावर अनेक विनोद करायला लागले. आपल्या मुलाला जेवण्यासाठी हाक मारायची असेल तर पाव्हलॉव्हची बायको हाक न मारता फक्त घंटा वाजवेल, असंही लोक चेष्टेनं म्हणत!
"पचनसंस्थेचं कार्य' या विषयातलं त्याचं संशोधन आणि त्याचे प्रयोग यांच्यामुळे पाव्हलॉव्ह जगप्रसिद्ध झाला. 1917 मध्ये रशियात राज्यक्रांती होऊन लेनिनच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट सरकार स्थापन झालं. त्यानंतर रशियातल्या राजकीय परिस्थितीवर आपली मतं पाव्हलॉव्ह बेधकपणे मांडू लागला. रशियातल्या क्रांतीमुळे सर्वसामान्य जनता भरडली जाते असं तो सार्वजनिक भाषणातही स्पष्टपणे मांडत असे. रशियातल्या राजकीय-सामाजिक वातावरणाला कंटाळून 1922 मध्ये त्यानं आपली बदली परदेशात व्हावी, अशी लेनिनकडे मागणीही केली होती. पण पाव्हलॉव्हच्या शैक्षणिक संशोधनाचं महत्त्व लेनिन ओळखून होता. निधड्या व्यक्तिमत्त्वाचा, निर्भीडपणे मतं व्यक्त करणारा संशोधक म्हणून तो ओळखला जाई.
पाव्हलॉव्हनं टीका करूनही कम्युनिस्ट पक्ष आणि सोव्हिएट सरकार यांनी नेहमीच पाव्हलॉव्ह आणि त्याच्या सहकाऱ्यांना त्यांच्या संशोधनकार्यात भरभरून सहकार्य केलं. सोव्हिएट युनियन तर त्या काळी शरीरविज्ञानशास्त्राच्या अभ्यासाचं एक प्रमुख केंद्र बनलं. पाव्हलॉव्हनं आपली सगळी शक्ती वैज्ञानिक सुधारणांसाठी पणाला लावली. त्यानं जगभर शरीरविज्ञानशास्त्राच्या संस्था यशस्वीपणे उभारण्यात स्वत:ला झोकून दिलं आणि अनेक बुद्धिवंतांचा समावेश असलेल्या संस्था यशस्वीपणे उभ्या केल्या. अमाप क्षमता असलेले त्याचे शिष्य जगभर पसरले.
1921 मध्ये पाव्हलॉव्हनं विज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर अतुलनीय कार्य केल्याबद्दल गौरवोद्गार असलेल्या एका विशेष प्रमाणपत्रावर लेनिनची स्वाक्षरी होती. 1904 मध्ये अपार संशोधनाबद्दल पाव्हलॉव्हला नोबेल पारितोषिक तर मिळालंच, पण जागतिक स्तरावरही अनेक मानसन्मान मिळाले.
पाव्हलॉव्हमधला चिकित्सक संशोधक शेवटपर्यंत जागाच होता. न्यूमोनियानं त्रस्त असतानाही आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांची बारीकसारीक नोंदही तो ठेवत असे. त्या वेळी जर कोणी त्याला फोन केला तर, "पाव्हलॉव्ह आता मरणाच्या वाटेवर आहे, पण सध्या तो खूप कामात आहे,' असं बोलूनच तो फोन ठेवत असे. या असामान्य संशोधकानं "बिहेवियरल सायन्स (वर्तनशास्त्र)' या नावाची स्वतंत्र शाखाच निर्माण केली. सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी यांच्या मागे तो कधी लागला नाही. मृत्यू येईपर्यंत पाव्हलॉव्ह मानसशास्त्रीय समस्यांवर अभ्यास करीत राहिला. लेनिनग्राड येथे 27 फेब्रुवारी 1936 रोजी पाव्हलॉव्हचं निधन झालं.

फ्रॉईड आणि युंग
April 10, 2011
फ्रॉईड आणि युंग यांच्यात कितीतरी गोष्टींत टोकाचा फरक होता. फ्रॉईड हा कमालीचा नास्तिक, तर युंग देव आणि दैव दोन्ही मानणारा होता. इतकंच नव्हे तर, युंगचा नशिबाबरोबरच परलोक, चमत्कारांवरही विश्वास होता; तर फ्रॉईडचा यापैकी कशावरच नव्हता. युंग पॅरासायकॉलॉजी मानत असे, तर फ्रॉईड मानत नसे. युंगला गटे आवडे तर फ्रॉईडला शेक्सपिअर आवडे. अर्थातच त्यांच्यात असे कितीतरी बाबींविषयी असलेले हे मतभेद अखेरीस पराकोटीला गेलेच!
फ्रॉ ईड आणि त्याचा शिष्य/मित्र युंग यांच्यातले संबंध "तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना' असेच होते! फ्रॉईडच्या मानसशास्त्रीय प्रणालीनं प्रभावित होऊन इ. स. 1906 पासून युंगनं फ्रॉईडला भेटण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला होता. युंगनं त्याच्या "स्टडीज इन वर्ड असोसिएशन'ची एक प्रत फ्रॉईडला व्हिएन्नाला पाठवून दिली. फ्रॉईडनं ती वाचली आणि त् याला ती प्रचंड आवडली. कालांतरानं 1907 मध्ये युंगची फ्रॉईडशी गाठ पडली. त्या वेळी फ्रॉईडनं आपल्या त्या दिवसाच्या सगळ्या अपॉईंटमेंट्स रद्द केल्या आणि ते दोघं तब्बल 13 तास आपापसांत चर्चा करीत होते. त्यांना वेळेचं, भुकेचंही भान उरलं नव्हतं. "माझ्या आयुष्यातला पहिलाच महत्त्वाचा माणूस' म्हणून फ्रॉईडनं या भेटीचं वर्णन करून ठेवलं होत ं. फ्रॉईडला तो "मॅग्निफिसंट' वाटला होता. त्यानंतर त्या दोघांमध्ये सतत पत्रव्यवहार होत राहिला. सुरवातीच्या काळात या दोघांमधील संबंध फारच घनिष्ठ होते. फ्रॉईडच्या पाठिंब्याम ुळेच युंग "इंटरनॅशनल सायकोऍनालिटिकल असोसिएशन'चा अध्यक्ष झाला होता. युंग आणि फ्रॉईड या दोघांचा स्वप्नावर विश्वास होता. "स्वप्नं या आपल्या अनकॉन्शस मनाच्या खिडक्या आहेत' असं ते मानायचे. स्वप्नातून आत बघितलं, की आपल्याला अनकॉन्शस मनात डोकावता येतं, असं त्यांना वाटायचं. पण त्या स्वप्नांचा अर्थ कसा लावायचा, या विषयी मात्र दोघांनी दोन वेगवेगळ्या वाटा निवडल्या.
फ्रॉईडच्या विचारांशी सहमत असलेले विचारवंत अनुयायी आणि फ्रॉईड स्वत:, असे दर आठवड्याला एकत्र जमून रुग्णांचे प्रश्न आणि उपचार याविषयी चर्चा करीत. या सगळ्यांनी िमळून 1908 मध्ये "व्हिएन्ना सायकोऍनालिटिक सोसायटी' स्थापन केली. या संस्थेचं वैशिष्ट्य असं, की यात संस्थापक खुद्द फ्रॉईडसहित सगळेच कमालीचे विक्षिप्त म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्यातल्या आपसांतल्या चर्चा नंतर मतभेदांत बदलून पुढे त्याचं उग्र स्वरूपात रूपांतर झालं. फ्रॉईडचे ऍडलर आणि युंग या त्याच्या अत्यंत जिवलग मित्र असलेल्या म ानसशास्त्रज्ञांसोबत अनेकदा वाद होत. शेवटी ते पराकोटीला गेले आणि ऍडलर आणि युंग हे त्या संस्थेतून बाहेर पडले. मात्र युंग दूर गेल्याचं फ्रॉईडला अत्यंत दु:ख झालं. एक तर फ्रॉईड त्याला आपल्या विचारांचा भावी वारसदार मानत होता. तसा दोघांमध्ये कितीतरी गोष्टींत टोकाचा फरक होता. फ्रॉईड हा कमालीचा नास्तिक, तर युंग देव आणि दैव: दोन्ही गो ष्टी मानणारा होता. इतकंच नाही, तर युंग नशिबाबरोबरच परलोक, चमत्कारांवर विश्वास ठेवणारा होता आणि फ्रॉईड यापैकी कशावरच विश्वास ठेवणारा नव्हता. युंगचा पॅरासायकॉ लॉजीवर विश्वास होता, पण फ्रॉईडचा नव्हता. फ्रॉईडचा त्याच्या लैंगिकतेबद्दलच्या थिअरीजवर विश्वास होता; पण युंगचा नव्हता. फ्रॉईड सगळं विश्लेषण फक्त वैयक्तिक पातळीवरच करतोय आणि त्यातही लैंगिक प्रेरणांना अवास्तव महत्त्व देतोय, हे युंगला पटत नव्हतं. युंगला गटे आवडे तर फ्रॉईडला शेक्सपिअर आवडे. अर्थातच त्यांच्यातले मतभेद पराकोटीला गेलेच!
फ्रॉईड बरेचदा युंगच्या बोलण्यातल्या चुका काढायचा. बोलताना आपण अनवधानाने कित्येकदा चुका करतो, पण त्यातूनही आपल्या मनात दडलेल्या काही सुप्त इच्छा, वासना वेगळ् या तऱ्हेनं व्यक्त होत असतात आणि त्यामुळे त्या महत्त्वाच्या असतात, असं फ्रॉईडला वाटे. अशाच चुकांना मग "फ्रॉइडियन स्लिप' म्हणायला लागले. आपण युंगच्या बोलण्यातल्या चुका काढायला लागल्यावर युंगला त्याचा राग येईल, हे फ्रॉईडला माहीत होतं. खरं तर त्यामुळेच फ्रॉईड युंगच्या त्या चुका काढत होता. "आपल्या शिष्यांना आणि विद्यार्थ्यांना फ्रॉइर् ड मनोरुग्णाप्रमाणे वागवतो,' अशी फ्रॉईडवर टीका करणारं पत्र युंगनं फ्रॉईडला लिहिलं. हे वाचून फ्रॉईडच्या अंगाचा तिळपापड झाला. फ्रॉईडनंही लगेच तावातावानं युंगला पत्र लि हिलं खरं, पण त्यानं ते त्याला पाठवलं नाही. जगातले दोन महान मानसशास्त्रज्ञ स्वत:चं आणि दुसऱ्याचं मन समजून घेण्याची धडपड करीत होते आणि त्यात ते पूर्णपणे अयशस्वी होत होते!
आपल्या वागण्याचा दुसऱ्यावर काय परिणाम होतोय हे खरं तर कुठल्याही सर्वसामान्य माणसालाही चटकन समजलं असतं, पण या जगातल्या दोन महान मानसशास्त्रज्ञांना ते जमत नव् हतं!
न्यूरॉसिसचं कारण फ्रॉईड लैंगिकतेमध्ये शोधत होता. ते युंगला मान्य नव्हतं. आजूबाजूच्या परिस्थितीशी जर कुणाला जुळवता आलं नाही तर "न्यूरॉसिस' होतो, लैंगिकतेमुळे नव्हे, असं युंगचं म्हणणं होतं. शिवाय सध्याच्या परिस्थितीमधल्या ताणतणावांमुळे आणि इतर मानसिक कारणांमुळे "न्यूरॉसिस' होतो; लहानपणच्या कुठल्याही लैंगिक गोष्टींमुळे नाही, अस ंही युंगला वाटे. युंगच्या थिअरीमध्ये धर्मवाद आणि गूढवादही डोकावे. त्यानं "कलेक्टिव्ह कॉन्शस'चीही कल्पना मांडली. यामध्ये फक्त एकाच व्यक्तीचा विचार न करता इतर सम ाजाचाही विचार केला होता; एवढंच नव्हे, तर आतापर्यंतच्या पिढ्यांतल्या ऐतिहासिक मानसिकतेचाही विचार युंगनं केला होता. फ्रॉईडला युंगच्या या कल्पना मान्य नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यात वाद वाढले.
फ्रॉईडच्या "बालपणीची लैंगिकता (इन्फन्टाइल सेक्शुऍटिलिटी)'आणि "इडिपस कॉम्प्लेक्स' याविषयीच्या थिअरीजही युंगला मान्य नव्हत्या. फ्रॉईडची अनकॉन्शसची कल्पना म ूळची आपलीच होती; ती आपणच स्वतंत्रपणे शोधून काढली होती, असं युंगचं म्हणणं होतं.
युंगच्या मते, लैंगिक प्रेरणा महत्त्वाच्या असल्या तरी सगळ्यात महत्त्वाच्या नव्हत्या. युंगच्या दृष्टीनं धर्म खूप महत्त्वाचा होता. युंगनं अनेक धर्मांचा अभ्यास सुरू केला. युंग प्राचीन स ंस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिका आणि न्यू मेक्सिको इथे फिरून, राहून आला होता. अनेक संस्कृतींमध्ये असणाऱ्या पुराणकथांमध्ये काही साम्यं सापडतात का, यावरही त् यानं अभ्यास केला आणि त्यांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. पौर्वात्य धर्मात अनेक देवळांत त्याला देवदेवतांची लैंगिकदृष्ट्या खूप उत्तेजित चित्रं, मूर्ती किंवा प्रतिमा असल्याचं आढळलं. त्यातल्या लैंगिक स्पष्टतेमुळे युंगला पौर्वात्य धर्म खूप पुढारलेले वाटायला लागले. ते मनातल्या अनकॉन्शसचीच भाषा बोलताहेत, असं युंगचं म् हणणं होतं. यानंतर त्यानं या सगळ्या धर्मातल्या पुराणकथांचा अभ्यास केला.
सुरवातीच्या काळात दोघंही आपली स्वप्नं एकमेकांना सांगत. 1906 मध्ये युंगला वेगवेगळी स्वप्नं पडायला लागली. फ्रॉईडनं नंतर त्याचं मनोविश्लेषणही करून अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. "त्याची स्वप्नं ही त्याच्या अयशस्वी लग्नाची दर्शक आहेत' असं फ्रॉईडनं त्याविषयी म्हटलं होतं. पण "आपण आपल्या बायकोबरोबर खूप आनंदी आणि सुखी आहोत' असं युंगनंही त्याला उत्तर दिलं होतं. फ्रॉईड स्वत:ची स्वप्नं युंगला सांगत असल्यामुळे युंगला "फ्रॉईडचं मन कसं विचार करतं; कसं काम करतं' हे या स्वप्नांच्या विश्लेषणामुळे म ाहीत होतं. पण त्याविषयी तो कुठे फारसं बोलत नसे. त्याविषयी कुणी त्याला एकदा विचारलं होतं, तेव्हा युंगनं "ते एक प्रोफेशनल सिक्रेट आहे' असं सांगून त्याला उडवून लावलं होतं.
दोघंही अत्यंत हुशार तज्ज्ञ स्वत:चं मन आणि भावना यांचा अर्थ लावण्यासाठी झगडत होते. एकमेकांच्या ताकदीचा एकमेकांवर असलेला प्रभाव त्यांना कळत नव्हता. एके दिवशी फ्रा ॅईडनं परस्परांतली ही चर्चा आणि संवाद थांबवला, तसंच फ्रॉईडनं आपल्याला पडलेली स्वप्नं युंगला सांगायचं बंद केलं. या क्षेत्रातले तज्ज्ञ आपण असताना युंगला आपल्या स्वप्नां विषयी सांगून आपला अधिकार आपणच का कमी करावा, असे विचार त्याच्या मनात यायला लागले. हे लक्षात आल्यावर युंग खूप दुखावला गेला. आता मात्र आपण फ्रॉईडवर विस ंबून न राहता नवा मार्ग शोधायची गरज आहे, हे युंगला कळलं. फ्रॉईडला हे सारं पटवून घेणं अशक्य होतं. आता आपण वेगळ्या वाटेनं गेलंच पाहिजे, याची युंगची खात्री झाली. 1913 मध्ये दोघांनी एकमेकांना रामराम ठोकला आणि शेवटी 1914 मध्ये युंगनं स्वत:चा एक गट स्थापन केला.
या गोष्टीचा युंगवर खूपच परिणाम झाला. पहिल्या महायुद्धापर्यंत त्याच्यावर हा मानसिक आघात राहिला. युंग फ्रॉईडला खूप जवळून ओळखत होता, तरीही फ्रॉईडच्या ज्ञानावर काही बोलण्याची क्षमता त्याच्याकडे नव्हती. 1913 सालच्या सप्टेंबर महिन्यात म्युनिकला "फोर्थ इंटरनॅशनल सायकोऍनालिटिकल कॉंग्रेस' भरली, त्या वेळी फ्रॉईड आणि त्याचे समर्थक वेगळ्या टेबलवर, तर युंग आणि त्याचे समर्थक वेगळ्या टेबलवर बसले होते. "जेव्हा कॉंग्रेस संपली, तेव्हा आम्ही अलग झालो. पुन्हा भेटण्याची कुणालाच इच्छा राहिलेली नव्हती,' असं फ्रॉईडनं एका पत्रात लिहिलं होतं. या विभक्त होण्यामुळे फ्रॉईडला खूपच मनस्ताप झाला, पण त्याचबरोबर युंग गूढवादाकडे झुकतोय; अवैज्ञानिक तऱ्हेनं विचार करतोय आणि मांडतोय, याचं फ्रॉईडला खूपच वाईट वाटलं. "आपण जर कलेक्टिव्ह अनकॉन्शस आनुवंशिक तऱ्हेनं आपल्या पूर्वजांपासून मिळवत असलो तर ते डार्विनच्या तत्त्वाच्या विरुद्ध जात होतं,' असं फ्रॉईड म्हणे. याचं कारण अनकॉन्शस हा जन्मापासून नसून, तो आपल्या अनुभवांमुळे, संस्कारांमुळे तयार होत असतो, असं फ्रॉईडला वाटे. आणि संस्कारांमुळे, बाह्य परिस्थितीमुळे निर्माण होणारे गुणधर्म पुढच्या पिढीत आनुवंशिक तऱ्हेनं जात नसतात, हे फ्रॉईडला चांगलंच माहीत होतं. पण युंगला हे पटत नव्हतं. त्याच्या या वेळच्या भाषणातून फ्रा ॅईडपेक्षा त्याचे विचार, थिअरीज वेगळ्या असल्याचं स्पष्ट झालं.
फ्रॉईडनं 1913 मध्ये एक पत्र लिहिलं. ते त्याच्या मृत्यूनंतरच प्रकाशित झालं. त्यात त्यानं "टोटेम अँड टाबू' हे पुस्तक युंगच्या थिअरीज पूर्णपणे धुळीला मिळवण्यासाठीच लिहिलं होतं, असं नमूद केलं होतं. पण त्यानं त्यात उत्क्रांतीचाही अत्यंत चुकीचा अर्थ लावला होता. माणसाचे अनेक वंश म्हणजेही त्याच्या उत्क्रांतीचे टप्पेच आहेत आणि त्यांचं शिखर म् हणजे गोरी, पाश्चिमात्य, सुसंस्कृत माणसं, असं त्यानं त्यात मानलं होतं. थोडक्यात, युंगला गोळी मारता मारता ती फ्रॉईडला स्वत:लाच लागली होती! एका अर्थानं फ्रॉईडनं मानवी मनाकडे कसं बघावं, याचं दार विसाव्या शतकासाठी उघडलं, तर युंगनं तेच एकविसाव्या शतकासाठी खुलं केलं, असं म्हणता येईल.

फ्रॉईड आणि कला
April 03, 2011
रेनायसांससारख्या काळातला "लिओनार्डो डा विंची (1452-1519)' हा एक प्रचंड हुशार, ज्ञानी, संशोधक आणि कलाकार म्हणून गाजला. अजूनही तो जगातल्या थोर चित्रकारांपैकी एक मानला जातो. फ्लॉरेन्सजवळच्या गावात 15 एप्रिल 1452 रोजी जन्मलेल्या लिओनार्डोला आयुष्यभर "अनौरस' म्हणूनच हिणवलं गेलं. कुठल्याही उच्चभ्रू, प्रसिद्ध विद्यापीठात प्रवेश न मिळाल्यामुळे त्याला स्वतःच निरीक्षण आणि प्रयोग करून बऱ्याच गोष्टी एकलव्यासारख्या आत्मसात कराव्या लागल्या. लिओनार्डो हा समलिंगी होता असंही बोललं जातं.
लिओनार्डोचं "मोनालिसा' हे इतिहासातलं सगळ्यात गाजलेलं चित्र! आतापर्यंत त्या चित्राचे बरेच अर्थ काढले गेले आहेत. "फ्रान्सेस्को डेल गिओकोंडो' या व्यापाऱ्याच्या बायकोचं ते चित्र आहे अशी जरी सर्वसामान्यपणे समजूत असली तरी काहींच्या मते आपल्या आईचं आदर्श रूप लिओनार्डोनं त्यात रंगवलंय, तर आणखीन काहींच्या मते स्त्रीचा वेष घातलेल्या स्वतःचंच लिओनार्डोनं पोर्टेट काढलंय. काहींना तर ते अर्धं पुरुषाचं आणि अर्धं स्त्रीचं चित्र आहे असं वाटतं! ती स्त्री नक्की कोण होती, याविषयी जरी अनेक तर्क आणि वाद अजून चालू असले, तरी त्या चित्रातल्या स्त्रीच्या चेहऱ्यानं आणि त्यावरच्या तिच्या त्या अत्यंत मंद स्मितानं अनेकांची अनेक शतकं झोप उडवली, हे मात्र निश्चित! 2 मे 1519 रोजी लिओनार्डोचं निधन झालं.
आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत लिओनार्डोनं वेगवेगळ्या विषयांवर 5000 पानी नोट्स करून ठेवल्या होत्या. 1910 मध्ये फ्रॉईडनं लिओनार्डोच्या नोट्स आणि त्याची चित्रं तपासून लिओनार्डोचं चक्क मनोविश्लेषण केलं. फ्रॉईडनं लिओनार्डोच्या समलिंगित्वाचा त्याच्या आईबरोबरच्या मानसिक संबंधांशी आणि घरी कायम गैरहजर असणाऱ्या त्याच्या वडिलांशी लावला. लिओनार्डोच्या लैंगिक भावना तीव्र होत्या, पण त्या भावना पूर्ण न होऊ शकल्यामुळे त्याचंच त्याच्या कलेच्या रूपात "सब्लिमेशन' झालं, असं फ्रॉईडनं म्हणायला सुरवात केली. लिओनार्डोनं कित्येक प्रकल्प चालू केले खरे, पण ते पूर्णच केले नाहीत. याचं कारण फ्रॉईडनं लिओनार्डोच्या अपूर्ण राहिलेल्या लैंगिक इच्छांमध्ये शोधलं. लिओनार्डो त्याच्या चित्रात व्हर्जिन मेरी आणि सेंट ऍन अशा दोन स्त्रिया दाखवे. लिओनार्डोला प्रत्यक्ष जन्म देणारी आई आणि त्याचा सांभाळ करणारी दाई या दोघींचं ते प्रतीक होतं, असं फ्रॉईड माने.
फ्रॉईडनं लिओनार्डोचं मनोविश्लेषण करण्यासाठी तीन तऱ्हेची माहिती वापरली होती. लिओनार्डोच्या लहानपणीच्या आठवणींमध्ये सतत येणारं गिधाड, लिओनार्डोची चित्रं आणि त्या चित्रांची रचना आणि लिओनार्डोच्या लिखाणातल्या चुका (स्लिप्स) या सगळ्यांचा अभ्यास करून लिओनार्डोचं "न्यूरॉटिक ऑब्सेशनल' व्यक्तिमत्त्व होतं, असाच फ्रॉईडनं निष्कर्ष काढला. या निष्कर्षांवर कडाडून टीका झाली. इटालियन शब्द "निब्बिओ' याचा खरा अर्थ गिधाड नसून, दुसराच पक्षी (काईट) आहे. पण फ्रॉईडनं चुकीच्या भाषांतरामुळे त्याचा अर्थ "गिधाड' असा घेतला आणि त्यामुळे त्याचे निष्कर्षही चुकले, असं अनेकांचं म्हणणं होतं.
भाषांतरात झालेली चूक लक्षात आल्यावर फ्रॉईडला खूप वाईट वाटलं, याचं कारण आपल्या लिखाणामधलं लिओनार्डोवरचं लिखाण हे खूपच उच्च दर्जाचं असल्याचं तो कायम माने! फ्रॉईडच्या अनुयायांनी मग ही चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. पण एवढं असलं तरी लिओनार्डो जिवंत नसताना केवळ त्याच्या काही नोट्स, चित्रं आणि स्वप्नं यांच्या जोरावर त्याचं मनोविश्लेषण करणं हा काही खेळ नव्हता. फ्रॉईडनं ते केलं आणि "लिओनार्डो डा विंची- अ स्टडी इन सायकोसेक्श्युऍलिटी' या नावाचं एक पुस्तकही लिहिलं!
एखाद्या कुमारिकेचे कपडे एका बाजूनं बघितले की ते किंचितसे गिधाडासारखे दिसतात. यामुळे गिधाडांचे विचार मनात येणं किंवा त्यांचं स्वप्न पडणं याचा संबंध फ्रॉईडनं "पॅसिव्ह समलिंगी' असा केला होता. लिओनार्डोला अत्यंत लहानपणी पाळण्यात असताना आपलं तोंड एक गिधाड आपल्या शेपटीनं उघडतंय असे वारंवार आभास होत. लिओनार्डोनं हे त्याच्या "कोडेक अटलांटिकस'मध्ये लिहून ठेवलं होतं. याचा अर्थ लिओनार्डोच्या आईचं स्तनाग्र लिओनार्डोनं लहानपणी चोखण्याशी फ्रॉईडनं लावला. इजिप्शियन पुराणकथांप्रमाणे आणि लोककथांप्रमाणे गिधाडामध्ये नर नसतोच. गिधाडाची मादी वाऱ्यापासून गर्भवती राहते, अशी समजूत होती. फ्रॉईडनं ही कथाही त्याच्या विश्लेषणात वापरली होती, असं काहींचं म्हणणं आहे.
फ्रेंच कवी आंद्रे ब्रेटन याच्या लिखाणापासून "सररिऍलिझम'ची चळवळ सुरू झाली असं समजलं जातं. ब्रेटन फ्रॉईडला व्हिएन्नामध्ये 1921 मध्ये भेटला होता. "फ्री असोसिएशन' ही फ्रॉईडनं काढलेली मानसोपचारातली एक पद्धत होती. या पद्धतीत रुग्ण एका कोचावर बसत असे. फ्रॉईड मग त्यानंतर त्यांना सर्व काही मनमोकळेपणानं बोलू देई. यामुळे स्वतःच स्वतःचा घातलेला बुरखा फाडून रुग्ण आपल्या सुप्त भावना, इच्छा, वासना, आठवणी आणि स्वप्नं या सगळ्या मुक्तपणे बाहेर काढू शके. यामुळे त्यांचा निचरा (कॅथार्सिस) होऊन रुग्णालाही थोडंसं बरं वाटे आणि फ्रॉईडलाही त्या रुग्णाच्या अंतर्मनात शिरून त्याचं विश्लेषण करायला या सगळ्या गोष्टींची मदत होई. या फ्री असोसिएशनचा आणि स्वप्नांचा बाह्य जगापेक्षा किंवा बाह्य मनापेक्षा अंतर्मनाशी आणि त्यातल्या कोलाहलाशी संबंध असल्यामुळे सररिऍलिझमच्या तत्त्वज्ञानावर या फ्री असोसिएशनचा आणि स्वप्नांचा परिणाम झाला. या सगळ्यांचा ब्रेटनवर परिणाम झाला. अनेक चित्रकार जेव्हा ब्रेटनला भेटायचे तेव्हा फ्रॉईडचा प्रभाव मग ब्रेटनच्या मार्फत त्या कलाकारांवरही पडायला लागला.
कित्येक सररिऍलिस्टिक चित्रांमध्ये प्रत्यक्ष आपल्याला वस्तू जशा दिसतात तशा काढतच नाहीत. "स्टिल लाइफ' या प्रकारात त्या आहेत तशा दाखवण्याची पद्धत आहे. पण "सररिऍलिझम'मध्ये त्या वस्तू स्वप्नांमध्ये कशा दिसतात, यावर ते चित्र अवलंबून असतं आणि म्हणूनच फ्रॉईडचा "सररिऍलिझम'वर खूपच मोठा प्रभाव पडला. सॅल्वेदॉर दाली, फेलिक्स लाबीझ, जीऑर्जिओ डी चिरिओ आणि पॉल डेलावॉक्स या चित्रकारांनी फ्रॉईडचा अभ्यास केला होता. 1937 मध्ये सॅल्व्हेदॉर दालीनं "दी मेटॅमॉफॉसिस ऑफ नार्सिसस' हे चित्र काढलं. फ्रॉईडनं दालीचं आणि या चित्राचं खूप कौतुक केलं. फ्रॉईड आणि दाली यांच्या भेटीबद्दल मात्र खूपच गूढ आणि वाद आहेत.
फेलिक्सनं 1950 मध्ये "दी स्ट्रेंज लेडा' नावाचं चित्र काढलं. या पुराणकथेचा फ्रॉईडनं जो अर्थ लावला होता त्यावर हे चित्र आधारलेलं होतं. जॉर्जिओ डी चिरिओसारख्या सररिऍलिस्ट कलाकारांनी पुराणकथा आणि फ्रॉईडची स्वप्नांची आणि लैंगिक चिन्हांची (सेक्श्युअल सिम्बॉल्स) थिअरी यांचं मिश्रण करायला सुरवात केली. 1940 मध्ये त्यानं "किलिंग द ड्रॅगन' या शीर्षकाचं चित्र काढलं. पॉल डेलावॉक्सला स्वप्नांचे अर्थ लावणं आणि फ्री असोसिएशन या दोन्हींमध्ये रस होता. 1944 मध्ये त्यानं "व्हीनस स्लीपिंग' या चित्रात नग्न व्हीनस फ्री असोसिएशनमध्ये फ्रॉईडला अभिप्रेत असल्याप्रमाणे पारंपरिक दिवाणावर टेकून आडवी झालेली दाखवलीय. चित्राच्या उजवीकडे आणखी एक नग्न स्त्री एका व्हिक्टोरियन स्त्रीचं स्वागत करतेय आणि ती व्हिक्टोरियन स्त्री मात्र एका सापळ्याशी संभाषण करतेय, असं दाखवलंय. फ्रॉईडच्या आणि आपल्या सगळ्यांच्या नशिबानं हे सगळं बघायला आणि त्यावर टीकाटिप्पणी करायला फ्रॉईड जिवंत नव्हता. प्रसिद्ध क्युबिस्ट चित्रकार पिकासो याच्या "ला डिमॉयसेलेस द ऍव्हिग्नॉन', "गुर्निका' या चित्रांवर, तसंच अमेरिकन चित्रकार जॅक्सन पोकॉक याच्या चित्रांवर फ्रॉईडचा प्रभाव दिसून येतो. विशेषतः चित्रांत स्त्रियांचं चित्रण आता वेगळ्या तऱ्हेनं व्हायला लागलं.
फ्रॉईडच्या प्रभावामुळे अनेक लेखक आपल्या लिखाणात अंतर्मनाचा शोध घेऊ लागले. डी. एच. लॉरेन्सच्या "सन्स अँड लव्हर्स' या कादंबरीवरही फ्रॉईडच्या विचारांचा प्रभाव दिसतो. मिसेस मॉरेल ही एक बाई आणि तिची तीन मुलं यांच्यातल्या संबंधांवर ही कादंबरी आधारित होती. तिचे विल्यम या तिच्या मोठ्या मुलाबरोबर खूपच प्रेमाचे संबंध असतात, पण त्याचा मृत्यू होतो. यानंतर पॉल या सर्वांत लहान मुलाबरोबर तिचे खूपच घनिष्ठ संबंध निर्माण होतात. पॉल तिचं तिच्या नवऱ्यापासून म्हणजे स्वतःच्या वडिलांपासून संरक्षण करतो, यामुळे त्यांचे संबंध आणखीनच घट्ट होतात. पॉलचे वडील मॉरेल कोळशाच्या खाणीत काम करत असतात. त्यांचं वाईट आणि क्रूर वागणं, दारू पिणं या सगळ्यांमुळे त्यांच्यात आणि पॉल आणि पॉलची आई यांच्यात खूपच दुरावा निर्माण झालेला असतो. मॉरेल आपल्या बायकोला खूप बदडून काढत असतो. पॉलला ते बघवत नसतं. लॉरेन्सला फ्रॉईडची "इडिपस कॉम्प्लेक्स'ची थिअरी माहीत होती. याप्रमाणे मुलाला आईबद्दल लैंगिक आकर्षण असतं; त्यामुळे तो वडिलांना आपला शत्रू मानून त्यांचा तिरस्कार करायला लागतो. हे सगळं आपल्याला वेगळ्या स्वरूपात "सन्स अँड लव्हर्स'मध्ये दिसतं. पॉलचं त्याच्या आईवरचं प्रेम हे फक्त साधं प्रेम नसतं. त्यात चक्क लैंगिक आकर्षणाचाही भाग असतो, हेही लॉरेन्सनं सूचित केलं होतं. फ्रॉईडच्या "इरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स' या पुस्तकानंतर काही काळातच "सन्स अँड लव्हर्स' ही लॉरेन्सची कादंबरी प्रकाशित झाली होती.
व्हर्जिनिया वोल्फच्या "टु दी लाइटहाऊस' या कादंबरीवरही फ्रॉईडच्या कल्पनांचा परिणाम झाला. "कॉन्शसनेस'च्या कल्पनेचा वापर विल्यम जेम्सनं त्याच्या "स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस'मध्ये केला होताच. व्हर्जिनिया वोल्फच्या या कादंबरीवरही या कॉन्शसनेसचा, फ्री असोसिएशनचा प्रभाव होताच. थॉमस मॅननंही त्याची "डेथ इन व्हेनिस' ही कादंबरी फ्रॉईडच्या विचारांच्या प्रभावाखालीच लिहिली. डी. एच. लॉरेन्सप्रमाणेच प्राऊस्ट, जॉईस आणि काफ्का यांच्या लिखाणामागच्या प्रेरणांमागे फ्रॉईड कुठेतरी होताच. डोस्टोव्हस्कीच्या कादंबऱ्यांतही वडिलांविषयीचा द्वेष आणि कित्येकदा खून आपल्याला सापडतो. त्यातही फ्रॉईडची "इडिपस कॉम्प्लेक्स'ची थिअरी डोकावते. 1913 मध्ये फ्रॉईडनं "टोटेम अँड टाबू' या त्याच्या पुस्तकात पितृहत्येविषयी लिहिलं होतं. एकंदरीत, फ्रॉईडचा आधुनिक चित्रकलेवर, साहित्यावर आणि सर्वच कलाप्रकारांवर प्रचंड प्रभाव पडला हे मात्र खरं!

'नाझींनी मध्ययुगात मलाच जाळलं असतं!'
March 27, 2011
फ्रॉईडला उत्तरायुष्यात नाझी राजवटीचा त्रास सहन करावा लागला. आयुष्यातील शेवटची काही वर्षे सोडली तर त्याने कायम लेखन आणि संशोधन सुरू ठेवलं होतं. नाझी सैनिकांनी फ्रॉईडचं लिखाण ज्यू पोर्नोग्राफी म्हणून जाळून टाकलं होतं. नाझी राजवटीला कंटाळून फ्रॉईडला लंडनला यावं लागलं. तेथेही त्याच्या भेटीसाठी अनेक विचारवंत व कलाकार येत असत. फ्रॉईडच्या या अखेरच्या दिवसांबद्दल...
फ्रॉईडची ब्रुअरबरोबर मैत्री संपून बराच काळ लोटला होता आणि त्याचे फ्लीसबरोबरचे संबंधही दुरावत चालले होते. फ्रॉईडला खूपच एकाकी वाटायला लागलं होतं. आपली बायको मार्था हिच्याबरोबरच्या संबंधांतली उत्कटता आणि तीव्रता खूपच कमी झाल्यामुळे त्याचा एकटेपणा वाढला होता.
1901 सालापासून पुन्हा फ्रॉईडच्या आयुष्यात थोडेसे आशेचे किरण डोकवायला लागले. त्याला व्हिएन्ना विद्यापीठात प्राध्यापकाची बढती मिळाली.
यानंतरच्या त्याच्या आयुष्यात तो "प्रोफेसर फ्रॉईड' म्हणूनच ओळखला जायला लागला. 1902 मध्ये विल्हेम स्टेकेलसमवेत त्यानं "वेनस्डे सायकॉलॉजिकल सोसायटी' स्थापन केली. 1906 पर्यंत या सोसायटीचे 17 सदस्य झाले आणि दोन वर्षांनंतर तो गट आणखी बराच वाढला. आता त्याचं नाव "व्हिएन्ना सायकोऍनॅलिटिक सोसायटी' असं झालं होतं. या सोसायटीचा बुद्धिवाद्यांमध्ये दबदबा होताच; मग हे लोण जगभर पसरलं. यातूनच त्याच साली नरेम्बर्गच्या एका सभेत "दि इंटरनॅशनल सायकोऍनेलेटिक असोसिएशन'ची स्थापना झाली. या सगळ्यामुळे फ्रॉईडची प्रसिद्धी तर वाढलीच, पण त्याची प्रॅक्टिसही उत्तम चालायला लागली. आता त्यानं एक मोठं घर घेतलं होतं आणि पॉश ऑफिसही थाटलं होतं. 9 महिने तो प्रचंड परिश्रम करून मग 3 महिने सुटीवर जायचा आणि मग मार्था आणि त्याची सहा मुलं यांना घेऊन तो कुठल्याशा डोंगराळ भागात मनसोक्त भटकायचा.
मार्था पतिव्रता होती. फ्रॉईडची सेवा करण्यातच ती आनंद माने. त्याचे घालायचे कपडे बाहेर काढून ठेवण्यापासून त्याच्या टूथब्रशवर टूथपेस्ट लावून देण्यापर्यंत त्याची सर्व कामं ती करायची. त्यामुळे फ्रॉईडला त्याच्या लिखाणात, संशोधनात आणि कामात वेळ देता आला. दररोज 8-9 तास काम केल्यानंतर तो अनेक तास आपल्या लिखाणात घालवे. यामुळेच संपूर्ण आयुष्यात तो 20 च्या वर ग्रंथ लिहू शकला!
1906 मध्ये फ्रॉईडच्या चाहत्यांनी त्याचा वाढदिवस साजरा केला. तोपर्यंत आपलं लिखाण आणि संशोधन यात त्यानं प्रचंड नावलौकिक मिळवला होता. त्याला वाढदिवसाची भेट म्हणून एक पदक देण्यात आलं. त्याच्यावर एका बाजूला शिल्पकार कार्ल श्वेर्डट्न यानं फ्रॉईडचं चित्र कोरलेलं होतं, तर दुसऱ्या बाजूला ग्रीक दैवतकथांमधला पण फ्रॉईडच्या विचारसरणीशी जुळणारा असा प्रसंगही कोरला होता. स्फिंक्सला उत्तर देणाऱ्या इडिपसचं त्यावर चित्र होतं आणि त्यावर सोफोक्लिज्च्या शोकांतिकेतली वाक्यं होती. त्या पदकावर "अत्यंत कठीण प्रश्नांची उकल करणारा हा सर्वांत समर्थ महान मानव आहे' अशी फ्रॉईडच्या स्तुतिपर वाक्यं होती.
1909 मध्ये अमेरिकेतल्या क्लार्क विद्यापीठात प्रमुख वक्ता म्हणून फ्रॉईडला आमंत्रण आलं. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला प्रथमच एवढा बहुमान मिळत होता. वेर मिचेलसारख्या काही तज्ज्ञांना त्याची लैंगिकतेविषयीची मतं अनैतिक वाटली, तर "फ्रॉईड आपल्याला पुन्हा रानटी माणसांसारखंच वागण्याचा सल्ला देतोय,' असं कॅनडातल्या एका विद्यापीठाचा प्रमुख म्हणाला! पण विल्यम जेम्ससकट इतर अनेक मानसशास्त्रज्ञ फ्रॉईडच्या भाषणांनी खूपच प्रभावित झाले. त्याची भाषणं "अमेरिकन जर्नल ऑफ सायकॉलॉजी'मध्ये छापलीही गेली. फ्रॉईड युरोपमध्ये परतला तोपर्यंत अमेरिकेत तो खूपच प्रसिद्ध झाला होता.
याच काळात फ्रॉईडनंच सुरू केलेल्या "व्हिएन्ना सायकोऍनॅलिटिक सोसायटी'मध्ये खूप वाद सुरू झाले. त्याचे आल्फ्रेड ऍडलर, ऑट्टो रॅंक आणि कार्ल युंग हे तीन शिष्य आणि सहकारी यांच्याबरोबर मतभेद विकोपाला गेले. फ्रॉईडचे त्याच्या सगळ्याच मित्रांबरोबर आणि शिष्यांबरोबरचे संबंध बिघडल्यामुले फ्रॉईड आणखीच एकाकी पडला. पहिल्या महायुद्धाच्या धुमश्चक्रीत त्याची प्रॅक्टिस कमालीची खालावली. फ्रॉईडनं अंतर्मनात खोलवर शिरून त्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला खरा; पण आपण शिकतो कसं, तर्क कसा चालवतो, बुद्धी म्हणजे काय, सर्जनशीलता म्हणजे काय वगैरे गोष्टींवर फ्रॉईडनं फारसा विचार केलाच नव्हता. 1920 च्या दशकापर्यंत बिहेविअरिझमची थिअरी खूप लोकप्रिय झाली होती. पण फ्रॉईडला ती फारशी महत्त्वाची वाटली नाही.
फ्रॉईडच्या काळात अनेकांना फ्रॉईडच्या मानसोपचाराच्या पद्धतीमधल्या मर्यादा लक्षात यायला लागल्या होत्या. अंतर्मनातल्या आणि अनकॉन्शसमधल्या भावना आणि विचार हे एवढ्या गुंतागुंतीचे असतात, की एखाद्याला "फ्री असोसिएशन'च्या पद्धतीप्रमाणे मुक्तपणे बोलकं करून त्याच्या अंतर्मनातलं सगळं बाहेर काढणं म्हणजे जवळपास अशक्यप्राय आणि प्रचंड वेळखाऊ काम असतं. मग फ्रॉईडच्या काही शिष्यांनी फ्रॉईडच्या पद्धतीतच 1913 सालाच्या सुमारास शॉर्टकट काढून बदल करायला सुरवात केली. फ्रॉईडनं या नव्या पद्धतीला जोरदार विरोध केला. दोन महायुद्धांच्या मधल्या काळात, म्हणजे 1920 ते 1940 च्या दरम्यान फ्रॉईडच्या प्रसिद्धीनं आणि लोकप्रियतेनं कळस गाठला. आइनस्टाइनच्या बरोबरीनं जग बदलणाऱ्यांमध्ये त्याचंही नाव आता घेतलं जाऊ लागलं. 1927 मध्ये "द फ्युचर ऑफ ऍन इल्युजन' हे धर्मसंस्थेच्या उगमावर विवेचन करणारं पुस्तक, तर 1930 मध्ये "सिव्हिलायझेशन अँड इट्स डिसकंटेट्स' हे समाजकारण आणि राजकारणाविषयीचेच विचार मांडणारं पुस्तक त्यानं लिहिलं. फ्रॉईड म्हणतो, "ज्याला आपण सुसंस्कृत जीवन म्हणतो ते म्हणजे आपल्या इच्छा आणि लैंगिक प्रवृत्ती दडपून टाकणं आणि त्यांच्यात तडजोड करणं.' त्यानं एकच देव मानणाऱ्या धर्माच्या उगमाविषयी "मोझेस अँड मोनोथेईझम' हे पुस्तक 1939 मध्ये लिहिलं.
नाझी विचारसरणीचा जोर या काळात वाढत होता. त्यांना फ्रॉईडचे "विकृत' विचार मुळीच पटत नव्हते. 1933 मध्ये त्यांनी फ्रॉईडची पुस्तकं जाहीररीत्या जाळायला सुरवात केली. "मध्ययुगात त्यांनी मलाच जाळलं असतं. आता त्यांना माझ्या पुस्तकांवरच समाधान मानावं लागतंय,' असं फ्रॉईड त्या वेळी म्हणाला. फ्रॉईडच्या सगळ्या बहिणी नाझी राजवटीत मारल्या गेल्या. 1938 मध्ये नाझी राजवटीनं ऑस्ट्रियावर कब्जा मिळवला आणि त्यांनी फ्रॉईडचा पासपोर्ट रद्द केला! नाझी लोकांनी फ्रॉईडचं लिखाण "ज्यू पोर्नोग्राफी' म्हणून जाळून टाकलं! याच सुमाराला फ्रॉईडची प्रकृती खूपच खालावली होती. लंडनमधल्या अर्न्स्ट जोन्स या फ्रॉईडच्या मित्रानं फ्रॉईडनं लंडनला स्थायिक होण्यासाठी त्याच्याशी चर्चाही केली, पण फ्रॉईडला लंडनला जाण्यात रस नव्हता. शेवटी लंडनला गेल्यामुळे फ्रॉईडच्या मुलांना चांगलं भवितव्य मिळेल, असा जोन्सनं केलेला युक्तिवाद फ्रॉईडला पटला आणि तो लंडनला जायला तयार झाला. पण लंडनला जाण्यासाठी फ्रॉईडला नाझी राजवटीच्या परवानगीची गरज होती. शेवटी रुझवेल्टच्या मध्यस्थीनं ती कशीबशी मिळाली. पण फ्रॉईडला लंडनला जाण्यासाठी 20,000 पौंड्स एवढी रक्कम मोजावी लागली. शेवटी त्यानं लंडनला मुक्काम हलवला. तिथे त्याला भेटायला स्टीफन झ्वाईग, सॅल्व्हॅदॉर दाली, ब्रॉनिस्लाव्ह मॅनिनोव्हस्की, चेम वीझमॅन वगैरे विचारवंत आणि कलाकार येत. लंडनच्या रॉयल सोसायटीचे सचिवही एकदा त्याची सही घेण्यासाठी सोसायटीचं चार्टर बुक घेऊन त्याच्याकडे आले. असा मान यापूर्वी फक्त राजालाच मिळाला होता!
फ्रॉईड 67 वर्षांचा असताना फ्रॉईडला वरच्या जबड्याचा कॅन्सर झाला. पुढच्या 16 वर्षांत त्याच्यावर त्यासाठी 30 शस्त्रक्रिया होणार होत्या! या आजारामुळे त्याला बोलायला आणि खायला खूपच त्रास होई. कॅन्सरला तो "अतिरेकी घुसखोर' असं म्हणे. फ्रॉईड या काळातही प्रचंड प्रमाणात सिगारेट ओढत असे. कामासाठी लागणारी ऊर्जा आणि कल्पकता आपल्याला या सिगारेटमधल्या तंबाखूतून मिळते, असं त्याचं म्हणणं होतं.
फ्रॉईडला आयुष्याच्या अखेरीस कॅन्सरशिवाय अनेक शारीरिक व्याधींनी ग्रासलं होतं. "न्यूरेस्थेनिया' हा मनोविकारही त्याला जडला होता. "माणसाला त्याच्या शरीरानं साथ न देणं ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे' असं तो म्हणे. आपल्या विचारशक्तीवर परिणाम होईल, या भीतीनं तो पेनकिलर्स न घेता भयानक वेदना सहन करायचा! त्याचा कॅन्सर हा शरीरभर पसरतच चालला होता. डॉक्टरांना शेवटी त्याचा ट्यूमर काढण्यासाठी एक गाल कापावा लागला. त्याच्या उघड्या जखमांची दुर्गंधी इतकी होती, की त्याचा पाळलेला कुत्राही त्याच्या जवळ येण्यास कां-कूं करत असे. त्याच्याभोवती माशा घोंघावत असत. पण तरीही याही काळात तो काही रुग्णांना नियमितपणे तपासे. मृत्यूपूर्वी दोन दिवस आधी फ्रॉईडनं त्याचा मित्र आणि डॉक्टर मॅक्स श्करला "हा कॅन्सर एक भयंकर छळवाद आहे. त्यावर काहीही उपाय नाही. आता सहन करणं अशक्य आहे, त्यामुळे आपल्याला आत्महत्या करण्यात मदत करावी,' अशी विनंती केली होती. मॅक्सनं त्याला मार्फिनचे डोस दिले. दुसरा डोस दिल्यानंतर 12 तासांनंतर फ्रॉईड कोमामध्ये गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 24 सप्टेंबर 1939 रोजी फ्रॉईडचा मृत्यू झाला आणि एक महाप्रचंड वादळ शमलं. मानवी मनाचा खोलवर शोध घेण्याचा प्रयत्न फ्रॉईडच्या अगोदर कुणीच केला नव्हता. शिवाय चित्रकला, साहित्य आणि इतर अनेक गोष्टींवर आजपर्यंत फ्रॉईडच्या विचारांचा जेवढा प्रभाव पडला असेल तेवढा फारच थोड्यांच्या विचारांचा पडला. म्हणूनच मार्क्स, डार्विन, आइन्स्टाइन यांच्याबरोबर फ्रॉईडचंही नाव "एक युगप्रवर्तक' म्हणून घेतलं जातं, ते काही उगाचच नव्हे!

इडिपस कॉम्प्लेक्स
March 20, 2011
ज्याप्रमाणे हिमनगाचा 90 टक्के भाग पाण्याखाली असतो त्याप्रमाणेच मानवी मनाची अवस्था असते. थोडक्यात, आपल्याला जाणवणाऱ्या मनापेक्षा अनेक पटीनं मनाचा भाग आप ल्याला अज्ञातच असतो,' असं फ्रॉईड म्हणे. आपल्याला ज्या गोष्टीचं भान असतं अशा मनाच्या स्तराला "जाणीव', "आत्मभान' किंवा "कॉन्शसनेस' म्हणतात. 19 व्या शतकापर्यंत "मनात जे काही चालतं ते फक्त जाणीवपूर्वकच (कॉन्शसली) चालतं,' असं बरेच मानसशास्त्रज्ञ म्हणत. पण फ्रॉईडला ते मान्य नव्हतं. आपल्या जाणिवेपलीकडेही काहीतरी मनोविश्व असतं, यावर फ्रॉईडनं प्रथमच खोलवर विचार सुरू केला. फ्रॉईडनं आत्मभानाच्या (कॉन्शस) मानसिक पातळीखाली "प्रीकॉन्शस'ची आणि त्याखाली "अनकॉन्शस'ची, अशा दोन पातळ्या मानल्या होत्या. आपण कित्येक वेळा कोणाला तरी भेटतो, पण त्याचं नाव किंवा फोन नंबर आपल्याला चटकन आठवत नाही. पण थोडं डोकं खाजवलं की त्या गोष्टी आठवतात. कारण या गोष्टी आपल्या प्रीकॉन्शसमध्ये साठवलेल्या असतात. या प्रीकॉन्शसच्या पातळीखालच्या अनकॉन्शसमध्ये दडपून टाकलेल्या, अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा आणि वासना असतात.
आपण दडपलेल्या अनकॉन्शसमधल्या सगळ्या इच्छा, वासना आणि विचार स्स्वप्नातून व्यक्त व्हायला बघत असतात, पण आपल्या मनावर कॉन्शस मनाचा पहारा एवढा जबरदस्त असतो, की स्वप्नातही त्या गोष्टी पूर्णपणे बाहेर पडू शकत नाहीत. यातून अर्थातच तणाव निर्माण होतो, असं फ्रॉईडला वाटे. त्यामुळे स्वप्नातून त्या व्यक्त होण्यासाठी त्या स्वप्नां मध्ये थोडाफार तरी बदल घडावा लागतो. प्रीकॉन्शसमुळे हा बदल घडू शकतो. "अनकॉन्शस'मधल्या अनेक दडपल्या गेलेल्या इच्छा, वासना जेव्हा त्या दिवसाच्या "प्रीकॉन्शस'मध ल्या घटनांशी मिसळल्या जातात तेव्हा त्यातून चित्रविचित्र स्वप्नं तयार होतात. म्हणून कित्येकदा स्वप्नात काही गोष्टी खूप लहानपणीच्या (अनकॉन्शस) आणि काही कालपरवा घडलेल्या (प्रीकॉन्शस) अशा किंचित गूढ पद्धतीनं मिसळून जाऊन बाहेर येतात.
फ्रॉईडनं "कॉन्शस', "प्रीकॉन्शस' आणि "अनकॉन्शस' या मनोरचनेच्या पातळ्या मांडल्या. मनोरचनेच्या विश्लेषणानंतर फ्रॉईडनं व्यक्तिमत्त्वाच्या आविष्कारांविषयी विश्लेषण करायला सुरवात केली. त्यानं यासाठी "इड', "इगो' आणि "सुपरइगो' या संकल्पना मांडल्या. त्यानं कल्पिलेल्या मनाच्या तीन पातळ्या आणि व्यक्तिमत्त्वाचे आविष्कार यांच्यात संबंध होते, असं फ्रॉईडला वाटे.
"इगो' या शब्दाचा लॅटिनमध्ये अर्थ होतो "मी'. 19 व्या शतकाच्या मानसशास्त्रात हा शब्द बरेचदा वापरला जाई, पण फ्रॉईडच्या मॉडेलमध्ये "इगो' म्हणजे आपल्या अनुभवांतून आणि संवेदनांमधून तयार होणारा, जाणीव असणारा मनाचा बाह्य भाग. हाच इगो "अनकॉन्शस'मधल्या कल्पनांना, विचारांना आणि इच्छांना सतत दाबून ठेवत असतो. समाजाला कुठल्याही व्यक्तीच्या मनाचा जो दृश्य भाग असतो तो इगोच असतो. सामाजिक रूढीरिवाजांचा या इगोवरच जास्तीत जास्त परिणाम होत असतो. थोडक्यात, "इगो' हा बराचसा कॉन्शस म नासारखा असतो.
"इड' हे बरंचसं "अनकॉन्शस'सारखं असतं. मनाच्या तळाशी वावरणाऱ्या स्वाभाविक प्रेरणांना फ्रॉईड "इड' असं म्हणतो. लहानपणी हा "इड'च असतो. त्यात बेलगाम इच्छा, वासना आणि उत्कटता यांचं राज्य असतं. "इड' हा सतत सुखाच्या मागे असतो आणि तो "प्लेझर प्रिन्सिपल'वर चालतो. पण आजूबाजूचा समाज आणि त्याची मूल्यं त्या इच्छा, वासना पूर्ण करू देत नाही. मग हळूहळू, कालांतरानं या "इड' वर "इगो'चा थर तयार होतो. "इगो'चं काम हे "इड'मध्ये सतत उत्पन्न होणाऱ्या इच्छा आणि आजूबाजूचं वास्तव यांच्यामधली दरी भरू न काढणं हे असतं. "इगो' हा सुसंबद्ध असतो, तर "इड' हा असंबद्ध असतो. "इगो' हा विवेकवादी असतो, तर "इड' अविवेकवादी असतो. "इगो' हा मनाचा बाह्य पापुद्रा असतो, तर " इड' हा मनाच्या खोलवरचा गाभा असतो. "इगो' हा कल्पना, विचार, तत्त्वं यांच्या भाषेत बोलतो, तर "इड' हा चिन्हांच्या (सिम्बॉल्स) गूढ भाषेत बोलतो असं फ्रॉईडला वाटे.
फ्रॉईडनं मनाची तिसरी मानलेली पातळी म्हणजे "सुपरइगो'ची. माणसावर नीतिमत्तेचं, मूल्यांचं, आदर्शाचं आणि ध्येयाचं दडपण असल्यामुळे एका ठराविक तऱ्हेनं वागण्याचं अलि खित बंधन असतं. याला फ्रॉईड "सुपरइगो' असं म्हणतो. कुठल्याही व्यक्तीला जे व्हायचं असतं, जो तिच्यापुढे आदर्श असतो, त्याचं दर्शन सुपरइगोमध्ये दिसतं. यामध्येच नै तिकता, कर्तव्य, आदर्श, ध्येयं आणि विश्वास वगैरे गोष्टी येतात. "सुपरइगो' कायम व्यक्तीचं वास्तव (ती आता कशी आहे) आणि त्याचे आदर्श (तिला काय व्हायचंय) यातला फरक दाखवत असतो. यामुळे "इड'मधली ऊर्जा ही चॅनलाइज होऊन माणूस काहीतरी उच्च दर्जाचं काम करायची धडपड करतो. या प्रक्रियेलाच फ्रॉईड "सब्लिमेशन' म्हणतो.
फ्रॉईडनं "इडिपस कॉम्प्लेक्स' ही धक्कादायक कल्पना मांडली. याप्रमाणे प्रत्येक लहान मुलाला त्याच्या आईबद्दल लैंगिक आकर्षण वाटतं आणि त्याचमुळे त्याला वडिलांचा मत्सर वाटायला लागतो. ग्रीक नाटककार सोफोकल्स (ख्रिस्तपूर्व 496-406) यानं लिहिलेल्या "इडिपस-रेक्स' ही शोकांतिका फ्रॉईडला एवढी आवडली, की त्यानं तोच शब्द वापरायला सुरवात केली.
खरं तर इडिपसच्या या शोकांतिकेची कहाणी वेगळीच होती. कोरियान्थचा राजपुत्र इडिपस हा देवदूताकडून "इडिपस आपल्या वडिलांचा खून करेल आणि त्याच्या आईबरोबरच लैं गिक संबंध ठेवेल,' अशी आकाशवाणी ऐकतो. ती ऐकून ते टाळण्यासाठी इडिपस थेब्ज हे शहर सोडून पळून जातो. पण त्याचा काही प्रवाशांबरोबर इतका मोठा वाद होतो, की शेवटी चिडून इडिपस त्या सगळ्या प्रवाशांना मारून टाकतो. पण त्या प्रवाशांमध्येच अनेक वर्षांपूर्वी ज्यांनी इडिपसला वाऱ्यावर सोडून दिलेलं असतं ते इडिपसचे वडीलही असतात. नंतर थे ब्जचा नवीन राजा म्हणून इडिपसचा राज्याभिषेक होतो आणि तो तिथल्या डोकास्टा या विधवा राणीशी लग्न करतो. पण नंतर ती जोकास्टा म्हणजे आपली स्वत:चीच आई असल्याचं इडिपसच्या लक्षात येतं. या गोष्टीत इडिपसला त्याच्या आईविषयी लैंगिक आकर्षण वगैरे काही वाटत नसतं. सगळं योगायोगानंच घडलेलं असतं. पण फ्रॉईडनं तरीही या आकर्षणाला "इडिपस कॉम्प्लेक्स' हे नाव दिलं.
फ्रॉईडचं दुसरं महत्त्वाचं पुस्तक "थ्री एसेज ऑन दी थिअरी ऑफ सेक्शुऍलिटी' हे 1905 मध्ये बाहेर आलं. त्यात त्यानं लहान मुलांच्या लैंगिकतेविषयी (इन्फटाईल सेक्युऍ लिटीवर) चर्चा केली होती. सगळी माणसं जन्मापासून विकृत (पव्हर्स) असतात, पण पुढे जर मुलाची निरोगी तऱ्हेनं वाढ झाली तर या लैंगिक विकृतीवर मात मिळवता येते, असं त् यात सांगितलं होतं. वयात आल्यावर आपल्या लैंगिकतेमध्ये कसे आणि काय बदल घडून येतात, याविषयी यात फ्रॉईडनं लिहिलं होतं. मुलगा आणि मुलगी यांच्या वागणुकीत फरक का आणि कसा पडत जातो, याविषयीही यात चर्चा केली होती.
"इन्फटाईल सेक्शुऍलिटी'ची कल्पना खूप वादग्रस्त मानली जाते. या लैंगिकतेला फ्रॉईड "लिबिडो' म्हणत असे. जेव्हा मुलगा स्तनपान करत असतो तेव्हा तोंड या अवयवामार्फत त् याला लैंगिक सुखच मिळत असतं. याला "तोंडाची अवस्था' (ओरल फेज) असं म्हणतात. जेव्हा मूल हे दीड ते तीन या वयाचं होतं तेव्हा त्याचं गुदद्वार हे लैंगिक सुखाचा मार्ग ठरतं. याला "गुदद्वाराची अवस्था (ऍनल फेज)' म्हणतात. जेव्हा मूल तीन ते सहा वर्षांचं होतं तेव्हा ते स्वत:च्या लिंगाबरोबर खेळायला लागतं आणि स्वत:ला उत्तेजित करत असतं. याला "शिस्नाची अवस्था (फॅलिक फेज)' असं म्हणतात. पण आई-वडील मात्र या सगळ्या गोष्टींवर करडी नजर ठेवून त्याला चांगलं टॉयलेट ट्रेन करणं, हस्तमैथुन करू न देणं, अशा गोष्ट ी शिकवतात. कालांतरानं स्तनपानही बंद होतं आणि त्यामुळे शरीराच्या इतर भागांमुळे मिळणारं लैंगिक सुख कमी होऊन ते फक्त जननेंद्रियावरच केंद्रित होतं, अशी फ्रॉईडची थिअरी होती.
फ्रॉईडच्या मते, मुलींच्या बाबतीत हे सगळं थोडंसं वेगळ्या रीतीनं घडतं. एक तर मुलांसारखं आपल्याला शिस्न नाही म्हणून तिला असूया वाटत असतेच आणि आपल्याला आपल्या आईनं असं लिंग नसलेलं जन्माला घातलं किंवा ते असूनही नंतर छाटू दिलं, अशा कल्पनेनं ती आपल्या आईचा द्वेष करायला लागते. हे जे आपलं नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी आपल्याला आपल्याच वडिलांपासून मूल व्हावं अशी ती सुप्त इच्छा बाळगायला लागते आणि तशी स्वप्नंही बघायला लागते. पण हे सगळं शक्य नसतं. त्यामुळे ती आइ र्-वडिलांशी जुळवून घेते. ज्यामुळे आपली चिंता वाढतेय अशा आईवरचा आपला द्वेष कमी करून ती आईसारखंच बनण्याचा प्रयत्न करते. पण आपल्याला शिस्न नसल्याची भावना तिच्यावर आयुष्यभर परिणाम करत राहते. एकंदरीतच मुली म्हणजे "अपयशी ठरलेली मुलं' किंवा "मोठी बाई म्हणजे ज्याचं लिंग काढून टाकलेलं आहे असा मोठा पुरुष' अशाच तऱ् हेनं फ्रॉईडनं मुलींकडे किंवा स्त्रियांकडे बघितलं. "फ्रॉईडला स्त्रियांचं मानसशास्त्र हे फारसं उलगडलंच नाही आणि त्या वेळच्या पुरुषप्रधान संस्कृतीचाही हा परिणाम होता' अशीही त् याच्यावर टीका झाली.
फ्रॉईडनं लहान मुलांच्या लैंगिकतेविषयी उघडउघडपणे आणि निर्भीडपणे लिहिलं होतं. यामुळेच युरोप आणि अमेरिका येथल्या उच्चभ्रू, नैतिकता पाळणारा भोंदू मध्यमवर्ग हादरून गेला. फ्रॉईड हा लैंगिक विचारांनी बरबटलेल्या घाणेरड्या विचारांचा आहे, अशी त्याच्यावर टीका झाली. त्याच्या पुस्तकांना तर कित्येक जण "पोर्नोग्राफी' म्हणायला लागले. पण मानसशास्त्रीय वर्तुळात मात्र त्याच्या थिअरीजविषयी बरीच चर्चा झाली आणि बऱ्याच वर्षांनंतर का होईना, फ्रॉईडकडे अनेक बुद्धिवंतांनी खूपच गंभीरपणे बघायला सुरवात केली.

स्वप्नांचे अर्थ
February 27, 2011
"आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा आवाज म्हणजे स्वप्नं' असं सॉक्रेटिस माने. यामुळे इतर तत्त्वांप्रमाणे तोही स्वप्नांना खूप महत्त्व देई आणि त्यांच्याकडे गंभीरपणे बघे. ऍरिस्टॉटल मात्र स्वप्नांकडे विवेकवादानं बघायचा.
स्वप्नातल्या परीला, स्वप्नात फक्त पंख
दिवसास पाय पंगू, अन् हात शापिलेले
विंदा करंदीकरांसारखा थोर कवीनं स्वप्नातलं काल्पनिक सुरम्य जग कसं सुखावह असतं आणि वास्तव किती दाहक असतं हेच वरील ओळींमध्ये सांगितलंय. स्वप्नांविषयी खूप रंजक गोष्टी प्रसिद्ध आहेतच. सत्यवचनी राजा हरिश्चंद्र स्वप्नात दिलेलं वचन पाळण्यासाठी आपलं सगळं राज्य विश्वामित्राला दान करून स्वतः कंगाल झाला! अब्राहम लिंकनला आपल्यावर कोणीतरी गोळी झाडतोय असं स्वप्नं पडलं होतं असं म्हणतात आणि झालंही तसंच! एलियास होव याला स्वप्नांवरूनच शिवणयंत्राची कल्पना सुचली होती म्हणे! रामानुजम या प्रसिद्ध गणिततज्ज्ञालाही अनेक गणितं सोडवायला स्वप्नात येणारी देवी मदत करते, असंच वाटे. केक्युल या बेंझिनची रचना शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञालाही त्या रचनेचं चित्र स्वप्नातच दिसलं होतं! आचार्य अत्रेंच्या स्वप्नातही एकदा तुळजापूरची भवानी आली आणि मग अत्रे तडक भवानीमातेच्या दर्शनाला तुळजापूरला जाऊन पोचले! कवी बोरकरांनीही मेघदूताच्या एका अवघड श्लोकाचा अनुवाद स्वप्नात केला होता असं सांगतात!
स्वप्नांवर अनेक चित्रपट आधारलेले आहेत. 1945 मध्ये अल्फ्रेड हिचकॉकच्या स्वप्नांवर आधारलेल्या "स्पेसबाऊंड' या सिनेमातल्या स्वप्नांची कल्पना आणि रचना सॅल्व्हॅडॉर दाली या प्रसिद्ध सररिऍलिस्ट चित्रकाराची होती. यात इनग्रिड बर्गमन आणि ग्रेगरी पॅक यांचा अफलातून अभिनय होता. अकिरा कुरोसावा या जगप्रसिद्ध दिग्दर्शकाला आयुष्याच्या वेगवेगळ्या कालखंडांत पडलेल्या स्वप्नांवर आधारलेला 1990 सालचा "ड्रीम्स' हा चित्रपटही खूप गाजला. इंग्रजी साहित्यात तर स्वप्नं अनेकदा येतात. फ्रॅंझ काफ्काच्या "मेटॅमॉर्फिसिस' या प्रसिद्ध दीर्घकथेची सुरवातच त्यातला नायकच स्वप्नातून जागा होऊन होते. "अल्केमिस्ट' या पाउलो कोहेलोच्या प्रसिद्ध पुस्तकात सॅंटियागोला आयुष्यात पुढे काय घडणार आहे, याचे संकेत त्याच्या स्वप्नातून मिळतात, असं दाखवलंय. शेक्सपिअरच्या "हॅम्लेट'मध्ये स्वप्नं येतातच. रवींद्रनाथ टागोरांचीही "इन ए डस्की पाथ ऑफ ए ड्रीम' अशी एक स्वप्नांवर सुंदर कविता आहे. गुलजारच्या अनेक कवितांमध्ये स्वप्नांचा उल्लेख सुंदरपणे येतो.
मानवी इतिहासात स्वप्नांचा अर्थ दोन तऱ्हांनी लावला गेला. स्वप्नं ही देव-दानवांनी निर्माण केलेली असतात; स्वप्नांद्वारा ते माणसांना पुढे काय होणार आहे याचे संकेत देतात किंवा रोगाचं निदान करायला मदत करतात, असं एका पद्धतीत मानत. स्वप्नात आलेल्या वस्तू, चिन्हं, त्यांचे रंग यावरून त्यांचा अर्थ लावला जाई. त्यामुळे या पद्धतीत ते स्वप्न कोणाला पडतंय, त्याची मनःस्थिती काय आहे, याचा त्याच्या अर्थाशी फारसा संबंध नसे. दुसऱ्या पद्धतीत स्वप्नं ही माणसाच्या मनाच्या अवस्थेशी जोडली गेली. मध्ययुगानंतर दुसरी पद्धत वापरायला सुरवात झाली, पण तरीही पहिल्या पद्धतीचा प्रभाव आजही आहेच.
पहिल्या पद्धतीत काही काही स्वप्नांचे तर अर्थ खूपच गंमतशीर तऱ्हेनं कित्येक जणांनी लावले होते. उदाहरणार्थ समजा, तुमच्या स्वप्नात दुपारचं दृश्य आलं तर म्हणे तुमची ज्याच्याबरोबर मैत्री असेल, ती मैत्री घट्ट होईल आणि दीर्घकाळ टिकून राहील किंवा स्वप्नात मुंग्या आल्या तर तुम्हाला दिवसभर कसला तरी त्रास होत राहील म्हणे. समजा, तुमच्या स्वप्नात तुमची आत्या आली तर त्याचा अर्थ तुम्हाला कुणाची तरी बोलणी खावी लागतील; तुमच्या स्वप्नात केळं दिसलं तर तुम्हाला अगदीच अरसिक आणि कोरडा, प्रेम न करणारा जोडीदार मिळेल; तुम्हाला अंघोळीचं स्वप्नं पडलं तर तुमच्या आयुष्यात मोठे बदल होतील; स्वप्नात मधमाश्या आल्या तर काहीतरी चांगलं होईल; स्वप्नात घंटानाद आला तर दूरच्या कुठल्यातरी मित्राचा मृत्यू ओढवेल; स्वप्नात पारदर्शक द्रवपदार्थानं भरलेल्या बाटल्या दिसल्या तर काहीतरी आनंदमय होणार असतं. (जागेपणी जिन किंवा व्होडकांच्या पारदर्शक बाटल्या बघून वाटतं तसंच!); पक्षी असलेला पिंजरा स्वप्नात आला तर तुम्हाला खूप पैसा आणि सुंदर मुलं या दोन्ही गोष्टी मिळतील; स्वप्नात घड्याळ दिसणं म्हणजे शत्रूपासून धोका पोचेल; स्वप्नात ढग दिसणं म्हणजे काहीतरी वाईट घडण्याची सुरवात होईल; हातरुमालाचं स्वप्न म्हणजे प्रेमप्रकरण होईल; घोड्याचं स्वप्नं पडलं म्हणजे प्रेम आणि उद्योगधंदा यात यश मिळेल, पण उशिरा मिळेल; स्वप्नात जांभई दिली तर मित्राला कुठलातरी प्रचंड त्रास होईल किंवा धोका पोचेल; बायको स्वप्नात येणं म्हणजे घरी असमाधानाचं लक्षण (काही लोकांना जागेपणीही असंच वाटतं, हा भाग वेगळा.), अशा अनेक चित्रविचित्र गोष्टी यात असायच्या आणि यामध्ये एखादं स्वप्न कुणालाही पडलं तरी त्याचा अर्थ तोच असायचा, म्हणून मग स्वप्नांचे अर्थ सांगणारी बरीच पुस्तकंही निघाली. ती अजूनही चालू आहेत!
"चेस्टर बेऍटी पॅपिरस' हे इजिप्तमधलं स्वप्नांवरचं जगातलं पहिलं पुस्तक होतं. ब्रिटिश म्युझियममध्ये ठेवलेल्या या पुस्तकात आपल्याला ख्रिस्तपूर्व 1350 मध्ये केलेल्या 200 स्वप्नांचे अर्थ कळतात. जर आपला दात पडल्याचं स्वप्नं पडलं तर आपल्या नातेवाइकांकडून आपला मृत्यू ओढवेल, असा त्याचा अर्थ होतो, असं ते मानत. इजिप्तमध्ये पूर्वीच्या काळी आयुष्यात काही संकट असलेल्यांना काही खास देवळांत झोपायला सांगत. अशा देवळांत झोपल्यास देव तिथे स्वप्नात येऊन आपल्याला उपाय सुचवतो, अशी समजूत होती. कित्येक वेळा आपल्याला स्वतःला त्या स्वप्नांचा अर्थ कळला नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी तिथला स्वप्नांचे अर्थ लावणारा पुजारी त्यांना पडलेली स्वप्नं ऐके आणि त्यांचा अर्थ लावून त्यांना सल्ला देई. इजिप्तमध्ये देवळातले पुजारीच स्वप्नांचा अर्थ लावणारे तज्ज्ञ म्हणून वावरायचे. त्या वेळी काही लोकांना पडलेल्या स्वप्नांचे तपशील "हायरोग्लिफिक्सवर' नोंदवलेले आहेत. ज्यांना पडलेली स्वप्नं स्पष्टपणे आठवतात, ते खूप नशीबवान असतात, अशीही त्या काळी समजूत होती.
चांगली स्वप्नं पडण्यासाठी हेलनिस्टिक काळात "ऍस्लेपायन्स' नावाची खास देवळंही निर्माण केली होती. त्या माणसांचा "चांगली' आणि हितकारक अशी स्वप्नं पडेपर्यंत रोज देवळात झोपायला जावं लागायचं. थोडक्यात, त्या देवळात चांगल्या स्वप्नांकरता केलेल्या "तीर्थयात्रे'साठी शेकडो लोकांची झुंबड उडे. "एपिडॉरस' इथे भरणारी "एस्क्युलॅपियस'ची स्वप्नांची तीर्थयात्रा सर्वात प्रसिद्ध होती. या स्वप्नांवर त्या काळी एवढा विश्वास असायचा, की राज्यकर्तेही कुठलं धोरण आखताना या स्वप्नांचा आधार घेत. युद्धाच्या वेळी योग्य डावपेच सुचवण्यासाठी राजांबरोबर स्वप्नांचे अर्थ लावणारे तज्ज्ञही मग मोहिमेवर जात!
"आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा आवाज म्हणजे स्वप्नं' असं सॉक्रेटिस माने. यामुळे इतर तत्त्वांप्रमाणे तोही स्वप्नांना खूप महत्त्व देई आणि त्यांच्याकडे गंभीरपणे बघे. संगीत आणि कला यांचं शिक्षण एका स्वप्नामुळे सॉक्रेटिसनं कसं घेतलं होतं, याविषयी प्लेटोने "फेडो'मध्ये सांगितलं आहे. "आपल्यामध्ये दडलेल्या "अविवेकवादी' इच्छा आणि वासना स्वप्नांमध्ये डोकावतात' असं काहीसं फ्रॉईडसारखंच मत प्लेटोचंही होतं. ऍरिस्टॉटल मात्र स्वप्नांकडे विवेकवादानं बघायचा. सगळ्याच स्वप्नांना अर्थ असतोच असं नाही. देव-दानवांनी ती पाठवलेली नसतात; दिवसभरात घडलेल्या घटनांचा त्या रात्रीच्या झोपेत पडलेल्या स्वप्नांवर परिणाम होतो, असं ऍरिस्टॉटलनं "पर्व नॅचरलिया' या ग्रंथात म्हणून ठेवलं. आपल्या स्वप्नांवर आपल्या शारीरिक अवस्थेचाही परिणाम होत असतो. जेव्हा कानात बारीकसा आवाज येत असेल तेव्हा लोकांना विजेच्या आणि ढगांच्या गडगडाटाची स्वप्नं पडतात; किंवा जर शरीरात थोडीशी गरमी जाणवत असेल तर लोकांना आग लागल्याची स्वप्नं पडतात, असं तो म्हणे.
गेलन यानं "डायग्नॉसिस फ्रॉम ड्रीम्स' लिहिलं. यात कुठलं स्वप्नं पडलं तर कुठला रोग झाला असला पाहिजे, याविषयीचे तर्क बांधले होते. उदाहरणार्थ, जर एखाद्याला आग लागल्याचं स्वप्न पडलं तर त्याला "यलो बाईलचा' त्रास होत असणार; तसंच बर्फाचं स्वप्न पडलं तर कफ आणि थंडी यांचा त्रास होत असणार, असं गेलननं लिहून ठेवलं होतं. आपल्या डाव्या मांडीचं संगमरवरामध्ये रूपांतर झालं आहे असं गेलनच्या एका पेशंटला एकदा स्वप्नं पडलं आणि त्यानंतर त्याच मांडीला रोग झाल्यामुळे त्याचा तो पाय कापून टाकावा लागला होता. तसंच त्याच्या एका पहिलवान पेशंटला आपण रक्ताच्या थारोळ्यात उभे आहोत, असं स्वप्नं पडलं. त्या वेळेला त्या माणसाला प्लुरसी झाली असावी आणि त्यामुळे त्याचं रक्त वाहू दिलं पाहिजे, असा निष्कर्ष गेलननं काढला आणि त्याप्रमाणे उपचार केल्यानंतर तो पहिलवान चक्क बरा झाला, अशी नोंद आहे!
स्वप्नं पडत असताना आपला आत्मा आपलं शरीर सोडून बाहेर भ्रमण करत असतो आणि त्यानंतर तो पुन्हा शरीरात परत येतो, अशीही त्या काळी चीनमध्ये समजूत होती. पण स्वप्नातून तुम्ही अचानक जागे झालात आणि तोपर्यंत आत्मा जर शरीरात परतू शकला नाही तर ते मात्र त्यांना खूप धोक्याचं वाटे. या समजुतीमुळे आजही काही चिनी लोक गजराचं घड्याळही वापरत नाहीत. काही रेड इंडियन टोळ्यांमध्ये "स्वप्नं' हे आपल्या पूर्वजांबरोबर चाललेल्या संवादाचं लक्षण मानतात.
स्वप्नांचा अर्थ लावण्यामध्ये सिग्मंड फ्रॉईड हा सगळ्यात मोठा मानसशास्त्रज्ञ समजला जातो. आपल्या लहानपणापासूनच्या अनेक इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आणि वासना या आपल्या स्वप्नातून व्यक्त होत असतात, असं फ्रॉईडनं मांडलं. फ्रॉईडच्या मते, प्रत्येक स्वप्न हे खूप महत्त्वाचं असतं. ज्युलियस सीझर, चंगीझखान आणि हिटलर हे सगळे स्वप्नांना खूप महत्त्व देत.
विसाव्या शतकात यावर खूप मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू झालं. मेंदूतल्या रासायनिक प्रक्रियेमधूनच स्वप्नं जन्म घेतात अशी थिअरी खरं तर पूर्वीच- 1878 मध्ये कार्ल बिंत्स या जर्मन फिजिऑलॉजिस्टनं मांडली होती. यासाठी ईईजी आणि इतर तंत्रांचा वापरही आता सुरू झाला. पण अजून स्वप्नांचा पूर्ण अर्थ कळणं हे माणसाच्या दृष्टीनं एक स्वप्नच राहिलंय, हे मात्र खरं!
थोडक्यात,
भास आम्ही पाहिले, आभास आम्ही पाहिले,
स्वप्नांच्या मृगजळामध्ये, गूढ सत्य पाहिले

अतर्क्य प्रयोगांनी भुलवणारा मेस्मर
२० फेब्रुवरी, २०११
सन 1780 पर्यंत रुग्णांची संख्या वाढायला लागल्यावर मेस्मर एकेकट्याप्रमाणेच समूहावरही उपचार करू लागला. त्यासाठी तो जिच्याभोवती वीस तरी रुग्ण बसू शकतील, अशा आकाराची एक दीड फूट उंचीची बादली घेई. या बादलीपासून एक दोरखंड घेऊन मेस्मर एका रुग्णापासून दुसऱ्या, दुसऱ्यापासून तिसऱ्या अशा वर्तुळाकार बसलेल्या सगळ्या रुग्णांना वेढत असे आणि मग रुग्णांना स्पर्शही न करता तो हातांच्या आणि डोळ्यांच्या विचित्र हालचाली करून रुग्णांवर उपचार करी!
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मेस्मरिझम हा अचाट आणि विचित्र प्रकार धुमाकूळ घालत होता. हे मेस्मरिझम म्हणजे नक्की काय प्रकार होता? आणि तो निर्माण करणारी मेस्मर ही व्यक्ती होती तरी कोण?
जर्मनीतल्या "कॉन्स्टन्झ' या गावात 23 मे 1734 रोजी फ्रांझ मेस्मरचा जन्म झाला. धर्मगुरू किंवा वकील होण्याच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर त्यानं व्हिएन्ना विद्यापीठात वैद्यकशास्त्रातली पदवी मिळवली. यानंतर त्यानं गुरुत्वाकर्षणाचा माणसाच्या शरीरावर काय परिणाम होतो, या विषयावर "ऑन द इन्फ्लुअन्स ऑफ द प्लॅनेट्स' हा शोधनिबंध लिहिला. सुदैवानं त्याच्या गाईडनं तो न वाचल्यामुळं त्याला पीएच.डीही मिळाली! चंद्राचा जसा समुद्राच्या भरती-ओहोटीवर परिणाम होतो आणि त्यामुळं माणसाला अनेक तऱ्हेचे विकार का होतात, याचं स्पष्टीकरण मिळतं, तसा आकाशातल्या इतरही अनेक ग्रह-ताऱ्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा माणसाच्या आरोग्यावर परिणाम होतच असतो, असं मेस्मरनं आपल्या शोधनिबंधात म्हटलं होतं; पण ग्रह-ताऱ्यांचा हा प्रभाव माणसापर्यंत पोचण्यासाठी या सर्व विश्वात एक अदृश्य असा द्रवपदार्थ भरून राहिलाय, असं त्याला वाटत होतं. मॅग्नेटिक थेरपीचा जन्म यातूनच होणार होता.
मेस्मरनं व्हिएन्नामधल्या एका श्रीमंत विधवेशी लग्न केलं आणि तिच्या मदतीनं व्हिएन्नातल्या सधन लोकांमध्ये जम बसवायला सुरवात केली. बेंजामिन फ्रॅंकलिननं शोध लावलेलं "ग् लास हार्मोनिका' हे वाद्य मेस्मर वाजवायला शिकला. मेस्मरला संगीताची आवड होतीच. मोझार्टच्या पहिल्या ऑपेराचा प्रयोग मेस्मरच्या बागेतच झाला होता. 1773 मध्ये एक सत्त्ावीस वर्षांची बाई त्याच्याकडे उपचारांसाठी आली. तिच्यावर कुठल्याच औषधांचा परिणाम होत नव्हता. याच वेळी मॅक्सिमिलियन हेल या जेझुईट धर्मगुरूनं, चुंबकत्वाचा आरोग् यावर परिणाम होतो, असं सांगितल्याचं त्याला आठवलं. मेस्मरनं दोन शक्तिशाली चुंबक त्या रुग्ण बाईच्या शरीरावरून फिरवायला सुरवात केली. याबरोबर ती थरथर कापायला लागली आणि काही काळ तिची शुद्ध हरपली; पण ती जेव्हा जागी झाली तेव्हा ती पूर्णपणे "बरी' झाली होती! यामुळे मेस्मरचा चुंबकत्वावरचा विश्वास दृढ झाला. शरीरात चुंबकत्वाचं द्रव भरून राहिलेलं असतं आणि जर या द्रवात काही "गडबड' झाली किंवा त्याची दिशा बदलली तर रोग जडू शकतात, असं मेस्मरला वाटे.मेस्मरनं चुंबकत्वाचाच उपयोग करून उपचार करायची आणखी वेगळीच पद्धत शोधून काढली. मेस्मरची ही पद्धत खूपच नावीन्यपूर्ण होती. रोग्याला एका टबच्या बाजूला बसवलं जाई. या टबमध्ये चुंबकत्व प्राप्त झालेला लोखंडाचा कीस पसरलेला असे. या टबाच्या मध्यापासून परिघाकडं जाणारे लोखंडाचे काही दंडुकेही त्या टबात ठेवलेले असत. त्यामुळे या चुंबकीय लोखंडी किसामुळं त्या लोख ंडी दंडुक्यातही चुंबकत्व येई. मग मेस्मर त्या रुग्णांना या चुंबकत्व प्राप्त झालेल्या दंडुक्यावर हात ठेवायला सांगत असे. त्यामुळे चुंबकत्वाचा परिणाम त्या रुग्णांच्या शरीरावर होईल, असा तो घाट होता. या प्रक्रियेत कित्येक रुग्णांना मानसिक आणि शारीरिक कोलाहल जाणवे; पण या कोलाहलानंतर कित्येक रुग्णांना चक्क बरंही वाटे!
मेस्मरच्या प्रयोगांच्या बातम्या व्हिएन्नाच्या वर्तमानपत्रात झळकायला लागल्या. त्या वाचून मॅक्सिमिलियन हेल खवळला आणि आपली कल्पना मेस्मरनं चोरली आहे, असा आरोप त् यानं करायला सुरवात केली. यामुळे मेस्मरला काहीतरी वेगळं करायला पाहिजे, असं वाटायला लागलं. मग त्यानं चुंबक वापरणंच सोडून दिलं. प्राण्यांच्या आणि माणसांच्या मज्जासं स्थेतच ऍनिमल मॅग्नेटिझम नावाचं चुंबकत्व असतं आणि ते विशिष्ट तऱ्हेनं जागृत करता येतं, असं तो म्हणायला लागला. 1777 मध्ये तर एक विचित्रच घटना घडली. एकदा मारिया थेरेसा फॉन पॅरेडिस नावाची एक पियानो वाजवणारी तीन वर्षांपासून आंधळी असणारी मुलगी मेस्मरकडे 18 वर्षांची असताना आली. मोझार्टनं या मुलीसाठी एक संगीतरचनाही केली होती. मेस्मरनं तिच्यावर "उपचार' सुरू केले. काही काळात "तिला आता थोडंबहुत दिसायला लागलंय; पण ते फक्त मी हजर असतानाच तिला दिसतं, मी नसताना नाही,' असं मेस्म रनं सांगायला सुरवात केली. प्रत्यक्षात त्या मुलीला दिसायला वगैरे काही लागलेलं नव्हतं. 1778 मध्ये शेवटी तिच्या वडिलांनी हे "उपचार' कंटाळून थांबवले. यावर व्हिएन्नातल्या डाॅक्टर्सनी मेस्मर ढोंगी असल्याची आरडाओरड सुरू केली. शेवटी वैतागून मेस्मर व्हिएन्नाहून पॅरिसला कायमचा 0निघून गेला!
पॅरिसमधली मंडळी कुठलीही नवीन गोष्ट दिसली की तिच्यामागं धावत. अनेक तऱ्हेच्या व्याधी झालेल्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी मेस्मरच्या दाराशी उपचारांसाठी यायला लागल्या. उपचारांतील प्रयोगांबद्दल प्रचंड गुप्तता बाळगी. प्रयोगांच्या वेळी बराचसा काळोख करून शक्य तितक्या कमी प्रकाशातच जादूगारासारखे गडद रेशमी पायघोळ अंगरख्यासारखे चित्र-वि चित्र कपडे घालून मागे वाजणाऱ्या हार्मोनिकाच्या पार्श्वभूमीवर तो आपले प्रयोग करी. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणि आश्चर्यही अनेक पटींनी वाढे. 1785 सालापर्यंत या प्र योगातलं विज्ञान जवळपास संपलंच होतं. आता त्यानं चक्क जादूटोणा किंवा चमत्कृतीचे प्रयोग, असंच स्वरूप धारण केलं होतं. या प्रयोगांना जरी लोकांची झुंबड उडत असली तरी पॅरिसमधले वैज्ञानिक मात्र त्याच्यावर खूपच वैतागायला लागले; पण मेस्मरनंही त्या वैज्ञानिकांना धडा शिकवायचं ठरवलं. यासाठी मेस्मरनंच आपली राजाबरोबरची ओळख वापरून आपल्या दाव्याचा पडताळा करण्यासाठी राजालाच एक चौकशी आयोग नेमण्याची विनंती केली. शेवटी 1785 मध्ये मेस्मर बरोबर आहे की नाही, हे ठरवण्याकरता एक चौकशी आयोग नेमला गेला आणि त्यामध्ये तर प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ लेव्हायजे आणि प्रसिद्ध मुत्सद्दी आणि वैज्ञानिक बेंजामिन फ्रॅंकलिन या दोघांचाही समावेश होता. मेस्मर थापा मारत होता, हे त्यांनी चौकशीअंती दाखवून दिलं. या अहवालामुळं मेस्मर खूपच संतप्त झाला आणि पॅरिस सोडून निघून गेला. आयुष्याची शेवटची तीस वर्षं त्यानं स्वित्झर्लंडमध्ये जवळपास सं पूर्णपणे अज्ञातवासात काढली.
या सगळ्या काळात ऍनिमल मॅग्नेटिझमवर युरोपभर उलटसुलट चर्चा सुरू झाली आणि मेस्मरिझमचं हे खूळ खरं तर आणखीच पसरलं. यामुळे असाध्य रोग बरे होऊ शकतात, अशा जाहिराती काहीच आठवड्यांत लंडनच्या वर्तमानपत्रात यायला लागल्या. 1786 सालापर्यंत मेस्मरिझमला खूपच भरभराटीचे दिवस आले होते. फ्रान्समध्येही मेस्मरिझमचं हे खूळ पु न्हा वाढलं. 1820 मध्ये मेस्मरिझमचा सखोल अभ्यास करण्यासाठी फ्रान्समध्ये दुसरा एक चौकशी आयोग नेमण्यात आला. अनेक वर्षं अभ्यास केल्यानंतर दुसऱ्या चौकशी आयोगानं धक्कादायक अहवाल सादर केला. "मेस्मरच्या पद्धतीनं रुग्णांना खरंच बरं वाटतं; त्यात बरंचसं तथ्य आहे आणि इतर डॉक्टरना जमणार नाही, अशी ताकद या उपायांमध्ये आहे', असं त्यात म्हटलं होतं. यामुळे अनेक डॉक्टर प्रचंड चिडले. या चौकशी आयोगावर भरमसाट टीकाही झाली आणि या गदारोळात मग याचीही शहानिशा करण्यासाठी तिसरा चा ैकशी आयोग नेमण्यात आला! या तिसऱ्या आयोगानं त्या डॉक्टरांची बाजू घेत "ऍनिमल मॅग्नेटिझम'च्या थिअरीमध्ये काहीच तथ्य नसल्याचा निर्वाळा दिला. यानंतर मात्र फ्रान्समधून मेस्मरिझमच्या थिअरीचं जवळपास पूर्णपणे उच्चाटन झालं. अतर्क्य प्रयोगांनी जगाला भुलवणाऱ्या मेस्मरचा 5 मार्च 1815 रोजी मृत्यू झाला. यानंतर मात्र जवळपास एक शतकभर सगळ्या जगावर जादू टाकणाऱ्या मेस्मरिझमचा ऱ्हास होत गेला आणि शेवटी तो इंग्रजी भाषेत केवळ एक शब्द म्हणूनच शिल्लक राहिला!

मेंदूतील भाषाकेंद्रांचा शोधक
३० जाने २०११
ब्रोका उत्कृष्ट वक्ता होता. काही काळ फ्रान्समध्ये तो सनेटर बनला, पण दुर्दैवानं लगेचच 1880 मध्ये मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे मरण पावला! आश्चर्य म्हणजे याच गोष्टीवर त्यानं प्रचंड संशोधन करून 20 वर्षांपूर्वी एक 900 पानी पुस्तकही लिहिलं होतं.
एक शरीरशास्त्रज्ञ, शल्यविशारद, मानववंशशास्त्रज्ञ, संशोधक आणि मेंदूच्या आधुनिक शस्त्रक्रियेचा पितामह म्हणून पॉल पिएर ब्रोका (1824-1880) ओळखला जातो. त्यानं शस्त्रक्रियेची वेगवेगळी उपकरणं शोधून काढली. त्यानं गणित, भौतिकशास्त्र आणि साहित्य यातही पदव्या मिळवल्या होत्या.
बुद्धिमान ब्रोका तितकाच सहृदयीसुद्धा होता. गरिबांना आरोग्यसेवा स्वस्तात कशी मिळेल, यासाठी तो झटे. एकदा एके ठिकाणी 7.3 कोटी फ्रॅक्सची लुटमार होणार होती. हे कळताच स्वत: जोखीम उचलून त्यानं ते पैसे रातोरात पॅरिसमधून दुसरीकडे नेऊन पोचवले होते. कार्ल सगाननं लिहिलेल्या "ब्रोकाज ब्रेन' या पुस्तकात ब्रोकाविषयी झकास लिहिलंय.
ब्रोका चित्रविचित्र प्रयोग करे. आपण राग, आनंद, नैराश्य अशा वेगवेगळ्या मनोवस्थांमध्ये असताना आपल्या मेंदूचं तापमान किती असतं, हे त्याला बघायचं होतं. यासाठी तो आपल्या विद्यार्थ्यांपैकीच काही जणांची, त्यांच्या डोक्यांची ते वेगवेगळ्या मनोवस्थांमध्ये असताना तापमानं नोंदवून ठेवे. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणारं केंद्र मेंदूच्या पुढच्या भागात असतं, याची ब्रोकाला खात्री पटली होती. त्यावर आणखी संशोधन करण्यासाठी ज्यांच्या बोलण्यात खूप दोष निर्माण झाला आहे, अशा माणसांच्या शोधात ब्रोका होता. लवकरच त्याला ती संधी मिळणार होती.
पॅरिसमधल्या "बिसेत्र' इस्पितळात 1861 मध्ये पॉल ब्रोकाकडे लोबॉर्न नावाचा 51 वर्षांचा एक रुग्ण आला; पण त्याला बोलताच येत नव्हतं. तो फक्त "टॅन' एवढाच शब्द म्हणू शकायचा. म्हणून त्याचं नावही टॅन असंच पडलं होतं. टॅन पूर्वी नीट बोलू शकायचा, पण त्यानंतर फेफरं आल्यामुळे त्याची वाचा गेल्यानंतर त्या इस्पितळात 21 वर्षांपूर्वी तो दाखल झाला होता. ब्रोकानं त्याला तपासलं, पण त्यावर काहीच उपचार न होऊ शकल्यामुळे सहा दिवसांत तो मरण पावला. टॅनचा मृत्यू झाल्यावर 27 तासांत ब्रोकानं त्याचं शवविच्छेदन केलं. टॅनच्या मेंदूच्या फ्रॉंटल लोबच्या डाव्या बाजूला दुखापत झाली असल्याचं ब्रोकाच्या लक्षात आलं. या केसवरून आणि भाषेचा वापर करताना त्रास होत असणाऱ्या अनेक रुग्णांच्या अभ्यासावरून भाषेसाठी मेंदूच्या डाव्या अर्ध्या भागातला फ्रॉंटल लोब महत्त्वाचा असतो, हे संशोधकांच्या लक्षात आलं.
ब्रोकासाठी हीही एक संधी चालून आली. त्या काळात पॅरिसमध्ये राहणारी एक बाई मरण पावली. तिला अनेक वर्षं वाचता येत नसे, पण ती बोलू मात्र शकत असे. ब्रोकानं ती मेल्यावर तिच्या मेंदूचं विच्छेदन करून तपासलं. त्याला तिच्या मेंदूतल्या वाचास्थानाशेजारी दुखापत झाल्याचं आढळलं. यावरून हा दुखापत झालेला मेंदूचा भाग म्हणजे मेंदूतलं वाचनाचं केंद्र असलं पाहिजे, हे ब्रोकानं लगेच ताडलं. पूर्वी "टॅन'मुळे ब्रोकाला मेंदूतलं वाचेचं केंद्र कळलं होतं, आता या बाईमुळे मेंदूतलं वाचण्यासाठीचं केंद्रही समजलं होतं. अशाच तऱ्हेनं भाषेची सगळी केंद्रं लक्षात आली. यांनाच "ब्रोकाज एरिया' असं म्हणायला लागले आणि ब्रोका रातोरात प्रसिद्ध झाला.
यानंतर एक विलक्षण गोष्ट घडली. प्रो. सेसिल हॅंडोव्हर या एका इंग्रजीच्या प्राध्यापकाचं फ्रेंच, लॅटिन, ग्रीक आणि इंग्रजी या सर्व भाषांवर प्रभुत्व होतं. एके दिवशी हॅंडोव्हरला अपघात झाला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली. काही काळ उपचार घेतल्यानंतर त्यानं इंग्रजीतलं एक पुस्तक वाचायला घेतलं, पण त्याला एक अक्षरही वाचता येईना! त्यानं वाचण्याचा नादच सोडून दिला. पण एके दिवशी त्याच्या हातात ग्रीक भाषेतलं ऍरिस्टॉटलचं "पोएटिक्स' हे पुस्तक पडलं. गंमत म्हणजे त्याला ते धडाधड वाचता आलं! पण त्यानं दुसरं एक इंग्रजीतलं पुस्तक उघडलं तेव्हा पुन्हा त्याला काहीच वाचता येईना.
आता मात्र डॉक्टरांच्या डोक्यात ट्यूब पेटली. त्यांनी त्याला लॅटिन आणि फ्रेंच भाषेतली पुस्तकं दिली. आश्चर्य म्हणजे ती त्याला वाचता आली! आपल्या मेंदूत फक्त भाषेसाठी लिहिण्या-वाचण्या, ऐकण्याची वेगवेगळी केंद्रं असतात, एवढंच नाही, तर त्यातही प्रत्येक भाषेसाठीही पुन्हा वेगवेगळी केंद्रं असतात, हाच निष्कर्ष या सगळ्यातून निघत होता. डॉ. हॅंडोव्हरच्या मेंदूतल्या फक्त इंग्रजीच्या केंद्राला धक्का पोचला होता.
19 व्या शतकाच्या शेवटी टिश्यू स्टेन्सचा वापर केल्यामुळेच मेंदूच्या ठराविक भागात ठराविक तऱ्हेच्या पेशी जास्त प्रमाणात सापडतात, हे लक्षात आलं. स्पेनचा सांतिआगो कहाल (1852-1934) आणि इटलीचा कामियो गोल्गी (1843-1926) या दोन नोबेल पारितोषिक विजेत्यांनी हे सर्वप्रथम शोधून काढलं आणि मेंदूच्या संशोधनाला एक चालना दिली. त्यांनीच मेंदूमधली सर्वात पायाभूत पेशी म्हणजे मज्जापेशी (न्यूरॉन), याचं खोलवर वर्णन करून ठेवलं.
कहाल आणि गोल्गी यांच्यामधले वाद त्यांच्या संशोधनाइतकेच गाजले. गोल्गी मूळचा इटलीतल्या मिलानमधला. तिथल्या पाव्हिया विद्यापीठात वैद्यकशास्त्र शिकल्यानंतर एका इस्पितळात त्यानं वैद्यकीय मदतनीस म्हणून काम करायला सुरवात केली. त्याच्या स्वयंपाकघरात मेणबत्त्यांच्या प्रकाशात तो संशोधन करत बसे. मेंदूमधला जो भाग चव आणि वास यांच्यासाठी जबाबदार असतो, त्याच्या रचनेविषयी, मेंदूला येणाऱ्या गाठीविषयी आणि आपल्या स्मृतीला जबाबदार असणाऱ्या हिप्पोकॅंपसविषयी गोल्गीनं बरंच संशोधन केलं. आपल्या पेशी ज्या यंत्रणेद्वारा प्रथिनांवर प्रक्रिया करू शकतात, त्या यंत्रणेचाही त्यानं शोध लावल्यामुळे त्या यंत्रणेला "गोल्गी ऍपरेटस' असं म्हणायला लागले.
सांतिआगो कहाल हा स्पेनच्या उत्तरेकडल्या एका खेड्यात जन्मला. त्याच्या वात्रटपणामुळे त्याची शाळेतून बऱ्याचदा हकालपट्टी व्हायची. त्यामुळे बंडखोर कहालला आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी बऱ्याच शाळा बदलाव्या लागल्या. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी स्वत: घरी बनवलेल्या एका तोफेनं टाऊनगेटची नासधूस केल्याच्या आरोपावरून कहालला तुरुंगवासही झाला होता! कहालनं चांभारकाम, न्हावीकाम यांच्यासारखे अनेक उद्योग केले. तो चांगल्यापैकी व्यायामपटूही होता. खरं तर त्याला चित्रकार व्हायचं होतं, पण वडिलांच्या आग्रहास्तव तो डॉक्टर झाला. त्याच्या चित्रकलेतल्या प्रावीण्याचा त्याच्या व्यवसायात आणि संशोधनात मात्र पुढे त्याला खूप फायदा होणार होता.
गोल्गीनं त्याच्या संशोधनाविषयी प्रकाशित केल्यानंतर कहालनं मेंदूच्या रचनेविषयी सखोल, तपशीलवार चित्रं काढायला सुरवात केली. त्या काळी छायाचित्रं काढणं शक्य नसल्यामुळे मायक्रोस्कोपखाली दिसणाऱ्या दृश्यांच्या चित्रांचा सगळ्यांना खूपच फायदा होणार होता. कहालनं टप्प्याटप्प्यानं पूर्ण मेंदूचं एक चित्र काढलं. त्यात मेंदूच्या सगळ्या भागाचे तपशील दाखवले होते. मज्जापेशी हीच मेंदूच्या कार्यभागात महत्त्वाचं काम निभावते, याबद्दल कहालची आता खात्री पटली होती. मेंदूतली एक मज्जापेशी इतर अनेक मज्जापेशींशी जोडलेली असते. त्या जोडलेल्या मज्जापेशींपैकी त्यातली प्रत्येक पुन्हा अनेकांशी जोडलेली असते. अशा तऱ्हेनं मज्जापेशींचं एक जाळंच मेंदूत तयार होतं. ही मज्जापेशी आणि त्यांचं हे जाळं हे मेंदूतलं सगळ्यात महत्त्वाचं आहे, असं कहालचं म्हणणं होतं. पण हे मज्जापेशींचं जाळं कसं असतं, याविषयी त्याचे गोल्गीशी मतभेद होते. गोल्गीच्या मते, मेंदूतल्या मज्जापेशी एकमेकांशी जोडलेल्या असतात. कहालला मात्र दोन मज्जापेशी एकमेकांना प्रत्यक्ष जोडलेल्या नसून, त्यांच्यात बारीकशी का होईना, पण एक फट असते असं वाटे. (आज तिला "सिनॅप्स' असं म्हणतात.)
शेवटी कहालच बरोबर होता आणि गोल्गी चूक होता, हे कालांतरानं वैज्ञानिकांच्या लक्षात आलं. पण तरीही 1906 मध्ये दोघांना विभागून नोबेल पारितोषिक देण्यात आलं. ते दोघं फक्त एकदाच भेटले आणि तेही नोबेल पारितोषिक स्वीकारण्यासाठीच. गोल्गीनं पारितोषिकानंतरचं पहिलं भाषण केलं आणि त्यातही आपलंच म्हणणं कसं बरोबर आहे, हे ठासून सांगितलं. काही मिनिटांनीच कहाल बोलायला उठला आणि त्यानं गोल्गीचं म्हणणं पूर्णपणे खोडून काढलं. अशा तऱ्हेनं नोबेलच्या व्यासपीठावरच त्यांची मस्तपैकी जुंपली!
यानंतर मेंदूविज्ञानात कोर्बिनियन ब्रोडमन (1868-1918) यानं भर टाकली. ब्रोडमनचा जन्म 17 नोव्हेंबर 1868 रोजी झाला. जेव्हा त्याला घटसर्प झाला तेव्हा त्याला मज्जाविज्ञानात त अल्झायमरला भेटल्यानंतर टिश्यूच्या शरीररचनाशास्त्रात रस निर्माण झाला. फ्लू आणि नंतर सेप्टिसेमिया झाल्यामुळे वयाच्या 49 व्या वर्षी तो मरण पावला. मेंदूची रचना इतकी गुंतागुंतीची असूनही ती जाणून घेण्याचे प्रयत्न संशोधकांनी हार न मानता जिद्दीनं चालूच ठेवले, हे विशेष! 1909 मध्ये प्रकाशित केलेलं पुस्तक एक क्लासिक म्हणून ओळखलं गेलं. या पुस्तकात ब्रोडमननं मेंदूचा नकाशा काढला होता. त्यानं कॉर्टेक्सचे वेगवेगळे 52 भाग त्या नकाशात दाखवले होते. या भागांना त्यानं आकडेही दिले होते. आश्चर्य म्हणजे, आजही तेच आकडे वापरले जातात! या भागांना "ब्रोडमन एरियाज' असं म्हटलं जातं. त्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या तऱ्हेच्या मज्जापेशी असतात, असं त्यानं लिहिलं होतं. ब्रोडमनची कॉर्टेक्सच्या भागांची वर्णनं मात्र वादग्रस्त ठरली आहेत!

Friday, October 14, 2011
एक मेंदू झेलतो हे दुःख सारे!
सकाळ , जाने २३, २०११
मनाविषयी बालकवी एक झकास गोष्ट सांगून जातात : शून्य मनाच्या घुमटात, कसले तरी घुमते गीत; अर्थ कळेना कसलाही, विश्रांती परी त्या नाही... नकळे असला, घुमट बनवला, कुणी कशाला?
या मनाचा थांगपत्ता लागत नाही आणि म्हणून त्याला समजून घेण्यासाठी मेंदूच्या रचनेबद्दल जाणून घेण्याचे प्रयत्न सतत होतच राहिले. गेलननंतर साधारणपणे 1300 वर्षांनी लिओनार्डो दा विंची (1452-1519) यानं मेंदूतल्या टिश्यूज्चं महत्त्व दाखवून दिलं. त्यानं बैलाच्या मेंदूतल्या पोकळीमध्ये वितळलेलं मेण ओतलं; ते स्थिर होऊ दिलं आणि नंतर मेंदूचं विच्छेदन करून आजूबाजूच्या टिश्यूज्चं निरीक्षण केलं. मज्जातंतू हे मेंदूपर्यंत येऊन संपुष्टात येतात हे त्यानं शोधून काढलं. मेंदूच्या या भागाला कालांतरानं "थॅलॅमस' असं म्हणायला लागले.
व्हेसॅलियस (1514-1564) या शरीरशास्त्रज्ञानं अनेक प्राण्यांचे मेंदू तपासले. कित्येक वेळेला कुठल्याही प्राण्याचं डोकं उडवलं की, अजूनही ज्यातून रक्त ठिबकतंय अशी प्राण्यांची गरम गरम मुंडकी व्हेसॅलियसकडे आणली जायची. या अभ्यासानंतर मेंदू हाच आपल्या सगळ्या कृतीच्या आणि भावनांच्या केंद्रस्थानी असतो, या निष्कर्षापर्यंत तोही येऊन पोचला. व्हेसॅलियसनं विच्छेदन केलेल्या मेंदूची चित्रं "टिशियन्स स्टुडिओ'मधल्या कलाकारांकडून काढून घेतली होती. मेंदूच्या रचनेविषयीच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातली सर्वात चांगली चित्रं म्हणून त्यातली ताम्रपटांवर कोरलेली पंधरा चित्रं जतन केली गेली आहेत.
आधुनिक तत्त्वज्ञानाचा आणि शास्त्रीय पद्धतीचा पितामह समजला जाणारा रेने देकार्त (1596-1650) हा एक महान फ्रेंच तत्त्वज्ञ आणि गणितज्ज्ञ होता. त्याच्या जन्मानंतर काहीच दिवसात त्याची आई मरण पावली. देकार्त लहानपणापासून खूपच अशक्त होता. यामुळे त्याच्या शिक्षकांनी त्याला बिछान्यात पडूनच अभ्यास करायची परवानगी दिली होती. त्याची हीच सवय आयुष्यभर टिकली. वयाच्या 53 व्या वर्षी देकार्तला ख्रिस्तिना या स्वीडनच्या राणीनं तिला तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी पाचारण केलं; पण पहाटे पाचलाच सुरू होणाऱ्या या शिकवणीमुळे सकाळभर बिछान्यात लोळत पडणाऱ्या देकार्तवर मोठं संकटच येऊन पडलं. कडक थंडीत त्याला आठवड्यातले तीन दिवस पहाटे उठून राणीच्या वाचनालयात हजर राहावं लागे. यामुळं न्यूमोनियानं त्याचा मृत्यू झाला.
देकार्तच्या मते माणसामध्ये आश्चर्य, प्रेम, द्वेष, इच्छा, आनंद आणि दुःख अशा सहा मूळ भावना असतात. मेंदूच्या पोकळीत एक द्रवपदार्थ भरलेला असतो आणि तो मेंदूमधून संदेश पोचवण्यासाठी उपयोगी पडतो असं देकार्तनं सांगितलं. या मेंदूतल्या द्रवपदार्थाला तो "ऍनिमल स्पिरिट' असं म्हणे.
मनात जेव्हा शरीरामधल्या एखाद्या विशिष्ट भागाची हालचाल घडवून आणायची इच्छा होते, तेव्हा मन मेंदूचा द्रवपदार्थानं भरलेला एक विशिष्ट भाग एका ठराविक दिशेनं वाकवतो. त्यामुळं मेंदूतलं द्रव त्या दिशेच्या मज्जातंतूंमधून वाहायला लागतं. त्यामुळं त्या मज्जातंतूंच्या आजूबाजूचे स्नायू फुगतात आणि हालचाल करायला लागतात आणि शरीरातल्या मज्जातंतूंमध्ये असलेल्या झडपांमुळं हा द्रवपदार्थ मज्जातंतूंमध्ये किती येतो आणि त्यातून तो किती बाहेर पडतो, हे नियंत्रित होतं, अशी त्याची "हायड्रॉलिक-यांत्रिक' थिअरी होती. उदाहरणार्थ ः आपण जर पेटलेल्या आगीत हात नेला तर आपल्या त्वचेजवळचे रिसेप्टर्स उत्तेजित होऊन मेंदूतल्या पोकळीजवळची ठराविक झडप उघडली जाते आणि त्यामुळं तो द्रवपदार्थ तिथल्या मज्जातंतूंमध्ये वाहायला लागतो. त्यामुळे आपल्या तिथल्या स्नायूंना सूचना मिळून आपण हात बाजूला घेतो, असं देकार्तनं मांडलं; पण ही हात चटकन् काढून घेण्याची क्रिया खूप विचारपूर्वक केलेली नसते. ती आपोआपच होते. म्हणून तिला "रिफ्लेक्स ऍक्शन' म्हणायला लागले.
देकार्त आपल्या शरीराला एका यंत्रासारखं माने. ते आपल्या आत्म्याकडून किंवा मनाकडून आज्ञा स्वीकारतं आणि त्यांचं पालन करतं. पण या आज्ञा शरीरापर्यंत पोचतात कशा? मन आणि मेंदू यांच्यातला संवाद हा मेंदूतल्या पोकळीजवळ असणाऱ्या "पिनियल ग्लॅंड'मध्ये होतो, असं तो म्हणे. पण देकार्त आज प्रसिद्ध आहे तो त्याच्या पिनियल ग्लॅंडविषयीच्या विचारांमुळे नसून, त्यानं मन आणि मेंदू हे वेगळे मानल्यामुळे आहे. माणसाला मन असल्यामुळंच माणूस हा जगातल्या इतर गोष्टींपेक्षा वेगळा ठरतो; मनाला विश्वाचे नियम लागू पडत नाहीत; इतर सगळ्या गोष्टींना मात्र हे नियम लागू पडतात, असं देकार्त म्हणे 17 व्या शतकातला जॉन लॉक (1632-1704) यानं 1690 साली "एसे कन्सर्निंग ह्यूमन अंडरस्टॅडिंग' हे पुस्तक लिहिलं. तो मनाला मऊ मातीसारखंच माने. मनाच्या कोऱ्या पाटीवर अनुभवाचे बोल लिहिले जातात आणि त्यातूनच भावना आणि कल्पना निर्माण होतात असं लॉकला वाटे. लॉकनं ज्ञान हे फक्त निरीक्षण करून, अनुभव घेऊन आणि त्यावर विचार करूनच मिळतं असं सांगणारी "एम्पिरिसिझम' थिअरी मांडली.
मन आणि शरीर यांच्यात फरकच नसल्यामुळं एकानं दुसऱ्यावर प्रभाव पाडण्याचा प्रश्नच येत नाही, असं स्पिनोझा (1632-1676) हा तत्त्वज्ञ म्हणायचा. सुख, दुःख आणि इच्छा या तीन प्रमुख भावना आणि त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या आशा, आत्मविश्वास आणि नैराश्य वगैरे अठ्ठेचाळीस वेगवेगळ्या भावनांच्या छटांवरही स्पिनोझानं भाष्य केलं.
मन कसं काम करतं हेही अनुभवावरूनच सांगता येतं; याकरता देव किंवा आत्मा यांची गरजच नसते, असं मत डेव्हिड ह्यूमनं (1711-1776) मांडलं; तर मन हे "वस्तूं'नी बनलेलं असतं, असं सांगणारी जडवादाची (मटीरिऍलिस्टिक) थिअरी जेम्स मिल (1773-1836) या स्कॉटिश विचारवंतानं मांडली. त्यानं मानसशास्त्रावर लिहिलेलं "ऍनॅलिसिस ऑफ ह्यूमन माइंड' हे पुस्तक खूपच गाजलं.
मग वेगवेगळ्या चित्र-विचित्र थिअरीज निघाल्या. या मज्जातंतूंमधून वेगवेगळे अणू प्रवास करून आपली मनोवस्था ठरवतात, असं हॉब्जला वाटलं; तर मज्जातंतू कंप पावून मनोवस्था दाखवतात, असं डेव्हिड हार्टले म्हणायचा. माणूस हा यंत्रासारखा आहे, हे दाखवणारं "मॅन ः ए मशिन' या शीर्षकाचं पुस्तकसुद्धा फ्रेंच तत्त्वज्ञ ज्युलियां द ला मात्री यानं लिहिलं. मेंदूविषयीचं आपलं ज्ञान अनेक मार्गांनी वाढलं. त्यात कित्येक वाद-विवाद दडलेले आहेत; तर कित्येक प्रयोग आणि काही अपघातही! उदाहरणार्थ : अमेरिकेमध्ये सुमारे 160 वर्षांपूर्वी झालेल्या रेल्वे अपघातामुळे आपल्या मेंदूच्या ज्ञानात एवढी भर पडेल, असं कोणालाही वाटलं नसतं!
ता. 13 सप्टेंबर 1848 रोजी दुपारी व्हर्मोंटमधल्या कॅव्हेंडिश पासून पाऊण मैलावर रेल्वेची लाईन टाकण्याचं काम चालू होतं. 25 वर्षांचा फिनिआज् गेज हा अत्यंत कष्टाळू माणूस त्याचं नेतृत्व करीत होता. या कामात डोंगरातून वाट तयार करण्याकरता त्यानां स्फोटकं वापरावी लागत होती. त्यातलंच एक स्फोटक विचित्र तऱ्हेनं फुटून सात किलो वजनाचा एक मोठा लोखंडी दांडा गेजच्या डाव्या गालातून घुसून त्याच्या मेंदूला आणि कवटीला भोक पाडून डोक्यातून चक्क वर आला. कवटीला एवढं मोठं भोक पडलं होतं की त्यातून एखाद्याची मूठसुद्धा आत जाईल!
या स्फोटानंतर गेज अनेक यार्ड दूर एका खड्ड्यात जाऊन आदळला. बऱ्याच वेळापर्यंत गेज तिथेच विव्हळत पडला होता. ख्रिस्तोफर गुडरीच नावाच्या माणसानं त्याला आपल्या बैलगाडीत घालून गावातल्या जोसेफ ऍडॅमच्या एका लॉजवर नेऊन ठेवलं. गेज जगण्याची आता कोणालाच आशा वाटत नव्हती. त्यामुळे मृतांसाठीच्या शवपेट्या तयार करणारा थॉमस विन्स्लो या माणसानं गेज जिवंत असताना त्याची शवपेटी करण्यासाठी चक्क त्याच्या शरीराची मोजमापंही करून नेली!
पण गेजच्या नशिबानं एडवर्ड विल्यम्स आणि जॉन हार्लो या दोन डॉक्टरांनी त्याच्या जखमांवर अँटिसेप्टिक्सचा मारा केला आणि आश्चर्य म्हणजे मरणोन्मुख अवस्थेतला गेज न्यू हॅमशायरमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुंबाकडे विश्रांतीसाठी चक्क परतला! डॉक्टर हार्लोनं "बॉस्टन मेडिकल अँड सर्जिकल जर्नल'मध्ये याविषयी एक लेख लिहिला. असा लोखंडी दांडा डोक्यातून जाऊनसुद्धा गेज हा कसा व्यवस्थित बोलतोय, चालतोय, त्याचे हातपाय मुक्तपणे कसे हालवू शकतोय आणि त्याच्या संवेदनासुद्धा कशा नॉर्मल आहेत, याविषयी त्या लेखात लिहिलं होतं. हे वाचणाऱ्यांनी आश्चर्यानं तोंडात बोटंच घातली!
गेजच्या या गोष्टीचा उल्लेख मज्जाविज्ञानावरच्या बहुतेक सर्व पुस्तकांत झाला; पण गेज आता पूर्वीचा गेज राहिला नव्हता. गेजच्या डाव्या डोळ्यची दृष्टी गेली होती आणि त्या कपाळावर दीड ते दोन इंचाचा खोलवर व्रण शिल्ल राहिला होता. शांत आणि धीरगंभीर गेज आता चिडचिडा आणि आक्रमक झाला होता. त्याच्या सुस्वभावी आणि मनमिळाऊ स्वभावाचं रूपांतर आता हट्टी आणि अहंकारी स्वभावात झालं होतं. एवढंच नाही तर एके काळचा लाजाळू गेज आता कोणाकडेही आपली लैंगिक इच्छा व्यक्त करे. या सगळ्यांमुळे त्याची पूर्वीची नोकरीही गेली आणि तो आयुष्यात भरकटला. सफाई कामगार, कोचमन, वेटर, तबेल्यात घंची निगा राखणारा सेवक आणि काही काळ तर चक्क न्यूयॉर्कच्या बार्नमच्या सर्कशीतसुद्धा त्यानं काम केलं! पण हळूहळू त्याची प्रकृती खालावली. त्याला सतत फेपरं यायला लागलं आणि 1860 साली त्याचा मृत्यू झाला. 1867 त्याचं शरीर पुन्हा उकरून त्याचं पोस्टमार्टेम करण्यात आलं आणि डॉक्टर हार्लोनंच गेजची भोक पडलेली कवटी आणि तो कुप्रसिद्ध लोखंडी दांडा हे हार्वर्डमधल्या मेडिकल स्कूलला भेट दिलं. अजूनही "काउंट वे लायब्ररी ऑफ मेडिसिन'मध्ये ते आपल्याला पाहायला मिळतं.
या अपघातामुळे एक मात्र झालं. वेगवेगळ्या गोष्टींसाठी मेंदूत वेगवेगळे भाग असतात की नाही, यावर आता खूप संशोधन, चर्चा, वाद आणि एकूणच मेंदूविज्ञानाचा सखोल अभ्यास सुरू झाला. एकंदरीत मेंदूविषयी असं म्हणता येईल:
बांधतो मी व्यथांचे फक्त भारे

फ्रेनॉलॉजी नावाचं 'फसवं विज्ञान'
sakal, Jan 16 2011
ग्रीक भाषेत "फ्रेन' म्हणजे मन आणि "लागोस ' म्हणजे ज्ञान किंवा विचार. यावरूनच "फ्रेनॉलॉजी' हा शब्द आला. फ्रेनॉलॉजीमध्ये डोक्याच्या आकारावरून मनाविषयीचे अंदाज बांधले जात.
डॉ. फ्रॅंझ जोसेफ गॉल (1758-1928) या जर्मन डॉक्टर आणि शरीरशास्त्रज्ञानं 1770 च्या दशकात योहॅन स्पर्झेम या त्याच्या विद्यार्थ्यासमवेत "फ्रेनॉलॉजी' नावाचं एक "फसवं विज्ञान' (स्यूडोसायन्स) निर्माण केलं. ग्रीकमध्ये "फ्रेन' म्हणजे मन आणि "लागोस' म्हणजे ज्ञान किंवा विचार. यावरूनच "फ्रेनॉलॉजी' हा शब्द निघाला. फ्रेनॉलॉजीमध्ये डोक्याच्या आकारावरून मनाविषयीचे अंदाज बांधले जात. मेंदूतच आपलं मन असतं, हे गॉलला समजलं होतं. मनाला अनेक बाजू आणि कंगोरे असल्यामुळे मेंदूतले वेगवेगळे भाग मनाच्या निरनिराळ्या आविष्कारांना जबाबदार किंवा कारणीभूत असतात; तसेच मोठा मेंदू असलेल्यांचं मनही जास्त सक्षम आणि सशक्त असतं असं तो माने. एखाद्याच्या मनाचा जो कंगोरा जास्त सक्षम असेल, त्याचप्रमाणे मेंदूचाही तो भाग जास्त मोठा असेल आणि कवटीच्या आकारावरून, खाच-खळग्यांवरून आणि उंचवट्यांवरून कवटीच्या खालच्या मेंदूची आपल्याला कल्पना येईल आणि त्यामुळे कुठलाही माणूस मोकळ्या स्वभावाचा आहे का रागीट आहे, फसवा आहे की प्रामाणिक आहे, हे डोक्याच्या आकारावरून ओळखता येणं शक्य आहे असा हास्यास्पद दावा फ्रेनॉलॉजी करे.
फ्रेनॉलॉजीची मूळ कल्पना तशी जुनी आहे. चेहऱ्याच्या आकारावरून माणसाचा स्वभाव आणि मानसिक अवस्था ओळखता येतात, असे "फिजिओनॉमी' या ग्रीक काळातल्या थिअरीत पूर्वी सांगितले होते. अठराव्या शतकात "योहॅन कॅस्पर लॅव्हेटर' या स्विस धर्मपंडिताने आणि गूढवाद्याने "सायन्स ऑफ फिजिओनॉमी' या आपल्या चारखंडीय ग्रंथाने या तंत्राला पुन्हा लोकप्रियता मिळवून दिली आणि आश्चर्य म्हणजे 1775 ते 1810 यादरम्यान त्याच्या 55 आवृत्या निघाल्या!
डार्विनचा जगप्रसिद्ध प्रवास झालेल्या बीगल बोटीचा कॅप्टन फिट्झरॉय याच लॅव्हेटरचा शिष्य होता. त्याच्याच तत्त्वाप्रमाणे फिट्झरॉयने डार्विनचे नाक तपासले होते आणि अशा नाकाच्या माणसाला असला कठीण प्रवास करता येईल की नाही, याची त्याला शंका आल्याने त्याने डार्विनला जवळपास नापासचं केले होते. शेवटी फिट्झरॉयसमोर आपले नाक घासूनच डार्विनला बीगल बोटीवर पाऊल टाकता आले! या फिजीओनॉमीचा मानसशास्त्रावर थेट परिणाम झाला नसला तरी त्याचा फ्रेनॉलॉजीवर नक्कीच प्रभाव पडला होता.
जर माणसाच्या मेंदूचा कॉर्टेक्स प्राण्याच्या मेंदूच्या कॉर्टेक्सपेक्षा विकसित आणि मोठा असल्यामुळे माणूस जास्त बुद्धिमान ठरत असेल, तर कॉर्टेक्समधल्या इतरही गोष्टींमुळे माणसाच्या स्वभावातले कंगोरे कळू शकतील, असे गॉलला वाटले. त्याच्या बालमित्राचे डोळे खूप मोठे आणि बाहेर आल्यासारखे असल्यामुळे त्याच्या मेंदूचा मागचा भाग मोठा असला पाहिजे आणि त्याचा मेंदू त्याची भाषा आणि स्मरणशक्ती यावर नियंत्रण ठेवत असला पाहिजे आणि म्हणूनच आपल्या बालमित्राची भाषा आणि स्मरणशक्ती चांगली आहे, असे गॉलला वाटे! याचा अर्थ मेंदूचे वेगवेगळे भाग शरीराच्या आणि मनाच्या निरनिराळ्या भागांवर नियंत्रण ठेवत असतील, असे गॉलला वाटले. "थॉमस रीड' याने मनाच्या अनेक छटांविषयी लिहून ठेवले होतेस हे गॉलला माहीत होते. या मनाच्या प्रत्येक छटेसाठी किंवा गुण-अवगुण यांच्यासाठी मेंदूतील एक विशिष्ट जागा राखीव ठेवलेली असते, असे गॉलला वाटले. गॉलचे हे विचार म्हणजे मानसशास्त्रातले पुढचे पाऊलच होते; पण तरीही तो एक "क्रॅकपॉट' म्हणूून इतिहासात गणला गेला.
गॉल आणि स्पर्टझाईम यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या; तसेच तुरुंग, वेड्यांची इस्पितळे वगैरे ठिकाणच्या हजारो लोकांच्या कवट्या तपासल्या. या तपासानंतर त्यांनी मेंदूतले 27 भाग शोधून काढले. स्पर्टझाईमने नंतर हा आकडा 37 वर नेला. यातला प्रत्येक भाग हा मनाच्या राग, आनंद, दयाळूपणा वगैरे गोष्टींसाठी कारणीभूत असतो, असे मत त्यांनी मांडले.
गॉलची पुस्तके आणि स्पर्टझाईमची भाषणे यांच्यामुळे फ्रेनॉलॉजीचा प्रभाव पुढचे एक शतक टिकला. इंग्लंडमध्ये तर कहरच झाला. आज जशा कंपन्या कामावर ठेवताना बुद्ध्यंक चाचण्या घेतात, तसे त्या वेळचे उद्योगपती अर्जदारांना फ्रेनॉलॉजिस्टकडून त्यांच्या कवट्या तपासून घ्यायला सांगू लागले. मग वंश, रंग आणि इतर अनेक गोष्टींवरून भेदभाव करून अनेकांना नोकऱ्या नाकारण्यासाठीही फ्रेनॉलॉजीचा उपयोग वरिष्ठ वर्गानं करून घेतला! कित्येक बाबतीत फ्रेनॉलॉजिस्ट मंडळींनी ज्योतिषी म्हणूनच वावरायला सुरवात केली. लग्नाअगोदर वधू-वरांनी आपल्या कवट्या तपासून घेण्याचे प्रकारही सुरू झाले.
माणसे मग फ्रेनॉलॉजिस्ट मंडळींकडे आपले डोके तपासायला जात. मग टेप, कंपास आणि चित्रविचित्र तऱ्हेची साधने वापरून ते फ्रेनॉलॉजिस्ट्स त्यांच्या डोक्याच्या गुंतागुंतीची मोजमापे घेत आणि यावरून कुठला माणूस कुठला व्यवसाय करेल किंवा कुठला माणूस गुन्हेगार किंवा खुनी होईल, याची भाकितंही करत; पण त्यावरची टीकाही वाढत होती.
अमेरिकेत तर डोक्याची मोजमापे करून त्यावरून निष्कर्ष काढण्यासाठी काही स्वयंचलित यंत्रेही निघाली होती! अशाच तऱ्हेचे "ऑटोमॅटिक इलक्ट्रिक फ्रेनॉमीटर' हे यंत्र अजूनही मिनेसोटा येथील सायन्स म्युझियममध्ये "कलेक्शन ऑफ क्वेश्चनेबल मेडिकल डिव्हाइसेस' या विभागात ठेवलेले आहे. लोरेन्झो नाईल्स फाउलर आणि ऑर्सन स्क्वीअर फाउलर हे अमेरिकन बंधू त्या काळातले प्रसिद्ध फ्रेनॉलॉजिस्ट होते. त्यापैकी ऑर्सनने न्यूयॉर्कमध्ये तर लोरेन्झोने इंग्लंडमध्ये फ्रेनॉलॉजीचा व्यवसाय सुरू केला. फ्रेनॉलॉजीला काहीच वैज्ञानिक आधार नाही, असे वैज्ञानिकांच्या खूप पूर्वी लक्षात येऊनही नाझी जर्मनीत नाझी मंडळींनी त्याचा उपयोग त्यांना पाहिजे तसा करून घेतला. या कवटीच्या आकारावरून तो मनुष्य आर्य वंशाचा आहे की नाही, हे ठरवण्याचा हुकूमही हिटलरच्या जर्मनीमध्ये दिला गेला होता. कोण ज्यू आहे, हे तपासण्यासाठीही फ्रेनॉलॉजीचा वापर झाला.
1876 साली सीझर लोम्ब्रोसो या वंशवादी इटालियन डॉक्टरने "दी क्रिमिनल मॅन' नावाचे पुस्तक लिहिलं. ते खूपच गाजले. माणसाची कवटी तपासून आणि मोजून त्याच्यातल्या गुन्हेगारी प्रवृत्तीविषयी अंदाज बांधता येतात, असे त्याने त्यात सांगितले होते. यासाठी त्याने जिवंत आणि मेलेल्या अशा अनेक गुन्हेगारांच्या कवट्या तपासल्या होत्या!
गॉलचे मेंदूवरचे संशोधन रोमन कॅथॉलिक चर्चला धर्माच्या विरोधात जाणारे वाटले, तर वैज्ञानिकांना त्यात कुठलाच शास्त्रीय आधार नाही, असे वाटले. त्याच्यावर ऑस्ट्रियात टीका होऊ लागली. त्याच्या या शिकवणुकीवर सम्राट फ्रान्सिस पहिला खूपच वैतागला. आत्मा, मन वगैरे गोष्टींपेक्षा डोके, मेंदू यांच्यासारख्या गोष्टींवर गॉल भर देतोय, तो नास्तिक आहे, अनैतिक आहे, तो जडवादी आहे, या आरोपांखाली सम्राटाने गॉलला भाषण देण्यावर बंदी घातली. शेवटी 1807 साली व्हिएन्ना सोडून गॉल काही दिवस जर्मनीमध्ये राहून नंतर पॅरिसला आला. तेथेही नेपोलियनने त्याच्या शिकवणुकीवर बंधने लादली. शिवाय "इन्स्टिट्यूट ऑफ फ्रान्स'ने त्याच्या कल्पना धुडकावल्या; तरीही फ्रेंच सुशिक्षित आणि बुद्धिवंतांमध्ये गॉलला खूप मान होता. 1823 साली त्याला "रॉयल स्वीडिश ऍकॅडमी ऑफ सायन्सेस'मध्ये फॉरेन मेंबर म्हणून सन्माननीय सभासदत्व मिळाले.
फ्रेनॉलॉजीला विरोधक होतेच. कवटीच्या आकारावरून माणसाचे मन कळते, याला तर विरोध होताच; पण मेंदूतले वेगवेगळे भाग शरीरातल्या आणि मनाच्या वेगवेगळ्या भागांवर नियंत्रण ठेवतात, हेही कित्येकांना मान्य नव्हते. याच संदर्भातला गॉल विरुद्ध फ्लोरॉन्स हा वाद पूर्वी रंगला होता. 19 व्या शतकात प्येर जॉं फ्लोरॉन्स (1794-1867 ) या प्रसिद्ध शरीरविज्ञानशास्त्रज्ञाने फ्रेनॉलॉजीला कडाडून विरोध केला. तो तर गॉलला "माणसांच्या कवट्या गोळा करण्याचे खूळ लागलेला वेडा'च समजे. फ्लोरॉन्सने "होलिझम' या तत्त्वाचा पुरस्कार केला. मेंदूच्या वेगवेगळ्या भागाचे कार्य शोधण्यापेक्षा मेंदूकडे एक संपूर्ण एकसंध घटक म्हणून पाहिले पाहिजे, या विचारपद्धतीला "होलिझम' (हेश्रळीा) असे म्हणतात. कित्येक पक्षी, उंदीर, मांजरे, कुत्रे यांच्यावर अनेक राक्षसी प्रयोग केल्यावर तो या निष्कर्षापर्यंत येऊन पोचला होता. तो प्राण्यांच्या मेंदूचे भाग छाटून टाके. प्रथम एक लहान भाग कापे. त्याच्यावर होणारा परिणाम बघे. मग आणखी मोठा भाग कापे. असे करत करत प्राण्यांच्या मेंदूतला खूप मोठा भाग काढून टाकला तरी त्या प्राण्याच्या वागणुकीत काहीच फरक पडत नाही, असे त्याचे म्हणणे होते. त्यामुळे श्रवण, दृष्टी, स्पर्श आणि इतर अनेक गोष्टींसाठी मेंदूमध्ये वेगेवेगळे विभाग नसतात, तर ते मेंदूत विखुरलेले असतात, असे तो मांडायला लागला. मग गॉल बरोबर होता की फ्लोरॉन्स? शेवटी या दोन विचारप्रवाहांत तडजोड झाली. खूप सोप्या आणि मूलभूत गोष्टी यांच्यासाठी मेंदूतले विशिष्ट भाग असतात; पण स्मृती, बुद्धी, कारणमीमांसा वगैरे गोष्टी मात्र नियंत्रित करणारी केंद्रे मेंदूत विखुरलेली असतात, असे 19 व्या शतकातले बहुतेक सगळे वैज्ञानिक मानायला लागले.
गॉल शेवटपर्यत फ्रान्समध्येच राहिला. गॉलकडे अनेक कवट्या संग्रही होत्या. पण न्यूरॉलॉजीच्या इतिहासातला दैवदुर्विलास बघा! 1828 साली गॉल हा मेंदूच्या "स्ट्रोक'मुळे मरण पावला आणि त्याच्याकडे अभ्यासाला असलेल्या कवट्यांमध्ये आणखी एकीची भर पडली!

Sunday, January 9, 2011
कल्पनाशक्ती कशात? मेंदूत की हृदयात?
सौजन्य - सकाळ - सप्तरंग, ९ जाने २०१०
ऍरिस्टॉटलच्या काही थिअरीज मात्र पूर्णपणे वेडगळ होत्या. "उन्हाळ्यात पाणी प्यायले तर उंदीर मरतात', "ईल मासा अचानकच शून्यातून निर्माण होतो' किंवा "माणसाच्या शरीरात फक्त आठ बरगड्या असतात', "स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी दात का असतात', अशा अनेक हास्यास्पद थिअरीज् तो मांडे.
प्राचीन काळापासून माणसाला झोप, जागेपण, स्वप्न, भीती, राग, लोभ, वासना, आनंद आणि दुःख अशा अनेक गोष्टींविषयी कुतूहल वाटे. मन म्हणजे काय? की मन म्हणजेच आत्मा, हेही प्रश्न माणसाला भेडसावत होतेच. तसेच या भावनांचे कल्लोळ मेंदूत उमटतात की हृदयात, या प्रश्नानेही त्याला भंडावून सोडले होते. अनेक शतकांनंतर शेक्सपीअरने "मर्चट ऑफ व्हेनिस'मध्ये "आपली कल्पनाशक्ती कशात वास्तव्य करते? हृदयात की मेंदूत?' असा सवाल केला होता.
कित्येकांना मेंदूपेक्षा हृदयच महत्त्वाचं वाटे. इजिप्तमध्ये माणूस मेल्यानंतर त्याचे हृदय अतिप्राचीन काळी बराच काळ जपून ठेवले जाई; पण मेंदू मात्र नष्ट करण्यात येई! नाकाच्या मागच्या बाजूने कवटीला एक मोठे भोक पाडून त्यातून तो मेंदू खरवडून काढून मग तो फेकून देत असत. तसे केले नाही तर मेंदूचा भाग कुजून जाईल म्हणून ते हा उपद्व्याप करत असत; पण कित्येकांना मेंदू महत्त्वाचा वाटे. मेंदूच्या रचनेचा अभ्यास फार पूर्वीपासून सुरू झाला आहे. ही रचना कळण्यासाठी माणसांनी मेलेल्या माणसांच्या कवटीला भोक पाडून मेंदूचे निरीक्षण करायला सुरवात केली.
ग्रीक भाषेत आत्म्याला "सायकी' आणि अभ्यासाला "लॉजिया' असे म्हणतात. म्हणूनच आत्म्याचा अभ्यास म्हणजे "सायकॉलॉजी'. प्रत्यक्षात मात्र "सायकॉलॉजी' हा शब्द जर्मन तत्त्वज्ञ रुडॉल्फ गॉकेल (1547 ते 1628) याने प्रथम वापरला आणि ख्रिस्तिऍन वोल्फ (1679 ते 1754) या दुसऱ्या जर्मन तत्त्वज्ञाने तो लोकप्रिय केला. ख्रिस्तपूर्व 510 मध्ये अल्क्मेऑन याने सर्वप्रथम विच्छेदनाची कल्पना मांडली. आपल्याला होणाऱ्या संवेदनांचे, जाणिवांचे (सेन्सेशन) केंद्रस्थान मेंदूतच आहे, हे त्याने ओळखले होते. त्याने एका प्राण्याचा डोळा काढला आणि डोळ्यापासून संदेश कसा आणि कुठे जातो, याचा मागोवा घेतला, तेव्हा तो संदेश मेंदूपर्यंत जातो, हे त्याच्या लक्षात आले. अल्क्मेऑनची काही मते मात्र गमतीशीरच होती. "आपल्या मेंदूतल्या रक्तवाहिन्या पूर्णपणे भरलेल्या असल्या की, आपल्याला झोप येते आणि त्या रिकाम्या झाल्यावर आपल्याला जाग येते; तसेच आपल्या डोळ्यांत अश्रूंप्रमाणेच अग्नीही असतो', अशी चमत्कारिक मते तो मांडत असे! गंमत म्हणजे "संदेश आपल्या सेन्सेसमधून मेंदूपर्यंत हवेतून प्रवास करतात', असे तो म्हणे.
हिपोक्रेटस हा ग्रीक डॉक्टर आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक मानला जातो. त्यालाही हृदयापेक्षा मेंदूच महत्त्वाचा वाटे. "मेंदूमधूनच सुख-दुःख, वेदना, आनंद, हास्य आणि द्वेष वगैरेंसारख्या भावना निर्माण होऊन आपल्यासमोर प्रकट होतात,' असे तो म्हणे. "आपण वेडे आहोत की शहाणे, आपल्याला वाटणारी भीती आणि चिंता, आपल्या झोपेचे वेळापत्रक; आपली स्मरणशक्ती आणि विसरभोळेपणा या सगळ्यांचे रहस्य मेंदूत दडले आहे', असे तो म्हणे.
इतक्या पूर्वी आधुनिक प्रयोगशाळा आणि उपकरणे नसताना त्याने हे म्हणून ठेवावे, हे एक आश्चर्यच होते.
डेमोक्रॅटस (ख्रिस्तपूर्व 460 ते 362) याला आजूबाजूच्या लोकांच्या चुका आणि वेडेपणा बघून हसूच येई. त्यामुळे त्याला "लाफिंग फिलॉसॉफर' असेच म्हणत असत. त्यालाही मेंदूच मानवी शरीराचा केंद्रबिंदू आहे, असे वाटे. सगळ्या वस्तू अणूंच्या बनलेल्या असतात, हे तत्त्व त्यानेच मांडले. "आपण एखादी गोष्ट बघतो, तेव्हा त्या वस्तूचे काही अणू त्यांच्या संपर्कात असलेल्या हवेच्या अणूंवर आपला ठसा उमटवतात. हे हवेचे अणू मग प्रवास करत करत आपल्या डोळ्यांपर्यंत येतात आणि आपल्या डोळ्यांतल्या अणूंवर आणि मनावर परिणाम करतात, तेव्हा ती वस्तू आपल्याला दिसायला लागते, असे तो म्हणायचा.
शरीर आणि मेंदू यांच्यापासून आपला आत्मा वेगळा असतो, असे सॉक्रेटिस माने. सॉक्रेटिस सगळ्यांत ज्ञानी आणि शहाणा माणूस आहे, असे त्याच्याविषयी म्हटले जायचे. त्यावर तो म्हणे, "मला काय माहीत नाही, हे मला चांगले माहीत आहे आणि त्या अज्ञानाच्या बाबतीत मी इतरांपेक्षा ज्ञानी आहे.' सॉक्रेटिस प्रश्न विचारून लोकांना विचार करायला लावायचा. म्हणून त्याला "विचारांची सुईण' (मिडवाईफ ऑफ थॉट) म्हटले जायचे.
प्लेटो (ख्रिस्तपूर्व 427-347) या सॉक्रेटिसच्या शिष्याचाही आत्म्यावर विश्वास होता. आज आपण ज्याला "मन' असे म्हणतो, त्याला प्लेटो "आत्मा' म्हणत असे. गंभीर वृत्तीचा प्लेटो कधीही खळखळून हसत नसे. त्याने लिहिलेल्या काही प्रेमकविता अजूनही उपलब्ध आहेत. प्लेटोने ख्रिस्तपूर्व 387 साली एक अकादमी काढली. त्याला भूमितीचे इतके वेड होते की, त्याच्या अकादमीत भूमिती न येणाऱ्यास प्रवेशास मनाई असल्याची पाटी चक्क लावलेली होती. त्याच्या मते गोलाकार हा परिपूर्ण (परफेक्ट) आकार असतो. माणसाचे डोके हे सर्वसाधारणपणे गोलाकार असल्यामुळेच त्यातला मेंदू आपले मन नियंत्रित करत असला पाहिजे, असे त्याचे मत बरोबर असले तरी ते विचित्र युक्तिवादाने तयार झालेले होते! आपली कारणमीमांसा आपल्या मेंदूत, आपले स्पिरिट आपल्या हृदयात; तर आपली भूक आपल्या पोटात दडलेली असते आणि या सगळ्या गोष्टी आपल्या पाठीतल्या कण्यातल्या "मॅरोज'ने एकमेकांशी जोडलेल्या असतात. आपल्या भावना रक्तवाहिन्यांमधून वाहतात, असे प्लेटोला वाटायचे.
ख्रिस्तपूर्व 384 ते 322 च्या दरम्यान ऍरिस्टॉटल हा एक मोठा प्रभावशाली विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या विचारांनी पुढची 1500 वर्षे पाश्चिमात्य तत्त्वज्ञानावर राज्य केले. प्लेटोजवळ 20 वर्षे शिकल्यानंतर दोघांमधल्या मतभेदांमुळे ऍरिस्टॉटलने अकादमी सोडून स्वतःची मते स्वतंत्रपणे मांडायला सुरवात केली. त्याने खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, नीतिशास्त्र, धर्म, सौंदर्यशास्त्र, जीवशास्त्र, राज्यशास्त्र आणि मानसशास्त्र या सगळ्यांमध्ये खोलवर विचार केला. स्मृती, संवेदना, प्रेरणा, भावना, व्यक्तिमत्त्व अशा मानसशास्त्राशी निगडित अनेक गोष्टींवर त्याने भाष्ये केली. त्याच्या "डी ऍनिमा' या ग्रंथात तो प्रेरणा आणि व्यक्तिमत्त्वं यांच्याविषयी बोलतो. "शरीर आणि आत्मा यांचे अस्तित्व वेगळे असून, आत्मा हा माणसाच्या सगळ्या विचारधारेचे मूळ आहे', असे ऍरिस्टॉटल म्हणे.
ऍरिस्टॉटलला मेंदूपेक्षा हृदय सगळ्यांत महत्त्वाचे वाटे. किडे, अळ्या, शेलफिश अशा अनेक प्राण्यांच्या शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्या हृदयाकडेच धाव घेत होत्या, असे त्याने अभ्यासले होते. स्पर्श केल्यावर हृदय एकदम झटका लागल्यासारखे आखडते; पण मेंदूला स्पर्श केल्यावर तसे काहीच होत नाही, हेही ऍरिस्टॉटलने अभ्यासले होते. कोंबडीचे डोके कापल्यावरही ती काही काळ का होईना पण पळू शकते, हे त्याने पाहिले, तेव्हा तर मेंदूपेक्षा हृदयच जास्त महत्त्वाचे आहे आणि तेच शरीराला नियंत्रित करते, त्यातच आपल्या आत्म्याचे वास्तव्य असते, याबद्दल त्याची खात्री पटली. इसवीसन 130 ते 200 दरम्यानचा प्रसिद्ध डॉक्टर आणि वैज्ञानिक गेलन याला मात्र आपल्या मेंदूत आपले मन दडलेले आहे, याची खात्री होती. त्या काळी माणसाच्या मृतदेहाचे विच्छेदन करणे, हा त्या मृत माणसाचा अपमानच समजला जाई. त्यामुळे गेलनने अनेक डुकरे, माकडे आणि गुरे-ढोरेंचे विच्छेदन केले. त्याने डुकराच्या मेंदूपासून त्याच्या अवयवापर्यंत जाणाऱ्या नर्व्हज् कापून याचे त्यांच्यावर काय परिणाम होतात, याविषयीच्या निरीक्षणांची बारकाईने टिपणे करून ठेवली. त्याने पाठीच्या कण्यापासून निघणारे अनेक मज्जातंतू एकेक करत कापायला सुरवात केली.
कुठला मज्जातंतू कापल्यावर शरीरातल्या कुठल्या भागावर काय परिणाम होतो, हे गेलनला बघायचे होते. स्वरयंत्राकडे जाणारा मज्जातंतू कापला तर स्वरयंत्रातून आवाजच येत नाही, हे त्याने न्याहाळले होते. त्या काळी ग्लॅडिएटर्स योद्ध्यांची हिंस्र प्राण्यांशी किंवा आपापसात झुंज लावून त्यांची गंमत बघायची हा रोममधल्या श्रीमंतांचा विरंगुळाच होता. ग्लॅडिएटर्सचा डॉक्टर म्हणून काम बघत असल्यामुळे गेलनला अनेक डोकी, मेंदू, मज्जातंतू यांचा अभ्यास करणे शक्य झाले. त्यावरून आपल्या संवेदना आणि सुख-दुःखे यांना मेंदूच कारणीभूत असतो, असे गेलनचे मत झाले होते. एकूण काय तर, मेंदूच्या रचनेने संशोधकांचे चांगलेच डोके खाल्ले होते!

Subscribe to:
Posts (Atom)