Saturday, October 15, 2011

फ्रॉईड आणि युंग

April 10, 2011

फ्रॉईड आणि युंग यांच्यात कितीतरी गोष्टींत टोकाचा फरक होता. फ्रॉईड हा कमालीचा नास्तिक, तर युंग देव आणि दैव दोन्ही मानणारा होता. इतकंच नव्हे तर, युंगचा नशिबाबरोबरच परलोक, चमत्कारांवरही विश्‍वास होता; तर फ्रॉईडचा यापैकी कशावरच नव्हता. युंग पॅरासायकॉलॉजी मानत असे, तर फ्रॉईड मानत नसे. युंगला गटे आवडे तर फ्रॉईडला शेक्‍सपिअर आवडे. अर्थातच त्यांच्यात असे कितीतरी बाबींविषयी असलेले हे मतभेद अखेरीस पराकोटीला गेलेच!


फ्रॉ ईड आणि त्याचा शिष्य/मित्र युंग यांच्यातले संबंध "तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना' असेच होते! फ्रॉईडच्या मानसशास्त्रीय प्रणालीनं प्रभावित होऊन इ. स. 1906 पासून युंगनं फ्रॉईडला भेटण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला होता. युंगनं त्याच्या "स्टडीज इन वर्ड असोसिएशन'ची एक प्रत फ्रॉईडला व्हिएन्नाला पाठवून दिली. फ्रॉईडनं ती वाचली आणि त् याला ती प्रचंड आवडली. कालांतरानं 1907 मध्ये युंगची फ्रॉईडशी गाठ पडली. त्या वेळी फ्रॉईडनं आपल्या त्या दिवसाच्या सगळ्या अपॉईंटमेंट्‌स रद्द केल्या आणि ते दोघं तब्बल 13 तास आपापसांत चर्चा करीत होते. त्यांना वेळेचं, भुकेचंही भान उरलं नव्हतं. "माझ्या आयुष्यातला पहिलाच महत्त्वाचा माणूस' म्हणून फ्रॉईडनं या भेटीचं वर्णन करून ठेवलं होत ं. फ्रॉईडला तो "मॅग्निफिसंट' वाटला होता. त्यानंतर त्या दोघांमध्ये सतत पत्रव्यवहार होत राहिला. सुरवातीच्या काळात या दोघांमधील संबंध फारच घनिष्ठ होते. फ्रॉईडच्या पाठिंब्याम ुळेच युंग "इंटरनॅशनल सायकोऍनालिटिकल असोसिएशन'चा अध्यक्ष झाला होता. युंग आणि फ्रॉईड या दोघांचा स्वप्नावर विश्‍वास होता. "स्वप्नं या आपल्या अनकॉन्शस मनाच्या खिडक्‍या आहेत' असं ते मानायचे. स्वप्नातून आत बघितलं, की आपल्याला अनकॉन्शस मनात डोकावता येतं, असं त्यांना वाटायचं. पण त्या स्वप्नांचा अर्थ कसा लावायचा, या विषयी मात्र दोघांनी दोन वेगवेगळ्या वाटा निवडल्या.

फ्रॉईडच्या विचारांशी सहमत असलेले विचारवंत अनुयायी आणि फ्रॉईड स्वत:, असे दर आठवड्याला एकत्र जमून रुग्णांचे प्रश्‍न आणि उपचार याविषयी चर्चा करीत. या सगळ्यांनी िमळून 1908 मध्ये "व्हिएन्ना सायकोऍनालिटिक सोसायटी' स्थापन केली. या संस्थेचं वैशिष्ट्य असं, की यात संस्थापक खुद्द फ्रॉईडसहित सगळेच कमालीचे विक्षिप्त म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्यातल्या आपसांतल्या चर्चा नंतर मतभेदांत बदलून पुढे त्याचं उग्र स्वरूपात रूपांतर झालं. फ्रॉईडचे ऍडलर आणि युंग या त्याच्या अत्यंत जिवलग मित्र असलेल्या म ानसशास्त्रज्ञांसोबत अनेकदा वाद होत. शेवटी ते पराकोटीला गेले आणि ऍडलर आणि युंग हे त्या संस्थेतून बाहेर पडले. मात्र युंग दूर गेल्याचं फ्रॉईडला अत्यंत दु:ख झालं. एक तर फ्रॉईड त्याला आपल्या विचारांचा भावी वारसदार मानत होता. तसा दोघांमध्ये कितीतरी गोष्टींत टोकाचा फरक होता. फ्रॉईड हा कमालीचा नास्तिक, तर युंग देव आणि दैव: दोन्ही गो ष्टी मानणारा होता. इतकंच नाही, तर युंग नशिबाबरोबरच परलोक, चमत्कारांवर विश्‍वास ठेवणारा होता आणि फ्रॉईड यापैकी कशावरच विश्‍वास ठेवणारा नव्हता. युंगचा पॅरासायकॉ लॉजीवर विश्‍वास होता, पण फ्रॉईडचा नव्हता. फ्रॉईडचा त्याच्या लैंगिकतेबद्दलच्या थिअरीजवर विश्‍वास होता; पण युंगचा नव्हता. फ्रॉईड सगळं विश्‍लेषण फक्त वैयक्तिक पातळीवरच करतोय आणि त्यातही लैंगिक प्रेरणांना अवास्तव महत्त्व देतोय, हे युंगला पटत नव्हतं. युंगला गटे आवडे तर फ्रॉईडला शेक्‍सपिअर आवडे. अर्थातच त्यांच्यातले मतभेद पराकोटीला गेलेच!

फ्रॉईड बरेचदा युंगच्या बोलण्यातल्या चुका काढायचा. बोलताना आपण अनवधानाने कित्येकदा चुका करतो, पण त्यातूनही आपल्या मनात दडलेल्या काही सुप्त इच्छा, वासना वेगळ् या तऱ्हेनं व्यक्त होत असतात आणि त्यामुळे त्या महत्त्वाच्या असतात, असं फ्रॉईडला वाटे. अशाच चुकांना मग "फ्रॉइडियन स्लिप' म्हणायला लागले. आपण युंगच्या बोलण्यातल्या चुका काढायला लागल्यावर युंगला त्याचा राग येईल, हे फ्रॉईडला माहीत होतं. खरं तर त्यामुळेच फ्रॉईड युंगच्या त्या चुका काढत होता. "आपल्या शिष्यांना आणि विद्यार्थ्यांना फ्रॉइर् ड मनोरुग्णाप्रमाणे वागवतो,' अशी फ्रॉईडवर टीका करणारं पत्र युंगनं फ्रॉईडला लिहिलं. हे वाचून फ्रॉईडच्या अंगाचा तिळपापड झाला. फ्रॉईडनंही लगेच तावातावानं युंगला पत्र लि हिलं खरं, पण त्यानं ते त्याला पाठवलं नाही. जगातले दोन महान मानसशास्त्रज्ञ स्वत:चं आणि दुसऱ्याचं मन समजून घेण्याची धडपड करीत होते आणि त्यात ते पूर्णपणे अयशस्वी होत होते!
आपल्या वागण्याचा दुसऱ्यावर काय परिणाम होतोय हे खरं तर कुठल्याही सर्वसामान्य माणसालाही चटकन समजलं असतं, पण या जगातल्या दोन महान मानसशास्त्रज्ञांना ते जमत नव् हतं!

न्यूरॉसिसचं कारण फ्रॉईड लैंगिकतेमध्ये शोधत होता. ते युंगला मान्य नव्हतं. आजूबाजूच्या परिस्थितीशी जर कुणाला जुळवता आलं नाही तर "न्यूरॉसिस' होतो, लैंगिकतेमुळे नव्हे, असं युंगचं म्हणणं होतं. शिवाय सध्याच्या परिस्थितीमधल्या ताणतणावांमुळे आणि इतर मानसिक कारणांमुळे "न्यूरॉसिस' होतो; लहानपणच्या कुठल्याही लैंगिक गोष्टींमुळे नाही, अस ंही युंगला वाटे. युंगच्या थिअरीमध्ये धर्मवाद आणि गूढवादही डोकावे. त्यानं "कलेक्‍टिव्ह कॉन्शस'चीही कल्पना मांडली. यामध्ये फक्त एकाच व्यक्‍तीचा विचार न करता इतर सम ाजाचाही विचार केला होता; एवढंच नव्हे, तर आतापर्यंतच्या पिढ्यांतल्या ऐतिहासिक मानसिकतेचाही विचार युंगनं केला होता. फ्रॉईडला युंगच्या या कल्पना मान्य नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यात वाद वाढले.
फ्रॉईडच्या "बालपणीची लैंगिकता (इन्फन्टाइल सेक्‍शुऍटिलिटी)'आणि "इडिपस कॉम्प्लेक्‍स' याविषयीच्या थिअरीजही युंगला मान्य नव्हत्या. फ्रॉईडची अनकॉन्शसची कल्पना म ूळची आपलीच होती; ती आपणच स्वतंत्रपणे शोधून काढली होती, असं युंगचं म्हणणं होतं.
युंगच्या मते, लैंगिक प्रेरणा महत्त्वाच्या असल्या तरी सगळ्यात महत्त्वाच्या नव्हत्या. युंगच्या दृष्टीनं धर्म खूप महत्त्वाचा होता. युंगनं अनेक धर्मांचा अभ्यास सुरू केला. युंग प्राचीन स ंस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिका आणि न्यू मेक्‍सिको इथे फिरून, राहून आला होता. अनेक संस्कृतींमध्ये असणाऱ्या पुराणकथांमध्ये काही साम्यं सापडतात का, यावरही त् यानं अभ्यास केला आणि त्यांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. पौर्वात्य धर्मात अनेक देवळांत त्याला देवदेवतांची लैंगिकदृष्ट्या खूप उत्तेजित चित्रं, मूर्ती किंवा प्रतिमा असल्याचं आढळलं. त्यातल्या लैंगिक स्पष्टतेमुळे युंगला पौर्वात्य धर्म खूप पुढारलेले वाटायला लागले. ते मनातल्या अनकॉन्शसचीच भाषा बोलताहेत, असं युंगचं म् हणणं होतं. यानंतर त्यानं या सगळ्या धर्मातल्या पुराणकथांचा अभ्यास केला.

सुरवातीच्या काळात दोघंही आपली स्वप्नं एकमेकांना सांगत. 1906 मध्ये युंगला वेगवेगळी स्वप्नं पडायला लागली. फ्रॉईडनं नंतर त्याचं मनोविश्‍लेषणही करून अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. "त्याची स्वप्नं ही त्याच्या अयशस्वी लग्नाची दर्शक आहेत' असं फ्रॉईडनं त्याविषयी म्हटलं होतं. पण "आपण आपल्या बायकोबरोबर खूप आनंदी आणि सुखी आहोत' असं युंगनंही त्याला उत्तर दिलं होतं. फ्रॉईड स्वत:ची स्वप्नं युंगला सांगत असल्यामुळे युंगला "फ्रॉईडचं मन कसं विचार करतं; कसं काम करतं' हे या स्वप्नांच्या विश्‍लेषणामुळे म ाहीत होतं. पण त्याविषयी तो कुठे फारसं बोलत नसे. त्याविषयी कुणी त्याला एकदा विचारलं होतं, तेव्हा युंगनं "ते एक प्रोफेशनल सिक्रेट आहे' असं सांगून त्याला उडवून लावलं होतं.

दोघंही अत्यंत हुशार तज्ज्ञ स्वत:चं मन आणि भावना यांचा अर्थ लावण्यासाठी झगडत होते. एकमेकांच्या ताकदीचा एकमेकांवर असलेला प्रभाव त्यांना कळत नव्हता. एके दिवशी फ्रा ॅईडनं परस्परांतली ही चर्चा आणि संवाद थांबवला, तसंच फ्रॉईडनं आपल्याला पडलेली स्वप्नं युंगला सांगायचं बंद केलं. या क्षेत्रातले तज्ज्ञ आपण असताना युंगला आपल्या स्वप्नां विषयी सांगून आपला अधिकार आपणच का कमी करावा, असे विचार त्याच्या मनात यायला लागले. हे लक्षात आल्यावर युंग खूप दुखावला गेला. आता मात्र आपण फ्रॉईडवर विस ंबून न राहता नवा मार्ग शोधायची गरज आहे, हे युंगला कळलं. फ्रॉईडला हे सारं पटवून घेणं अशक्‍य होतं. आता आपण वेगळ्या वाटेनं गेलंच पाहिजे, याची युंगची खात्री झाली. 1913 मध्ये दोघांनी एकमेकांना रामराम ठोकला आणि शेवटी 1914 मध्ये युंगनं स्वत:चा एक गट स्थापन केला.

या गोष्टीचा युंगवर खूपच परिणाम झाला. पहिल्या महायुद्धापर्यंत त्याच्यावर हा मानसिक आघात राहिला. युंग फ्रॉईडला खूप जवळून ओळखत होता, तरीही फ्रॉईडच्या ज्ञानावर काही बोलण्याची क्षमता त्याच्याकडे नव्हती. 1913 सालच्या सप्टेंबर महिन्यात म्युनिकला "फोर्थ इंटरनॅशनल सायकोऍनालिटिकल कॉंग्रेस' भरली, त्या वेळी फ्रॉईड आणि त्याचे समर्थक वेगळ्या टेबलवर, तर युंग आणि त्याचे समर्थक वेगळ्या टेबलवर बसले होते. "जेव्हा कॉंग्रेस संपली, तेव्हा आम्ही अलग झालो. पुन्हा भेटण्याची कुणालाच इच्छा राहिलेली नव्हती,' असं फ्रॉईडनं एका पत्रात लिहिलं होतं. या विभक्त होण्यामुळे फ्रॉईडला खूपच मनस्ताप झाला, पण त्याचबरोबर युंग गूढवादाकडे झुकतोय; अवैज्ञानिक तऱ्हेनं विचार करतोय आणि मांडतोय, याचं फ्रॉईडला खूपच वाईट वाटलं. "आपण जर कलेक्‍टिव्ह अनकॉन्शस आनुवंशिक तऱ्हेनं आपल्या पूर्वजांपासून मिळवत असलो तर ते डार्विनच्या तत्त्वाच्या विरुद्ध जात होतं,' असं फ्रॉईड म्हणे. याचं कारण अनकॉन्शस हा जन्मापासून नसून, तो आपल्या अनुभवांमुळे, संस्कारांमुळे तयार होत असतो, असं फ्रॉईडला वाटे. आणि संस्कारांमुळे, बाह्य परिस्थितीमुळे निर्माण होणारे गुणधर्म पुढच्या पिढीत आनुवंशिक तऱ्हेनं जात नसतात, हे फ्रॉईडला चांगलंच माहीत होतं. पण युंगला हे पटत नव्हतं. त्याच्या या वेळच्या भाषणातून फ्रा ॅईडपेक्षा त्याचे विचार, थिअरीज वेगळ्या असल्याचं स्पष्ट झालं.

फ्रॉईडनं 1913 मध्ये एक पत्र लिहिलं. ते त्याच्या मृत्यूनंतरच प्रकाशित झालं. त्यात त्यानं "टोटेम अँड टाबू' हे पुस्तक युंगच्या थिअरीज पूर्णपणे धुळीला मिळवण्यासाठीच लिहिलं होतं, असं नमूद केलं होतं. पण त्यानं त्यात उत्क्रांतीचाही अत्यंत चुकीचा अर्थ लावला होता. माणसाचे अनेक वंश म्हणजेही त्याच्या उत्क्रांतीचे टप्पेच आहेत आणि त्यांचं शिखर म् हणजे गोरी, पाश्‍चिमात्य, सुसंस्कृत माणसं, असं त्यानं त्यात मानलं होतं. थोडक्‍यात, युंगला गोळी मारता मारता ती फ्रॉईडला स्वत:लाच लागली होती! एका अर्थानं फ्रॉईडनं मानवी मनाकडे कसं बघावं, याचं दार विसाव्या शतकासाठी उघडलं, तर युंगनं तेच एकविसाव्या शतकासाठी खुलं केलं, असं म्हणता येईल.

No comments:

Post a Comment