Saturday, October 15, 2011

फोबियाचे प्र का र

July 03, 2011

भीतीची भावना ही माणसाच्या अनेक भावनांपैकी एक महत्त्वाची भावना आहे. ती काही प्रमाणात उपयोगी आणि गरजेचीही आहे. यामुळेच ती उत्क्रांतीच्या प्रक्रियेत निर्माण झाली असावी आणि टिकली असावी, असं उत्क्रांतिवादी मानसशास्त्रज्ञ (इव्होल्यूशनरी सायकॉलॉस्टस) म्हणतात. उदाहरणार्थ, कित्येकजणांना रक्ताची भीती वाटते. अशा लोकांना रक्त ब घितलं की प्रथम हृदयाचे ठोके आणि रक्तदाब खूप वाढतो आणि नंतर तो खाली जातो. यानंतर त्यांना घृणा वाटायला लागते. नंतर घेरी येणं, बेशुद्ध पडणं इथपर्यंतही पाळी जाऊ शकते. रक्त बघितल्यावर जर घेरी आली तर शत्रूचे आणखी हल्ले होणार नाहीत आणि रक्तदाब कमी झाल्यानं जर हल्ला झालाच; तर रक्तस्राव कमी होईल यामुळे हे शारीरिक बदल घडत असावेत आणि असं होत असणारे जीव उत्क्रांतीच्या स्पर्धेत टिकून राहिले असले पाहिजेत. असं त्यांचं म्हणणं आहे. जर आपल्याला भीतीच वाटली नसती तर आपण वन्य पशूकडे किंवा आगीत स्वतःहून गेलो असतो आणि मेलो असतो. त्यामुळे भीती ही हवीच; पण हीच भीती जर वाजवीपेक्षा प्रचंड जास्त वाटायला लागली आणि जर ती आपल्या दैनं दिन आयुष्यात मध्ये यायला लागली तर मात्र त्याला भयगंड किंवा फोबिया असं म्हणतात. "फोबिया' हा शब्द 1786 मध्ये पहिल्यांदा वापरला गेला.
वैद्यशास्त्राचा जनक ग्रीक तत्त्ववेत्ता हिपोक्रिटस यानं फोबियाग्रस्त रुग्णांचं वर्णन करून ठेवलं आहे. निकॅनॉर नावाच्या तरुणाला बासरीचे सूर ऐकू आले की तो त्या ठिकाणाहून घाबरू न पळून जात असे. डेमोक्‍लिस नावाच्या राजाला ओढा किंवा नाला ओलांडण्याची प्रचंड भीती वाटत असे. राणी एलिझाबेथ हिला गुलाबांच्या फुलांची प्रचंड भीती वाटत असे असं म्हणतात. सातव्या एडवर्डला 13 या आकड्याची भीती वाटत असे. 13 आकड्याची धास्ती एडवर्डलाच नाही; तर अजूनही इतक्‍या लोकाना आहे की अनेक ठिकाणी 13 आकडा वापरलाच जात नाही. त्यातून या आकड्याविषयी वाटणारी अंधश्रद्धा वेगळीच!

शेकडो तऱ्हेच्या गोष्टी किंवा प्रसंग यांच्या भीतीतून शेकडो तऱ्हेचे फोबियाज किंवा भयगंड माणसांमध्ये निर्माण होऊ शकतात. या फोबियाची यादी प्रचंडच मोठी आहे. फक्त अल्फ ाबेट्‌सप्रमाणे या फोबियाची यादी केली तरी ती खूप मोठी आहे. फक्त "अ' किंवा "झ' या अक्षरांपासून सुरू होणारे प्रत्येकी 60 च्या वर फोबियाज आहेत! हे फोबियाजही प्रचंड चि त्रविचित्र असतात. उदाहरणार्थ "ऍब्लुटोफोबिया' म्हणजे धुण्याची किंवा अंघोळीची भीती, ऍजायरोफोबिया म्हणजे रस्त्यांची किंवा रस्ता ओलांडायची भीती. ऍलिअमफोबिया म् हणजे लसणाची भीती, ऍमॅथोफोबिया म्हणजे धुळीची भीती, ऍम्ब्युलोफोबिया म्हणजे चालण्याची भीती, ऍनाब्लेफोबिया म्हणजे वर बघण्याची भीती, ऍन्थोफोबिया म्हणजे पुलांची भीती. ऍफेन्फॉस्मफोबिया म्हणजे स्पर्शाची भीती, ऑरोफोबिया म्हणजे सोन्याची भीती, बिब्लिओफोबिया म्हणजे पुस्तकांची भीती, कॅलिगायनोफोबिया म्हणजे सुंदर बायकांची भीती, कॅथिसोफोबिया म्हणजे बसण्याची भीती, कॅटोप्ट्रोफोबिया म्हणजे आरशांची भीती, चेटोफोबिया म्हणजे केसांची भीती, क्रेमॅटोफोबिया म्हणजे पैशांची भीती, क्‍लिनोफोबिया म्हणजे झोपायची भीती, कॉइटोफोबिया म्हणजे संभोगाची भीती, कॉप्रोफोबिया म्हणजे विष्ठेची भीती, डेन्ड्रोफोबिया म्हणजे झाडांची भीती, इकोफोबिया म्हणजे घरांची भीती, एपिस्िटमोफोबिया म्हणजे ज्ञानाची भीती, एर्ग्रोफोबिया म्हणजे कामाची भीती, युरोटोफोबिया म्हणजे स्त्रीयोनीची भीती, जिनुओफोबिया म्हणजे हनुवटीची भीती, जेन्युफोबिया म्हणजे गुडघ् याची भीती, मेट्रोफोबिया म्हणजे कवितांची भीती, ओमॅटोफोबिया म्हणजे डोळ्यांची भीती, युरॅनोफोबिया म्हणजे स्वर्गाची भीती, पॅपिरोफोबिया म्हणजे कागदाची भीती, फॅलोफोबिया म्हणजे उत्तेजित शिस्नाची भीती, फार्मेकोफोबिया म्हणजे औषधांची भीती, प्लुटोफोबिया म्हणजे संपत्तीची भीती, पोगोनोफोबिया म्हणजे दाढीची भीती, थासोफोबिया म्हणजे कंटाळ् याची भीती. आणि कळस म्हणजे फोटोफोबिया म्हणजे भीतीची भीती... असे अनेक चित्रविचित्र फोबियाजचे प्रकार आहेत.

"ऑटोमेट्रोनोफोबिया' म्हणजे बोलक्‍या बाहुल्यांची भीती. 1978 मध्ये "मॅजिक' या चित्रपटात ऍन्थनी हॉपकिन्स यानं काम केलं होतं. त्यात "फॅटस' नावाची बोलकी बाहुली दाखवली होती. या बाहुलीच्या भीतीवर हा चित्रपट आधारित होता. हा चित्रपट जरी प्रचंड ग्रेट नसला तरी त्यातलं ऍन्थनी हॉपकिन्सचं काम सुंदर झालं होतं. "तात्या विंचू'साठी आवाज दिलेले दिलीप प्रभावळकर सर्वांना आठवत असतील. त्यासाठी महेश कोठारेंचा लक्ष्मीकांत बेर्डेसोबतचा "झपाटलेला' हा मराठी चित्रपट असाच थरारलेला होता. "कल्रोफो बिया' म्हणजे विदूषकांची भीती. कमल हसनचा "अप्पूराजा' या चित्रपटात याचं चित्रण केलं आहे.

"अराचनोफोबिया' म्हणजे कोळ्याची भीती, 1990 मध्ये याच नावाचा एक चित्रपट निघाला होता. ज्याच्या दंशामुळे माणूस ताबडतोब मरण पावेल, अशी कोळ्याची एक जात यात दाखवली होती. "ऍफिरिओफोबिया' म्हणजे सापांची भीती, हिंदीत तर यावर अनेक चित्रपट निघालेत. "नगिना' सिनेमातली श्रीदेवी, "नागीन' सिनेमातली सूड घेणारी रीना रॉय, रत्नाकर मतकरी यांची "पावसातला पाहुणा' हीही अशीच कथा आहे. त्यात कालदमन नावाचा माणूस त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाला मारायला साप पाठवत असतो. 1997 मध्ये आलेला "ऍनाकोंडा' हाही चित्रपट सापाविषयीच होता. "म्यूसोफोबिया' म्हणजे उंदरांची भीती. 1971 मध्ये आलेला "विलार्ड' हा चित्रपट यावरच आधारलेला होता.

2002 ते 2009 च्या दरम्यान स्टार वर्ल्ड वाहिनीवर "मॉंक' ही मालिका प्रचंड गाडली, अँड्रियन मॉंक हा सॅन फ्रान्सिस्कोच्या पोलिस खात्यातला एक अत्यंत हुशार डिटेक्‍टिव्ह असतो. मॉंकला ओसीडी आणि अनेक तऱ्हेच्या भयगंडांनी त्रस्त केलेलं असतं. त्याची बायको एका बॉंबस्फोटात मेल्यानंतर त्याच्या या विकाराचं प्रमाण वाढलेलं असतं. यामुळे पो लिसखात्यातून त्याची हकालपट्टीच झालेली असते. आता तो व्यक्तिगत पातळीवर डिटेक्‍टिव्ह म्हणून काम करत असतो. त्याला सर्व वस्तू एकसारख्याच लागतात. केकसुद्धा तो एकसारख्या चौकोनी आकारात कापतो. तो एका ठराविक तऱ्हेचंच पाणी पितो. मेक्‍सिकोत एका केससाठी गेला असताना ते पाणी तिथे न मिळाल्यानं तो कित्येक दिवस पाणीच पीत नाही! मॉंरला जंतूंची भीती वाटत असल्यामुळे तो कुणाशीही हस्तांदोलनही करत नाही आणि केलंच तर लगेच टिश्‍यू पेपरनं हाच पुसतो. त्याला अनेक फोबियाजही असलेले दाखवले होते. जंतूंचा (मायसोफोबिया), दंतवैद्याचा (ओडोंटोफोबिया), धारदार वस्तूंचा (ऐकमोफोबिया), दुधाचा (लॅक्‍टोफोबिया), मृत्यूचा (नॅक्रोफोबिया), सापाचा (ओर्फिडिओफोबिया ), गर्दीचा (ऍक्‍लोफोबिया), उंचीचा (ऍक्रोफोबिया), मशरुम्स (मायक्रोफोबिया) असा अनेक गोष्टींचं त्याला भयगंड असतं.
प्रत्यक्ष खऱ्या आयुष्यातही अनेक प्रसिद्ध सेलेब्रिटीजनाही भयगंडानं त्रस्त केलंय. मायकेल जॅक्‍सन आणि व्हूपी गोल्डबर्ग यांना उड्डाणाची भीती होती. पमेला अँडरसनला आरशांची भीती आहे. अल्फ्रेड हिचकॉकला अंड्यांची भीती वाटायची, त्याला अंडॅं फुटल्याचा आवाजही सहन होत नसे, अंड्याचा कुळलाच पदार्थ तो खात नसे. मेरेलिन मन्रोला मोकळ्या जागांची भीती वाटे (ऍगोराफोबिया).

फोबियाजचेही शेकडो प्रकार असले तरी मनोविकारांच्या डीएसएम-चार च्या मॅन्युअलप्रमाणे त्याचे तीन प्रमुख प्रकार मानले आहेत. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट फोबियाज, सोशल म् हणजे सामाजिक फोबियाज आणि तिसरा प्रकार म्हणजे ऍगोराफोबिया (सार्वजनिक ठिकाणं किंवा गर्दीची भीती). यातल्या स्पेसिफिक फोबियाजचे पुन्हा अनेक उपप्रकार असतात. एक म्हणजे प्राण्यांचं भयगंड, उदाहरणार्थ साप, कोळी, कुत्रे, किडे किंवा पक्षी अशा प्राण्यांची अतीव भीती वाटणं. दुसऱ्या उपप्रकारात माणसांना वादळ, उंची, पाणी वगैरे नैसर्गिक गोष्टींबद्दल अतीव भीती किंवा भयगंड वाटतं. तिसऱ्या उपप्रकारात रक्त, इंजेक्‍शन्स वगैरे गोष्टींबद्दल भीती वाटते. चौथ्या उपप्रकारात माणसांना बस, ट्रेन अशा पब्लिक ट्रान्स्पोर्टची किंवा लिफ्टमधून जायची, पुलावरून जाण्याची, गाडी चालवण्याची, उड्डाणाची, बोगद्यांची आणि अशा अनेक गोष्टींची किंवा प्रसंगांची भीती वाटते. याशिवाय पाचव्या उपप्रकारात माणसांना गुदमरण्याची, उलटी होण्याची, वरून खाली पडण्याची आणि अशा अनेक गोष्टींची भीती वाटते.

अशा फोबियानं त्रस्त रुग्णांना ती ठराविक गोष्ट (उदा. प्राणी, लिफ्ट...) दिसल्याबरोबर एकदम भीतीचा ऍटॅकच येतो. मग असा ऍटॅक येऊ नये म्हणून अशा गोष्टी किंवा वस्तू हे लोक टाळायला लागतात आणि तसं टाळण्यासाठी कुठल्याही थराला जातात. उदाहरणार्थ, लिफ्टची भीती वाटणारे लोक लिफ्ट असतानाही 15-15, 20-20 मजले चढून जातात! कित्येक जण अशा गोष्टींची वर्तमानपत्रात आलेली चित्रं किंवा छायाचित्रंही बघणं किंवा टीव्हीवरही अशा गोष्टींचं दृश्‍य बघणं टाळतात. त्यातून असं दृश्‍य डोळ्यांवर पडलंच तर त्यांना एकदम पॅनिक ऍटॅक येऊ शकतो.

डीएसएमच्या मॅन्युअलमधल्या एका केसप्रमाणे 47 वर्षांची मेरी ही एक विवाहित स्त्री होती. तिला 5 मुलंही होती. तिला क्‍लॉस्टर्लोफोबिया (बंद जागांची भीती) आणि ऍक्रोफोबिया (उंचीची भीती) यांचा त्रास होता. ती लहान असताना तिला तिची मोठी भावंडं खोली बंद करून ठेवत असत. शिवाय तिला घोंगड्याखाली दाबून ठेवत असत आणि धडपडत ती त् यातून बाहेर पडली की कोळ्यांची भयानक चित्रं दाखवून तिला घाबरवत असत. तेव्हापासून तिला हे भयगंड सुरू झालं होतं. तिची मुलं मोठी झाल्यावर ती बाहेर नोकरी करण्याचा विचार करत होती; पण बऱ्याच ठिकाणी ऑफिसवरच्या मजल्यावर असल्यामुळे लिफ्टनं वर जावं लागत असे आणि ते तर तिला शक्‍यच नव्हतं. तसंच मेरीचा नवरा विमा कंपनीत काम करत असल्यामुळे त्यांना विमान प्रवासाची तिकिटंही फुकट मिळत; पण विमानानं उड्डाण करणं हे तर तिच्या कल्पनेपलीकडचं होतं. यामुळे त्यांच्यात वाद होत.

प्रकाश नावाच्या डॉक्‍टरला सोशल फोबिया होता. बाहेर जाण्याचीही त्याला भीती वाटत असल्यामुळे "डेटिंग'च्यावेळी मुलीबरोबर हॉटेलमध्ये कॉफीही पिण्याचं धाडस तो करत नसे. लोक आपल्याकडे बघून चेष्टा करताहेत असं त्याला सतत वाटे. त्याला कुठल्याही समारंभात चक्क दातखीळ बसल्यासारखं वाटे आणि आपली ही अवस्था बघून लोक आपल्याकडे बघून हसतील या विचारांनी तो पुन्हा घाबरे. घाबरून आपली दातखीळ बसू नये किंवा लोकांना ते कळू नये म्हणून तो लोकांसमोर च्युइंगम चघळे.
फोबियाजवरच्या उपचारांविषयी पुढे बघूच!

No comments:

Post a Comment